आजच्या पिढितील बायका

Submitted by himbo on 22 May, 2014 - 10:02

आजच्या पिढीतील बायका घराबाहेर जाउन काम करु लागल्या. त्यातुनच घरकाम, लग्नान्तर सासरी जावे लागणे अशी त्यान्ची ओढातान होते हे १००% पटते. परन्तु तरिहि काहि गोष्टी बायकान्च्या हाताबाहेर गेलेल्या स्पष्ट दिसतात. त्यातलेच एक म्हणजे वाढलेले घट्स्फोटाचे प्रमाण. पुरुषाप्रमाणेच बायकाना लागलेली दारु, तम्बाखुची व्यसने. आजच्या बायका ह्या नात्यात टोकाची भुमीका जास्त घेतात आणि त्यामुळेच नाती चिघळतात. हा दोष एकाच बाजुने नसला तरि नाते टिकवन्यासाठि कोनिहि प्रयत्न करताना दिसत नाहि.

आजच्या पिढीतील बायका हया स्वतंत्र विचाराच्या आहेत खरया. पण समंजसपणा आणि ममत्व एकाच पिढीत एकदम ७०-८०% कमी झाल्याचे वाटते. आपल्या आया, आज्यां, यांच्यावर झाला असेल अन्याय.पण त्या सुखी दिसत असल्या किव्वा नसल्या तरि शांत आणि समाधानी दिसल्या. शेवटि सुख हे मानण्यावर असत. मुख्य म्हणजे त्यांनी मुलांना स्त्रियांना चांगली वागणूक देण्याचे धडे दिले.घर तर घर पूर्णपणे सांभाळले.कुटुंबाला बांधून ठेवले.आपल्या लोकांना मायेची उब असलेली एक जागा निर्माण केली.घरातल्यांना सांभाळून बाहेरच्यांशी, कठीण वेळेशी एकट्याने झुंज दिली.

आत्ताच्या बायका या पिढीपुढे सर्वार्थाने कमजोर वाटतात. कुठल्या तरी जाहिरातीत दाखवलेला परीप्रदेश यांना घरात हवा असतो. अपेक्षा तर इतक्या पण सगळ्या पूर्ण नवर्याने खांद्यावर घेऊन करायच्या. आत्ताच्या बायकानाहि आपल्यापेक्षा जास्त शिकलेला आणि जास्त पगार असलेला नवरा हवा असतो. हि मानसिकता जोपर्यत बदलत नाहि तोपर्यत काहिच शक्य नाहि. आत्ताच्या बायका घराबाहेर जाउन काम करु लागल्या. त्यामुळे खचितच पैसा भरपूर असेल पुढल्या पिढीकडे पण हृदयात जे भरपूर पाहिजे ते नक्कीच नसेलच.सैरभैर असेल हि पिढी.आहेच.दिसतेच आहे. गुन्हे करणाऱ्यांची प्रोफाईल पहा आणि टक्केवारी पहा सर्व लक्षात येईल.

एकीकडे घरकाम, बालसंगोपनात पुरुषांनी समान वाटा उचलावा अशी रास्त अपेक्षा आजची स्त्री करते, तर दुसरीकडे शिकलेली, अर्थार्जन करणारी स्त्री लग्नाच्या वेळी पहिल्या दिवसापासूनच- आर्थिकदृष्टय़ा पूर्ण स्थिर व परिपूर्ण वस्तूंनी घर सुसज्ज केलेला मुलगा नवरा म्हणून हवा असा हट्ट धरते. मग स्वकर्तृत्वावर व अर्थार्जनावर विश्वास ठेवून 'घर' दोघांनी मिळून हळूहळू मोठं करू, सजवू; असा विचार ती का करत नाही? किती उच्चशिक्षित मुली लग्नसोहळ्याच्या अवाजवी खर्चाला, भरमसाट दागिन्यांच्या मोहाला आळा घालतात?

एरवी स्त्रीविषयक अन्यायाच्या सत्यकथा लिहिताना नाण्याची ही दुसरी बाजू मांडणंही आवश्यक आहे; नाही तर ते लिखाण अर्धसत्यच राहील. लंबकाचा लोलक स्त्री दुय्यमतेकडून निघून स्त्री-पुरुष समानतेवर आंदोलित न राहता पुढे स्त्री बेदरकारीकडे झुकत जाईल का? या घटनांचे प्रमाण जरी कमी असले, तरी गरज आहे एका आरशाची-आत्मभानाची, स्वपरीक्षणाची! नक्की आपल्याला खूप शिकून, पसे मिळवून हेच हवं होतं का? खूप पसे मिळवण्यालाच आपण सुख समजतो आहे का? थोडा विचार करू या!

आजच्या पिढीतील बायकान्ना आणि त्यान्चामागे धावणार्या सहनशील पुरुशान्ना उपयोगी असे केशवसुमार यांचे जुने काव्य

नारी जातीची थोरवी या दुनियेने गाइली
अनेक रूपे ही तुझी या दुनियेने पाहिली

कोण होतीस तू, काय झालीस तू
अग वेडे कशी वाया गेलीस तू

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकत्र कुटुम्बातील किन्वा अर्थार्जन न करण्यार्या स्त्री ला दुसरा पर्यायच नव्हता, त्यामुळे हे जे आहे तेच म्हणजे सुख असे समजण्याशिवाय गत्यन्तर नव्हते. हे तुमचे निरिक्षण बरोबर आहे पण ते काळाची अपरिहर्यता आहे असे वाटते, it is always a package deal

lagna na karun changala inga dakhava .>>>>>>> Duryodhan Kantode, तुमच्यासाठीच लिहिलाय लेख.

एकत्र कुटुम्बातील किन्वा अर्थार्जन न करण्यार्या स्त्री ला दुसरा पर्यायच नव्हता, त्यामुळे हे जे आहे तेच म्हणजे सुख असे समजण्याशिवाय गत्यन्तर नव्हते. हे तुमचे निरिक्षण बरोबर आहे पण ते काळाची अपरिहर्यता आहे असे वाटते, it is always a package deal >>>>>>> आसावरी भावे, म्हणजे चान्गले salary package मिळु दे.

म्हणजे चान्गले salary package मिळु दे. >> ते तर मिळू देच, कुणाला नको असते आखूड शिन्गी बहुदुधी इ.इ. ? बायकांना अधिक कमावणारे नवरे हवेत तसे पुरुषांना नाही का बायको सुन्दर, स्मार्ट, शिकलेली, कमावती, माहेरच्या काही जबाबदार्या नसणारी पण property असणारी शिवाय स्वैपाक येणारी, गृहकृत्यदक्ष, कामसू, सोयीनुसार आधुनिक आणि पारम्पारिक वागणारी, शान्त, संयमी ( ही यादी सम्पतच नाहीये) वै वै हवी असते.

म्हणजे चान्गले salary package मिळु दे. >> ते तर मिळू देच, कुणाला नको असते आखूड शिन्गी बहुदुधी इ.इ. ? बायकांना अधिक कमावणारे नवरे हवेत तसे पुरुषांना नाही का बायको सुन्दर, स्मार्ट, शिकलेली, कमावती, माहेरच्या काही जबाबदार्या नसणारी पण property असणारी शिवाय स्वैपाक येणारी, गृहकृत्यदक्ष, कामसू, सोयीनुसार आधुनिक आणि पारम्पारिक वागणारी, शान्त, संयमी ( ही यादी सम्पतच नाहीये) वै वै हवी असते. >>>>> पण तशी मिळत नाहि ना. एवधे गुण असलेली एक पन बायको आजपर्यत एकिवात नाहि.
९९% बायकांना अधिक कमावणारे नवरे हवेत पन ९०% पुरुषांना बायको कमावणारि नसेल तरि चालते.

एकीकडे घरकाम, बालसंगोपनात पुरुषांनी समान वाटा उचलावा अशी रास्त अपेक्षा आजची स्त्री करते, तर दुसरीकडे शिकलेली, अर्थार्जन करणारी स्त्री लग्नाच्या वेळी पहिल्या दिवसापासूनच- आर्थिकदृष्टय़ा पूर्ण स्थिर व परिपूर्ण वस्तूंनी घर सुसज्ज केलेला मुलगा नवरा म्हणून हवा असा हट्ट धरते. मग स्वकर्तृत्वावर व अर्थार्जनावर विश्वास ठेवून 'घर' दोघांनी मिळून हळूहळू मोठं करू, सजवू; असा विचार ती का करत नाही? किती उच्चशिक्षित मुली लग्नसोहळ्याच्या अवाजवी खर्चाला, भरमसाट दागिन्यांच्या मोहाला आळा घालतात?
>>> मुद्द्यांची सरमिसळ!
मुळात ही गोष्ट जनरलाईज केली जाऊ नये. प्रत्येकाची केस वेगळी, निर्णय वेगळे. आपापल्या कुवती आणि सोयीनुसार प्रत्येकाने ठरवावं की त्याला काय हवं आणि काय नको. हा वाद ताणायचा म्हणलं तर एक जन्मही पुरणार नाही.
बाकी, निदान शहरांमधे तरी कमावणारी आणि घरातलंही सगळं करणारी मुलगी अजूनही अपेक्षित असते ही वस्तुस्थिती आहे. लग्नसोहळ्याचा खर्च मुलाकडच्यांना नकोच असतो का? मुलाला काही मत तरी असतं का? घर दोघांनी मिळून सजवावं असं म्हणताय. पण घर नेहमीच दोघांचंच असतं का? किती किती कंगोरे आहेत या विषयाचे आणि कितीतरी मोठी व्याप्ती आहे! हे असे लेख वाचून लोकांनी गंभीरपणे विचार करावा असं तुम्हाला खरंच वाटतं का? नक्की कशाबद्दल आणि कोणी विचार करावा असं वाटतं ते ही लिहा.

पण तशी मिळत नाहि ना. एवधे गुण असलेली एक पन बायको आजपर्यत एकिवात नाहि. >>
अगदी बरोब्बर !! कशाला अशा नव्या अवगुणी बायकांवर वेळ दवडताय राव!!
एकुलते एक आयुष्य मिळालेय तर यांच्यामागे रडण्याएवेजी मज्जा करा !! तुम्हाला बक्कळ नविन पर्याय आहेत . जरा डोके चालवा. लिव्ह इन रीलेशन्शिप आहे , विबासं आहेत
आजची नको असेल तर कालच्या बायका पण आहेतच की .
आणि अगदी कोणतीही बाईच सहन होत नसेल तर बुवाचा पर्याय सुद्धा उप्लब्ध झालाय Proud

मुळात ही गोष्ट जनरलाईज केली जाऊ नये. प्रत्येकाची केस वेगळी, निर्णय वेगळे. आपापल्या कुवती आणि सोयीनुसार प्रत्येकाने ठरवावं की त्याला काय हवं आणि काय नको. हा वाद ताणायचा म्हणलं तर एक जन्मही पुरणार नाही.>>>>>>>>>> सावरी_क , आपल्याला वाद ताणायचा नाहिच आहे. चर्चा करायचीय.

बाकी, निदान शहरांमधे तरी कमावणारी आणि घरातलंही सगळं करणारी मुलगी अजूनही अपेक्षित असते ही वस्तुस्थिती आहे. >>>>>>> सावरी_क, बहुतेक जनान्ना कमावणारी नसेल तरिहि चालते.

लग्नसोहळ्याचा खर्च मुलाकडच्यांना नकोच असतो का? >>>>>>> सावरी_क, दोघानाहि हवा असेल पन भरमसाट दागिन्यांच्या मोहाला आळा घालुन मुलि तो खर्च कमी करु शकतात.

मुलाला काही मत तरी असतं का? >>>>>> मुलिला तरि कुठे काय मत असत. नटण्यामुड्न्यातुन वेळ मीळेल तर ना!

घर दोघांनी मिळून सजवू असं म्हणताय. पण घर नेहमीच दोघांचंच असतं का? >>>>>>>>सावरी_क, नवर्याच घर म्हणजे आपलच मानाव मुली ने आणि तेच आपल मानुन सजवल तर खुप सोपे होइल.
सासु सासर्याशी आणि घरातील इतर जनाशी पट्वुन ससार केला तर एकत्र कुटुम्ब पद्ध्तीचे फायदे हि समजु शकतील.

किती किती कंगोरे आहेत या विषयाचे आणि कितीतरी मोठी व्याप्ती आहे! हे असे लेख वाचून लोकांनी गंभीरपणे विचार करावा असं तुम्हाला खरंच वाटतं का? >>>>>>>>>> सावरी_क, खरंच वाटतं कारण एरवी स्त्रीविषयक अन्यायाच्या सत्यकथा लिहिताना नाण्याची ही दुसरी बाजू मांडणंही आवश्यक आहे. म्ह्णुनच लिहितोय. पुढच्या पिढिचा विचार करताना मागच्या पिढिच काय चुकत तेहि समजल तर पुढच्या पिढिला त्याचा फायदाच होइल आणि यातुन भरपुर जनान्ना त्यान्चा आयुष्याचे निर्णय घेणे सोपे होइल.

भरमसाट दागिन्यांच्या मोहाला आळा >>> मुद्दा लग्नसोहळ्यावर होणार्‍या खर्चाचा आहे की दागिन्यांवर होणार्‍या? शिवाय ते दागिने करणार तिचे पालक आणि वापरणार ती. ते स्त्रीधनही तिचेच. यात खरंतर मुलाकडच्यांनी काही बोलूच नये. त्यांचा काही संबंधच नसावा मग. मुली इतक्या इनसेन्सिटिव्ह नक्कीच नसतात की पालकांना शक्य नाही तर ऋण काढून दागिने करा म्हणतील. तर तो ही प्रश्न मिटला. मग नेमका मुद्दा काय आहे?

मुलिला तरि कुठे काय मत असत. नटण्यामुड्न्यातुन वेळ मीळेल तर ना! >>> मुलीला मत असतं की नाही हे एकदा ठरवा बरं. तुमच्या मते मुलीच सगळी वाताहत घडवतात. मग ती काय त्या मतं असल्याशिवाय घडवत असतील का?
नटण्याचं म्हणाल तर साधे रोजच्या वापरातले कपडे घालून, न नटता एखादी मुलगी लग्नाला उभी राहते म्हणाली तर तिला हे आधी सासरचेच करू देणार नाहीत. रोजच्या रोज 'नटून' कामावर किंवा बाहेर जाणार्‍या खरंच किती मुली असतात हो?

सासु सासर्याशी आणि घरातील इतर जनाशी पट्वुन ससार केला>>> या नाण्याला दुसरी बाजू नाहीये की काय?

कमावणारी नसेल तरिहि चालते >>> ती नाइलाज म्हणून. अपेक्षा नसतेच का?

पुढची पिढी v/s मागची पिढी वगैरे विचार करताना त्यांच्यावेळची सामाजिक इ.इ. परिस्थिती आणि आत्ताची यातही फरक असतो हे लक्षात घ्या. काळानुसार parameters बदलणारच. अपरिहार्यपणे.

नवर्याच घर म्हणजे आपलच मानाव मुली ने आणि तेच आपल मानुन सजवल तर खुप सोपे होइल.
सासु सासर्याशी आणि घरातील इतर जनाशी पट्वुन ससार केला तर एकत्र कुटुम्ब पद्ध्तीचे फायदे हि समजु शकतील. >> पटवायचे\ मानायचे सगळे काय ते स्त्री ने, आणि यावर का असा प्रश्न विचारला की ती मुलगी वाह्यात.
एकत्र कुटुम्बात घोळ आणि interference अधिक, ज्यांना सगळे एकट्याने manage करायला जमते त्या मुलींना त्रासच होण्याची शक्यता जास्त. शक्य असल्यास उत्तम मार्ग म्हणजे लग्नानंतर नवरा बायकोने स्वतःचा वेगळा संसार करावा. आपले problems स्वतः सोडवावे, कुटुंबावर अवलंबून न राहता.

या लेखाचा विषय चांगला आहे पण मते काहीशी एकतर्फी व दोन्ही बाजूंकडून टोकाची वाटतायेत. ( केवळ मत व्यक्त करीत आहे, कोणाला दुखावण्याचा हेतू नाही)

माझ्या मते लेखात व्यक्त केलेले समस्या या नवीन मौडर्ण जीवन-शैलीमुळे आल्या आहेत. आणि त्यात सहभाग असलाच तर स्त्री व पुरुषांचा समान असेल; एकट्या स्त्रीचाच कसा असेल??

मुद्दा लग्नसोहळ्यावर होणार्‍या खर्चाचा आहे की दागिन्यांवर होणार्‍या? शिवाय ते दागिने करणार तिचे पालक आणि वापरणार ती. ते स्त्रीधनही तिचेच. यात खरंतर मुलाकडच्यांनी काही बोलूच नये. त्यांचा काही संबंधच नसावा मग. मुली इतक्या इनसेन्सिटिव्ह नक्कीच नसतात की पालकांना शक्य नाही तर ऋण काढून दागिने करा म्हणतील. तर तो ही प्रश्न मिटला. मग नेमका मुद्दा काय आहे? >>>>>>> लग्नसोहळ्यावर आणि दागिन्यांवर होणारा खर्च हा मुलाकडचा किव्वा मुलीकडचा अस मी म्हणत नाहि. तो दोन्हिकडुनहि केला जातो.
अवाजवी म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त. हौस म्हणुनहि दागिन्यांवर खर्च करनार्या मुली असतात.
लग्नसोहळ्यावर होणारा खर्च हा दोन्हिकडुन कमी करता येतो.

मुलीला मत असतं की नाही हे एकदा ठरवा बरं. तुमच्या मते मुलीच सगळी वाताहत घडवतात. मग ती काय त्या मतं असल्याशिवाय घडवत असतील का? >>>>>> मते असतातच कि. पण स्वकर्तृत्वावर आधारलेली नसतात.
प्रतेक मुलिला आर्थिकद्र्ष्ट्या सक्षम मुलगा हवा असतो. जबाबदारि नको असते.

नटण्याचं म्हणाल तर साधे रोजच्या वापरातले कपडे घालून, न नटता एखादी मुलगी लग्नाला उभी राहते म्हणाली तर तिला हे आधी सासरचेच करू देणार नाहीत. रोजच्या रोज 'नटून' कामावर किंवा बाहेर जाणार्‍या खरंच किती मुली असतात हो? >>>>>> नटण्याचं म्हणाल तर ते गणित प्रतेक मुलीच्या विचाराणुसार बदलत. आजहि रोजच्या रोज 'नटून' कामावर किंवा बाहेर जाणार्‍या मुली असतात. किती हे सान्गु शकत नाहि.

सासु सासर्याशी आणि घरातील इतर जनाशी पट्वुन ससार केला>>> या नाण्याला दुसरी बाजू नाहीये की काय? >>>>> असेलहि. तर ती तुम्हि मान्डा.

ती नाइलाज म्हणून. अपेक्षा नसतेच का? >>>>>>>> घरकाम हि अपेक्षा असते. न कमावणार्या कितितरि मुलिनची लग्न झालेली मी पाहिलि आहेत.

पुढची पिढी v/s मागची पिढी वगैरे विचार करताना त्यांच्यावेळची सामाजिक इ.इ. परिस्थिती आणि आत्ताची यातही फरक असतो हे लक्षात घ्या. काळानुसार parameters बदलणारच. अपरिहार्यपणे. >>>>>>>> त्यांच्यावेळची सामाजिक परिस्थिती आणि आत्ताची यात फरक आहेच. काळानुसार parameters ही बदलले आणि विचारहि बदलले. संसार हा एकट्याचा नसुन दोघान्चा आहे हा विचार जोर धरु लागला. त्यातुनच आजच्या मुलीची अपेक्षा हि मुलगा माझ्यापेक्षा एक पाउल पुढे असलाच पाहिजे अशी असते. स्त्रि-पुरुष समानता पाहिजे फक्त ती इथे नको असे तीला का वाटते?
साहजिकच जबाबदारि नको असते.

मुळात ही गोष्ट जनरलाईज केली जाऊ नये. प्रत्येकाची केस वेगळी, निर्णय वेगळे. आपापल्या कुवती आणि सोयीनुसार प्रत्येकाने ठरवावं की त्याला काय हवं आणि काय नको. हा वाद ताणायचा म्हणलं तर एक जन्मही पुरणार नाही.

सहमत.

बहुधा सर्वजण लग्न झालेल्या बायकांच्या संदर्भात लिहिताहेत. लग्न हाच एक मोठा भाग आहे का स्त्रीच्या आयुष्याचा? आजकालच्या बायका म्हंटले की लग्न, नवरा, नवर्‍याची नोकरी वगैरे याच संदर्भात त्यांची तुलना जुन्या काळच्या बायकांशी करायची का?

आजकाल बायका काही काही शिकल्या, त्यांचे स्वतःचे करीअर आहे, त्यांनी स्वतः काही तरी केले आहे, करत आहेत, त्याबद्दल बोला की! नवर्‍याशिवाय स्त्रीच्या आयुष्याबद्दल बोलण्यासारखे काही नाही?

आजकालची कुणि स्त्री हे वाचत असेल तर त्यांचे या बाबत काय मत आहे ते जाणून घ्यायची इच्छा आहे.

आजकालच्या पुरुषांबद्दल लिहायचे म्हंटले तर कदाचित लग्न सोडून इतर सर्व गोष्टींचा उहापोह होईल.

झक्की, +१

माझ्या आजी किंवा आईच्या पिढीपेक्षा मी जास्ती logically विचार करते. आणि त्यामुळे मी नातेसंबंध टिकवण्याच्या बाबतीत जरा अधिक रुक्ष आहे. पण मला हे ही माहिती आहे की माझ्या आई किंवा आजीला जसं आणि जितकं गृहीत धरलं जातं/गेलं तितकं मला धरलं जात नाही आणि मी कधी जाऊ ही देणार नाही. हे दोन्ही बदल शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबनातून आले आहेत.
जग बदललं, समाज बदलला पण बायकांनी कायम सती सावित्री मोड मध्ये राहावं अशी सगळ्यांची अपेक्षा असते! करू दे की तिलाही थोडा माज..थोड्या चुका...शिकेल तिची ती! सतत "धोपटमार्गा सोडू नको" चं पालुपद का? why should boys have all the fun always?

माझं असं निरीक्षण आहे की भारतीय मुलांपेक्षा भारतीय मुली सगळ्याच आघाड्यांवर बदलत्या काळाशी जास्ती पटकन जुळवून घेत आहेत. पण मुलांच्या डोक्यात मात्र अजूनही आपली बायको आपल्या आईसारखीच वागेल अशी काहीशी अपेक्षा असते. म्हणजे मुलं स्त्री सहकारी, batch mates ई. शी एकदम समानतेने वागतात पण घरी मात्र बरंच पारंपारिक!

आणि प्रत्येक मुलिला आर्थिकद्र्ष्ट्या सक्षम मुलगा हवा असतो. जबाबदारि नको असते.>> हे फारच एकांगी विधान आहे. मुली स्वतः इतका शिकलेला वा जास्त शिकलेला मुलगा प्रिफर करतात कारण सर्व साधारणपणे मुलांचा इगो मुलींपेक्षा जास्ती strong असतो आणि वरचढ शिक्षण/पगार ई. गोष्टींमुळे तो सुखावतो! आणि कदाचित याच कारणासाठी मुलांना स्वतःपेक्षा कमी शिकलेली बायको चालते/हवी असते!

अर्थात चित्र फार झपाट्याने बदलत आहे. पुढची पिढी बऱ्या वाईट सर्वच बाबतीत स्त्री-पुरुष समानता अंगिकारताना दिसते आहे. Overall, आपण योग्य दिशेस चाललो आहोत!

आणि हा लेख काय दृष्टीकोनातुन लिहिलाय ते कळलं नाही.....पटला ही नाही....झोयो काय हिंबो काय.... यांना प्रॉब्लेम काय आहे ते कळत नाहीये.....नैराश्यापोटी हा लेख लिहील्याचे जाणवतेय......

जिज्ञासा + १११

आता परत लेखक म्हणतील अनिश्का तु काही लिहीले नाहीस आणि लोकांच्या लेखनाला का नावं ठेवते आहेस वगैरे वगैरे..... मग परत अ‍ॅडमीन यांना कालसारखा बाहेरचा रस्ता दाखवणार....
परत दुसर्या दिवशी हे झोयो,हिंबो सारख अजुन एक ढप्पर नाव लाउन अजुन एक फालतु लेख घेउन येणार ... तो अजुन नैराश्यवादी असणार...लोक परत त्यावर कमेंट्स करणार.......आणि कालपासुनच्या ईतिहासाची पुनरावृत्ती होणार....

म्हणुन यांना इग्नोर करा रे सर्वांनी

अनिश्का.:हाहा: मला पण तेच वाटतय. कारण आय डीचे वय बघ, किती लहान आहे, जेमतेम २२ तास आणी वर काही मिनीटे.

काल झोयोन्च्या बाफ वर लिहायला आले तर बाफच उडाला.:खोखो: मी आपली टाईप करतीय आणी वर मेसेज आला बाफ बन्द झाला म्हणून.:फिदी:

आपली मते मान्डुन नो उपयोग, कारण परत वादच होतील आपलेच मुद्दे घेऊन.

अनिष्का - हायपर नको होऊस. हयांचा विषय जरी तसाच असला तरी भाषा बरीच संयमित आहे त्यामुळे बेनिफिट ऑफ डाऊट दिलच पाहिजे की हे हिम्बो ते झोयो नसतील.

ह्या विषयावर कितीही बोलले तरी कमीच आहे कारण मोस्ट सगळ्या पुरुषांच्या मनात (खूप खूप कमी अपवाद) कुठल्या तरी कोपर्‍यात मी पुरुष आहे मी श्रेष्ठ आहे ही भावना असतेच. काही शे वर्षांचे संस्कार इतक्या लवकर केवळ पन्नास शंभर वर्षात जाणार नाहीत. आपण आपले न्याय्य मुद्दे न चिडता मांडत राहयचे.

आपण केवळ स्वतःला बदलू शकतो आणि केवळ स्वतःचे विचार मांडू शकतो. समोरचा जो काही विचार करतो तो आपल्या मते कितीही चूक असला तरी तो असा चूकीचा विचार करतोच का असे म्हणून आपण चिडणे किंवा रिअ‍ॅक्ट होणे आपल्यासाठीच घातक.

त्याच अनुषंगाने हिम्बो ह्यांनी स्वत;चे मुद्दे मांडलेत. आपण आपले काऊंटर आर्ग्युमेंट करतो आहोत. हे वादविवाद तोपर्यंत चालू राहणार जोवर एकही व्यक्ती अशा प्रकारचा अन्याय्य विचार करतो. अशाच संयत वाद्विवादाची समाजाला गरज आहे आणि अशा संयत वादविवादानेच एखाद्या वाचकाचे विचार बदलण्यास मदत होईल.

त्यामुळे मांडू दे सगळ्यांना आपापले मुद्दे. होऊ दे ब्रेन स्टॉर्मिंग. वाढू दे ह्या धाग्याचा टीआरपी. आपण आपले मुद्दे संयमाने मांडू नाहीतर शांतपणे वाचत राहू

.

Pages