ह्या श्वानप्रेमींचं काय करायचं ?

Submitted by मेधावि on 22 May, 2014 - 01:16

सकाळी फिरायला गेल्यावर रस्त्याच्या बाजूने विश्रांती/विरंगुळ्यासाठी जे बाक असतात त्यावर माणसांऐवजी श्वानप्रेमी त्यांच्या श्वानासकट बसतात. एका श्वानप्रेमीला श्वानास उठवायची विनंती केली असता बाक तुमच्या मालकीचे आहे का असे ऐकावे लागले. आपल्या मालकीचे बाक नसले तर श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळवावे ह्यासाठी काही नियम वगैरे असतात का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोनालिप, आई गं ... पोरगा ट्रॉमातून बाहेर पडला नं?? काळजी घे..

इथे बीचवर ही काही पाळलेली आडदांड कुत्री येतात .. पण वेल मॅनर्ड आहेत.. साखळी खेचत नाहीत कि बीच वर सुसाट पळत नाहीत, झालंच तर एखाद दुसर्‍या भटक्या कुत्र्यावर ही भुंकत नाहीत.. भटके कुत्रे ही , त्यांची स्टाईल पाहून त्यांच्या वाटेला जात नाहीत..
पण बीचवर कुणीही घाण केली तर चालवून घेण्याचीच वृत्ती दिसून येते.. माणसंच इतका कचरा करतात , त्यांना कुत्र्या ने केलेल्या कचर्‍याचे काय वाटणारे,,,
Uhoh

पर्सनली मला कोणतेही पशु पक्षी पाळायला अजिब्बातच नाही आवडत.. !!!

पुण्यामध्ये कर्वे रोडला पर्याय नाही. हा पर्याय हनुमान टेकडी, पॅगोडा टेकडी व पौड फाट्याजवळची टेकडी ह्यातून बोगदा काढून निर्माण करावा ह्या मागणीला वृक्षप्रेमींनी वर्षानुवर्षे विरोध केलेला आहे. कर्वे रोडची अवस्था दररोज कालपेक्षा अधिक भीषण होत आहे पण हे 'प्रेमी' लोक आडमुठेपणा करण्यात धन्यता मानत आहेत. >>>>>>>१००+

मुठा नदी काठच्या रस्त्याला पण ह्या मंडळींनी विरोध केल्यामुळे मुहुर्त लागत नाहीये. सुप्रिम कोर्टा पर्यंत जातात ही लोक. निकाल विरुद्ध लागला तर न्यायालयानी मोठा दंड ठोकला पाहीजे ह्यांच्यावर.

हा चार्ट ठाणे सिव्हीलला लावलेला. आपल्याला हि माहिती हवी म्हणुन इथे देतेय. बर्‍याच जणांना हे माहित असेलही.

IMG-20140527-WA0002.jpg

मला बाईट साईटला इंजेक्शन दिलं नव्हतं Sad
अर्थात् मला नुसतेच दात लागले होते, त्यामुळे कॅटेगरी ३ एक्स्पोजर की काय ते ठाऊक नाही.
बाकी ताबडतोब डॉ.कडे गेल्यामुळे त्यांनीच ती जखम धुणे, अँटीसेप्टीक लावणे इत्यादी सोपस्कार केले होते.
तो पाच दिवसांचा रेबीप्युर इंजेक्शनचा कोर्स पूर्ण झाला होता.

सोसायटी मिटिंगमध्ये असे भटके कुत्रे न पाळण्याबद्दल नियम करता येईल का ? अर्थात कमिटीवरचेच सदस्य प्राणीप्रेमी असतील तर कठीण आहे.

>>> मी पहिल्या पानावर दिलेल्या लिंक्स वाचल्या तर बरेच मुद्दे लक्षात येतील. मुळात याबाबत काही ठोस नियम नाही आहेत. म्युनिसिपालटीचे काही नियम आहेत. काही काही सोसायट्यांनी केलेले नियम / केसेस नेटवर उपलब्ध आहेत. पण सर्वंकष अशी पेट पॉलिसी कुठेही दिसत नाही. पेटा आणि तत्सम भूतदयावादी संस्थांनी नेट लावून त्यांना योग्य असे काही कोर्टाचे निर्णय मिळवले आहेत. पण हे म्हणजे लाभ तर सर्व हवे पण जबाबदारी नको अशा पद्धतीचं झालं आहे. असले अर्धवट निर्णय मिळवून अशा संस्था भस्मासुरासारख्या चेकाळल्या आहेत असं म्हणणं म्हणजे अतिशयोक्ती ठरू नये.

सोसायटीतले पाळीव कुत्रे कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सोसायटी काही नियम करू शकते. त्यांची अंमलबजावणी करण्याचा आग्रह धरू शकते. पण दोन्ही बाजूंनी समजूतीनं मार्ग काढण्याची गरज आहे.

उदा. उंच बिल्डिंगमध्ये रहात असाल तर कुत्रेही लिफ्ट वापरणारच. पण फारतर एखादी लिफ्ट त्यांच्या वाहतुकीकरता नेमून देता येईल. किंवा लिफ्टमध्ये दोनपेक्षा जास्त माणसं असतील तर तेव्हा कुत्रा घेऊन लिफ्टमध्ये जाता येणार नाही. किंवा लहान कुत्रा असेल तर लिफ्टमध्ये उचलून घेणे असा नियम करता येतो.

बागेमध्ये कुत्रे फिरवण्यास मनाई करता येते. घाण उचलणे बंधनकारक करता येते.

किंवा बागेचा एक ठराविक हिस्सा कुत्र्यांसाठी राखून ठेवता येईल. त्याभोवती कुंपण घालता येईल.

सोसायटीमधील इतर मोकळ्या जागी फिरताना कुत्र्यांना टाईट लीशवर ठेवणे बंधनकारक करता येईल.

या अजून काही लिंक्स. सर्व काही कुत्र्यांवर आणि अर्थात त्यांच्या मालकांवर अन्याय होत आहे आणि त्यांच्या जगण्याच्या मुलभूत हक्कांवर गदा येत आहे अशा टाईपच्या केसेस वाटल्या. आम्ही आणि आमचं कुत्रं सुखात राहिलो की झालं. बाकीचं जग गेलं उडत!

http://www.firstpost.com/mumbai/should-dogs-pee-in-compounds-fancy-mumba...
http://www.mumbaimirror.com/mumbai/others/Cannot-ban-pets-in-societies-A...
http://timesofindia.indiatimes.com/india/Pet-peeve-in-Mumbai-housing-soc...
http://timesofindia.indiatimes.com/india/Dogs-part-of-family-can-use-lif...
http://www.nolo.com/legal-encyclopedia/smart-landlord-policies-pet-frien...

मोनाली, वाईट वाटलं वाचून! तुमच्या बाळाला लवकर बरं वाटो. जन्मभरासाठी त्याला कुत्र्यांचा धसका बसला नाही तर नवल!

पुण्यात आणि ठाण्यात दोन्हीकडे मोकाट आणि भटक्या कुत्र्यांचा अनुभव घेतला. ठाण्यात हा त्रास का कोण जाणे पण जास्त वाटला.

भूतदया उतू जाऊन, आवर्जून या कुत्र्यांना खायला घालणारी मंडळी तर दोषी आहेतच. पण घरातला कचरा कचरापेटीत न टाकता रस्त्याच्या कडेला, उकिरड्यांवर अन्नं फेकणारे लोकही या कुत्र्यांना पोसायला अप्रत्यक्षरित्या कारणीभूत आहेत.

कुत्रेप्रेमी संघटना इतक्या बोंबा ठोकून त्यांच्या संरक्षणासाठी आटापिटा करतात. याच न्यायानं भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा असं वाटणारे, रस्ते आणि वस्त्या सुरक्षीत व्हाव्या म्हणून आग्रह करणारे, संख्येने जास्त असलेले लोक एकत्र येऊन काही करू शकतो का?

मृण्मयी, रस्ते आणि वस्त्या सुरक्षीत व्हाव्या म्हणून आग्रह करणारे, संख्येने जास्त असलेले लोक एकत्र येऊन काही करू शकतो का?>>> मला तर कुठेही कुत्रा दिसला तरी हात असले शिवशिवता आहेत हल्ली. अस वाटते सरळ मारुन टाकावे त्यांना. नाहीतर रोज वेगवेगळ्या एरीयात जाउन विषारी काहितरी खायला ठेवुन यावे. मरु देत साले जरा लोकांना धड चालता येईल रस्त्यातुन.

बाजुच्या देवळातल्या पुजार्‍याला (ठाण्याच्या) भास्कर कॉलनीत चावला कुत्रा. चारजण भांडत होते व इकडे तिकडे पळत होते (कुत्रे) त्यातला एक आला नी यांना चावला. आता बोला. भुतदया घाला चुलीत अशी वेळ आहे ही.

बी एम सी ने वाचला बहुतेक बाफ. आताच पारल्यात त्यांची डॉग व्हॅन फिरत होती. आत ४-५ कुत्री देखिल होती. त्यांना विचाराय्चे होते कि त्यांचे काय करतात पण गाडी लगेच निघुन गेली.
कोणाला माहित आहे का कि त्यांचे काय करतात, परत सोडतात इंजेक्शन देउन कि कोंडवाड्यात भरती करतात कायमची?

आपल्याला जर कुत्र्यांची भीती वाटत असेल आणि कुत्रे पाळलेल्या घरी जायची वेळ आली तर बरोबर एक-दोन बरण्यांमधे एक मोठी पाल, एक महाप्रचंड (पण बिनविषारी) कोळी इ. घेऊन जावे. जर कुत्र्याच्या मालकांनी तुम्हाला वाटणारी भीती पाहूनही बळेच "तो काही करत नाही" वगैरे म्हणून त्यांच्या लाडक्या कुत्र्याला मोकळं सोडलं, तर बोलण्याच्या ओघात त्यांना आपल्या बरणीतले प्राणी अत्यंत प्रेमाने दाखवायचे, आणि (त्यांच्या प्रतिक्रियेच्या हिशोबाने) त्यांचंच वाक्य त्यांना ऐकवून बरणीचं झाकण उघडायचं. Happy

हे जरी मी विनोदानं लिहिलेलं असलं तरी एक गोष्ट नक्की - प्रत्येक माणसाला कशाचा तरी फोबिया असतो, आणि त्या भीतीचा अनुभव दिला तर त्याला इतरांना आपल्या कुत्र्याबद्दल वाटणार्‍या भीतीची जाणीव होऊ शकते.

मला हा उपाय भयंकर म्हणजे भयंकरच आवडला आहे. पाल, झुरळ, कोळी वगैरे मंडळींची मला भिती वाटत नाही.

:उद्यापासून घरातले डाळ-तांदळाचे डबे रिकामे करून ते या प्राण्यांनी भरायला सुरवात करावी का या विचारात पडलेली बाहुली:

ए शीऽऽ मामी! २-३च पाली, झुरळं, कोळी पाळ. त्यांना फिरायला पण ने रोज हवंतर.

मुद्दाम कुत्रे आपल्या अंगावर सोडून आपली फजिती बघून खुश होणार्‍या लोकांच्या मनोवृत्तीला एकदा जरी .....

"ही आमची छकुली पाळीव पाल 'करीना'. काह्ही करत नाही. करिने, चाट गं ह्यांचे पाय, बस गं ह्यांच्या हातावर." असं करुन हादरवलं तर कळेल कसा ठोका चुकतो ते.

"ही आमची छकुली पाळीव पाल 'करीना'. काह्ही करत नाही. करिने, चाट गं ह्यांचे पाय, बस गं ह्यांच्या हातावर." असं करुन हादरवलं तर कळेल कसा ठोका चुकतो ते.

>>> Biggrin

बरणीतले पाळीव प्राणी कोणाला दाखवायचे? कुत्र्याला की त्याच्या मालकाला? मालकाला दाखवायचे तर त्याचा कुत्रा जवळ असताना दाखवून उपयोग नाही. प्राणी जातील, बरणीही जाईल, हात कसा वाचवायचा ते पहावे लागेल.

सगळेच Lol
आणि आमच्यासारखे पामर जे पालींनाही घाबरतात त्यांनी काय करायचं?

एवढा सगळा टीपी आणि काथ्याकूट करूनही शेवटी ठोस उपाय हाती लागले का? म्हणजे तशी अधिकृत नियमावली वगैरे आहे का अस्तित्वात? श्वानमालकांच्या जबाबदार्‍यांची?

मोनाली, आता मुलगा बरा आहे का? काळजी घेणे.

बरणी चिनीमातीची घ्यायची. ट्रान्स्परंट नाही. प्रयोगशाळेत असतात ना वर रबरी नळी घालायला भोकं असलेल्या, तशी. मग डायरेक्ट मालकाजवळ जाऊन लाडाने आतला प्राणी छू करायचा. कुठे बसेल तिथे बसेल. बसा बोंबलत. मग कुत्र्यामुळे आपण बोंबलू, कुत्रा तर बाय डीफॉल्ट बोंबलतच असेल आणि आपल्या छोट्याश्या (न बोंबलणार्‍या) पाळीव प्राण्यामुळे कुत्र्याचा मालक बोंबलत असेल....नुसती बोंबाबोंब Rofl

केश्वे, कोळी, पाल, झुरळे यांना न घाबरणारे महाभाग माहितीचे आहेत. समोरची व्यक्ती त्यातली असली तर काय करायचं? Uhoh

वरदा, मी सुद्धा कोळी, पाल, झुरळ ह्यांना घाबरत नाही अज्जिबात. पण हे लोक्स (?) अंगावर बसणं वगैरे बेक्कार वाटतं. पाल तर अगदीच गिळगिळीत. त्यात तिची त्वचा कोमल ट्रान्स्परंट असेल किंवा सरडा टाईप खडबडीत असेल तर आपलं काम फत्ते! ती जाम चिकटून पण बसेल, कोळी/झुरळासारखी हाताने उडवता पण येणार नाही Proud

हा हा हा... मी पण दुष्ट झाले Wink

मी कधी असं जन्मात करणं शक्य नाही. त्यापेक्षा त्या कुत्रे अंगावर सोडणार्‍यांच्या घरी जाणं सोडणं बेस्ट.

केश्वे, घरी जाणं टाळता येतंच. मी तर अनोळखी लोकांकडे जाताना आधी चौकशी करतेच कुत्रा आहे का म्हणून...
पण इथे चर्चा चाललीये ती कुत्रेमालकांच्या सार्वजनिक ठिकाणच्या वागणुकीची...

बॅग्झ, मामे, केश्वे काय धुमाकुळ घालताहात तुम्ही?

वरदा धन्स गं. Happy हो बराय तो आता. जेथे नखे वरवर लागली तेथील खपली निघुन जातेय. जेथे खोल जखमा होत्या त्या भरायला मात्र अजुन ८-१० दिवस जातील असे वाटतेय.

उद्या जायचे टुच्चु करायला नी परवा त्याच्या डॉक कडे. पाहु परवा ती काय म्हणते. एकतर हा उन्हाळा नी त्यात हेवी औषधे चालु आहेत. पण घेतो तो तसाही औषधे, सो अ‍ॅम नॉट वरीड अ‍ॅट दॅट फ्रंट Happy

एका वेगळ्या धाग्यावर अमानी खालील प्रतिक्रिया दिली आहे.

shwan premi/shwan dweshi pan add kara.

इथे का लिहिलं नाही माहित नाही. कदाचित कुत्रे न आवडणार्‍यांच्या भावना महत्त्वाच्या वाटत नसतील. असो. तर त्या अनुषंगानं सांगावसं वाटतं की :

अमा, इथेच घोळ होतो. श्वानप्रेमी नाही म्हणजे लगेच कोणी श्वानद्वेषी ठरत नाही. असूही शकतात, नसूही शकतात. उदा. वेल बिहेव्ड दांडगी कुत्री आजूबाजूला असतील तरी मला चालतात. पण एखादं छोटं कुत्रं जरी अंगावर येतंय असं वाटलं, अतिप्रेमळपणा दाखवू पहात असेल तर मला झेपत नाही. मी कुत्र्याला हात लावू शकते पण त्या कुत्र्याने मला येऊन चाटणे वगैरे आवडत नाही.

जसं समजा अंडी न आवडणारे लोक असतात. पण म्हणजे ते अंड्यांचा द्वेष करतात असं नाही. त्यांना केक वगैरे मधली अंडीही चालतात पण डायरेक्ट अंडी खाववत नाहीत..... अशा लोकांना 'तुम्ही अंडी खात नाही म्हणजे काय? आवडलीच पाहिजेत. कशी नाही आवडत तेच बघतो!' असं म्हणून मुद्दाम त्यांच्या तोंडात अंडी कोंबली तर चालतील का?

हे इतकं सोपं कळून घ्यायला काय हरकत आहे?

मालकांच्या अशा आडमुठ्या आणि विचित्र वागण्यामुळे कुत्रे न आवडणारी लोकं पुढे श्वानद्वेषी झाली तर तो दोष कुणाचा?

Pages