ह्या श्वानप्रेमींचं काय करायचं ?

Submitted by मेधावि on 22 May, 2014 - 01:16

सकाळी फिरायला गेल्यावर रस्त्याच्या बाजूने विश्रांती/विरंगुळ्यासाठी जे बाक असतात त्यावर माणसांऐवजी श्वानप्रेमी त्यांच्या श्वानासकट बसतात. एका श्वानप्रेमीला श्वानास उठवायची विनंती केली असता बाक तुमच्या मालकीचे आहे का असे ऐकावे लागले. आपल्या मालकीचे बाक नसले तर श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळवावे ह्यासाठी काही नियम वगैरे असतात का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी,

तुमची पोष्ट पाहिली नव्हती. आत्ता पाहिली. त्या आधी विचार करत होतो की मामी कशा नाही दिसल्या? तुमच्या श्वानकन्ये विषयी एक लेख पूर्वी कधी वाचला होता. आवडला होता. Happy

भटक्या कुत्र्यांबाबत पालिका काही उपाय करत नाही का तक्रार केल्यास?
मी पण कुत्रीद्वेषीच होते पण आता बहुतेक श्वानप्रेमी होते आहे हळूहळू Happy पण ह्या बदलाचं कारण केवळ मस्त ट्रेन केलेली, मालकाने बस म्हटलं की बसणारी आणि उठ म्हटलं कीच उठणारी कुत्री आणि कुत्र्याची शी उचलणारे, आपल्या कुत्र्याचा कुत्र्यांना घाबरणार्‍या लोकांना त्रास होउ नये म्हणून खरोखर काळजी घेणारे मालक/मालकिणी

भटक्या कुत्र्यांबाबत पालिका काही उपाय करत नाही का तक्रार केल्यास? <<
पालिकेने काहीही करायचं म्हणलं की कुत्रेप्रेमी संघटना धावत येतात. त्यांना लहान मुलांना भटक्या कुत्र्यांनी फाडलं तरी फरक पडत नाही मात्र भटक्या कुत्र्यांना काही केलेलं चालत नाही.

पालिकेने काहीही करायचं म्हणलं की कुत्रेप्रेमी संघटना धावत येतात. त्यांना लहान मुलांना भटक्या कुत्र्यांनी फाडलं तरी फरक पडत नाही मात्र भटक्या कुत्र्यांना काही केलेलं चालत नाही.>> +१

मलाही कुत्र्यांची जबरदस्त भीती वाटते. वेल-ट्रेन्ड, वेल-मॅनर्ड कुत्री असतील तर ठीक आहे, लांबून बघायला आवडतात. पण त्यांचे मालक-मालकीण हा बरेचदा उच्छाद असतो. 'ते काऽही करत नाही' असा त्यांचा गोड गैरसमज असतो.
भटकी कुत्री आणि सायकल/दुचाकीवरचे आपण हा चित्तथरारक पाठलागही खूप वेळा अनुभवला आहे..

आपल्या पाळीव प्राण्यांमुळे घरी येणार्‍या पाहुण्यांना, बाहेरच्यांना त्रास होऊ नये ही बेसिक गोष्टसुद्धा लोक लक्षात का घेत नाहीत देव जाणे!

आमच्या घरच्या कुत्र्यानेच कुत्र्याविषयी नावड उत्पन्न केली.नंतर कुत्रे किती unconditional प्रेम करतात हेही पाहिले.तरीही कुत्र्याविषयीची आवड, म्हणजे शेजारच्या मुलाचे आपल्या सवडीने/आवडीने केलेल्या लाडाइतकीच राहिली आहे.

लॉस अँजलिस म्हणजे कुत्रांचं नंदनवन Proud
कुत्री ही इथली फॅशन स्टेटमेन्ट्स !
एकेका कडे तीन कुत्री असणे काही अनकॉमन नाही :).
तर , शिकलेय इतकच कि श्वानप्रेमींचं आपण काही करु शकत नाही पण त्यांच्या रुड गेश्चर ला जशास तसे उत्तर देता येतं आपल्यालाही!
त्यांचं कुत्रं आपल्या अंगावर येतं - उड्या मारतं-चाटतं - चुकून दात -नखं लागु शकतात याचा विचार न करता ते श्वनप्रेमी आपल्याला म्हणतात" डोन्ट वरी ही इज सुपरफ्रेंड्ली'
यावर रुड उत्तर द्ययाला शिकलेय मी " वेल मे बी ही इज फ्रेंड्ली बट आयॅम नॉट, इफ आय फील ही इज हर्टींग मी , आय हॅव टु रिअ‍ॅक्ट टु"

जे लोक कुत्र्याला पट्टा न लावता फिरायला नेतात त्यांच्या तक्रारी केल्यायेत मी सोसायटीच्या लिजिंग ऑफिस मधे आणि त्यांना त्या बद्दल नोटीस मिळालीये यात काहीसं समाधान !
एका क्लोज फ्रेंड नी नुकताच जर्मन शेफर्ड पाळलाय , दर वर्षी अमाची एकमेकींकडे ट्रिप असते , यावेळी जायला घबरत होते म्हणून तिने प्रॉमिस केलं कि कुत्र्याची रुम वेगळी असते आणि तू असताना तो त्या रुम्स मधे येणार नाही !
प्रत्यक्षात मात्रं गेल्यावर कुत्रं हवं तिथे भटकत होतं , आल्याआल्या त्या वाघासारख्या कुत्र्यानी ओळख परेड चाटणे प्रकार केलाच .
जेमतेम अर्धा तास त्या न्यु बेबीचं कौतुक आणि प्रात्याक्षिकं पाहून आय कुडन्ट टेक इट एनीमोअर .. बॅग्स उचलल्या आणि निघून गेले दुसरीकडे रहायला :).
मैत्रीत दुरावा वगैरे मला कशाची परवा नाही माझ्या सुरक्षित- कंफर्टेबल असण्यापुढे !

शंभरावा प्रतिसाद Happy

रस्त्यावरच्या कुत्र्यांची भयंकर भिती वाटते आणि पाळलेल्या कुत्र्यांबरोबर ( त्यांना आवरु न शकणार्‍या ) मालकांचीही. कुत्रा असलेल्या घरी जात नाही कारण माझ्यासाठी त्यांच्या कुत्र्याने अल्प काळासाठी का होईना पण त्याच्याच घरात कानकोंडं होऊन राहावं अशी इच्छा नाही !

>>कुत्रा असलेल्या घरी जात नाही कारण माझ्यासाठी त्यांच्या कुत्र्याने अल्प काळासाठी का होईना पण त्याच्याच घरात कानकोंडं होऊन राहावं अशी इच्छा नाही !>> बरोबर आणि ते योग्यही नाही. कुत्रा मालक आग्रह करकरून लोकांना घरी बोलावत असतील तर कुत्र्यांना दुसरीकडे ठेवणं, बांधून ठेवणं ही जबाबदारी त्यांची आहे. पूर्वी कुत्र्यांची भयंकर भिती वाटायची पण आता जवळच्या मैत्रिणीकडे कुत्रा आल्यामुळे निदान ओळखीच्या दोन तीन कुत्र्याची वाटेनाशी झाली आहे. एकूणाच घरात कुत्री, मांजरी असणं मला हायजेनिक वाटत नाही. त्यांचे केस शेड होणं किंवा घरात भरून राहिलेला त्यांचा वास, बेड, सोफा सगळीकडे मुक्त संचार इ अनेक कारणांनी.

भटक्या कुत्र्यांना मात्र गोळ्या घालून मारण्याशिवाय दुसरा पर्याय मला दिसत नाही. निदान डार्ट्वाल्या बंदुकींनी मारून बेशुद्ध करून उचलणं वगैरे काहीतरी करायलाच हवं.

एक मस्त एयर रायफल आणून ठेवलेली आहे. नजरेच्या टप्प्यातही कुत्रं दिसलं तर त्याला फटका बसतो. आजुबाजुच्या सर्व कुत्री मालकांना जाहिर सूचना देऊन ठेवलेली आहे, की बःउंकून डोके फिरवले अथवा अंगणात घाण करताना दिसले तर पाळीव व भटके असा भेदाभेद मी करीत नाही.

मलादेखिल कुत्रा आणि त्यांचे निर्ढावलेले मालक हे दोन्ही प्राणी आवडत नाही.

मला लहानपणी कुत्रा चावला होता, तेव्हा श्वानदन्शाची इंजेक्शन्स घ्यायला दवाखान्यात जायचो, त्यावेळी एका ३-४ वर्षाच्या मुलीला पाहिले होते. भटक्या कुत्र्यांनी तिच्या हाताचे नि पाठीचे लचके तोडले होते. किती भयानक वेदना झाल्या असतील त्या मुलीला.

वेल मे बी ही इज फ्रेंड्ली बट आयॅम नॉट,>> डीज्जे हे बेस्ट आहे Happy

माझ्याही कुत्र्याविषयी भयानक ट्रॉमटायझिंग आठवणी आहेत टीनेज मधल्या... पण आता विचार करता लक्षात येतं की त्याला जबाबदार त्यांचे मालकच होते १००%. खरच भितीने हार्ट्फेलच होता होता राहिला होता...
रिस्पॉन्सिबल डॉग ओनर कसं असावं याचं काही ट्रेनिंग डॉग विकत घेताना ब्रीडरने आणि/किंवा व्हेटने द्यायलाच हवं भारतात.

पालिकेने काहीही करायचं म्हणलं की कुत्रेप्रेमी संघटना धावत येतात. त्यांना लहान मुलांना भटक्या कुत्र्यांनी फाडलं तरी फरक पडत नाही मात्र भटक्या कुत्र्यांना काही केलेलं चालत नाही.
>>>> हं.. हे फार वाइट आहे खरच.

आमच्या भागात तर एक गुज्जु गृहस्थ आहेत, जे रोज सकाळी पुण्यप्राप्तीसाठी भटक्या कुत्रांसाठी पारले जी बिस्कीटांचा लंगर चालवतात.

त्यातली इतस्ततः पडलेली बिस्कीटे जी कुत्रांनी खाल्लेली नसतात, ती बिस्किटे जेव्हा दुपारी कचरा गोळा करणारी मुले वेचुन खातात, ते पाहताना जीव कळवळतो.

त्या गृहस्थांना सांगितले की पारले जीची बिस्किटे कुत्र्यांऐवजी गरीब माणसांना द्या तर म्हणे "माणसांना भुक लागली तर ते दुसर्‍यांकडे अन्न मागु शकतात. हे मुके जीव कुठे जाणार?"

आमच्या शेजारच्या सो कॉल्ड गरीब (?) वस्तीतले लोक त्यांची पाळीव कुत्री फिरायला आमच्या दारात आणतात आणि ती जनावरं दारात घाण करून जातात. येता जाता आमचेच पाय त्यात भरतात आणि डोक्याला ताप होतो. ह्या श्वान मालकांना त्याबद्दल काही बोललेलं चालत नाही. "कुत्रा वास घेऊन त्याच ठिकाणी परत घाण करतो" हे तत्वज्ञान ऐकावे लागते. वर नंतर ते मुद्दामुन कुत्र्याला तिथेच घेऊन येतात असं दिसलं.
शेवटी त्यावर मस्त उपाय सापडला. अशी कुत्र्याची घाण दिसली कि त्यावर तीव्र वासाचे परफ्युम किंवा मुंग्या मारायचे औषध (गॅमॅक्सिन वा तत्सम) टाकावे. दुसर्‍या दिवशी कुत्रा जवळपास येतो पण दुसर्‍या तीव्र वासामुळे भंजाळुन दुसरीकडे जातो. (त्याच्या नाकाचं काय होत असेल देव जाणे Sad )

कुत्रा असलेल्या मित्रांकडे गेल्यावर त्यांच्या लाडक्यानी आपल्या अंगावर चढाई करून आपला जीव निम्मा करावा आणि त्याच्या मालकानी "अरे काही करत नाही ते" असं म्हणत रहावं, ह्याचा एवढा वैताग आला कि आम्ही त्यांच्या घरी जाणं सोडलं. तर आता हा कुत्र्याला घेऊन आमच्या घरी येतो! कुत्र्याला घेऊन येऊ नको हे अजुन स्पष्ट कसं सांगावं हा प्रश्न पडला आहे आम्हाला.

कुत्र्याला घेऊन येऊ नको हे अजुन स्पष्ट कसं सांगावं हा प्रश्न पडला आहे आम्हाला. <<
असल्या ठिकाणी भीडभाड बाळगायची नाही. सरळ तोंडावर सांगून टाकायचं. पुणेकर आहात ना मग तसंही आपलं नाव खराबच आहे. निदान त्या रेप्युटेशनला तरी जागा.
ते जमत नसेल तर मला कुत्र्याच्या केसांची अ‍ॅलर्जी डेवलप झालीये असं सांगा.
फोन करून येतो म्हणाला मित्र तर त्याला टाळा काहीही फेकाफेकी करून पण ती अशी करा की आपल्याला टाळलं जातंय हे त्याला कळलं पाहिजे.
(हे सेमीसिरीयसली घ्या!)

घर तुमचं आहे, तुमच्या घरात पाळीव प्राणी आणायचा की नाही हा तुमच्या घरातल्यांचाच निर्णय असायला हवा. हे सिरीयसली घ्या.

घाण करण्यावरून आठवलं...
बाजूच्या सोसायटीमधल्यांचा एक कुत्रा बरोबर आमच्या दारात येऊन घाण करायचा...आणि कहर म्हणजे मालकाकडे तक्रार केली तर म्हणे तो आमचाच कुत्रा आहे कशावरून....
मी म्हणलं...ठिकाय...मी गच्चीत टोकदार दगड आणून ठेवले आहेत आणि जो कुठला कुत्रा घाण करताना दिसेल त्याला बरोबर तो बसेल. मग माझ्याकडे येऊ नका....

हा उपाय फारच जालीम ठरला कारण त्या मालकाने कुत्र्याला पटवले का काय केले माहीती नाही पण परत काय कुणी घाण केली नाही.

सगळ्यांना अनुमोदन.
मलाहि कुत्र्यांची प्र चं ड भिती वाटते. अगदी लेच्यपेच्य बावळट कुत्र्यांचि पण भिती वाटते आणि नको नको होते. कुत्रे मांजरं असलेल्या, ते घरभर फिरणार्‍या, त्यांचे केस जिथे तिथे पडलेल्या घरात मी जास्त टिकू शकत नाही.
कुत्र्यांचे आगाऊ मालक ही माझी अत्यंत नावडती जमात आहे. मामी, नीधप व सगळ्यांच पोस्टींना शतशः अनुमोदन.

बर ही सोसायटीतील कुत्रा प्रेमी मंडळी कशी तर ही भटकी कुत्री त्यांची लायसेन्स धारी कुत्री नव्हेत त्यामुळे त्यांना त्यांची उस्तवारी तर करावी लागत नाही ( शी/शु/ अंघोळ/ रोजच्या रोज जेवण /फिरायला नेणे वगैरे वगैरे )
पण त्यांनी स्व खर्चाने त्यांच्या गळ्यात पट्टे बांधले आहेत त्यांना नंबर दिले आहेत . अधून मधून त्यांच्या मनात आले कि त्यांच्या करता ताट वाढून सोसायटीच्या आवारातच ठेवतात. कोणी कुत्र्यांना हाडूत हुडूत केले तर त्या लोकांना ही मंडळी रागावतात पण त्यांची जबाबदारी मात्र काही नाही . अजबच आहे सगळ Sad

कुत्रे मांजरी जे लोक पाळतात त्यांच्या घरी एक विशिष्ट प्रकारचा गंध येतो घाणेरडा
या लोकांना जाणवत नाही का तो

मी म्हणून कुत्रे असलेल्या घरी जायचे टाळते

वरच्या सर्व पोस्टिना अनुमोदन
स्पेशली अग काssssssssही करणार नाही तो या वाक्यानंतर मालकाना सुनावायची जाम इच्छा होते

मुंबईत असताना माझ्या घरी पंधरा वर्ष कुत्रा होता. योग्य काळजी घेतली आणि योग्य त्या सवयी लावल्या तर कुत्र्यासारखा मित्रं नाही. त्याला खाली नेल्यावर त्याची घाण काढण्याचं काम मी मुंबईतही करत असे. यावरून मला हसणारे अनेक लोकही भेटले. "कुत्र्याची घाण कशाला काढतोस?" असा छद्मी सवाल करणार्‍या काकांना मी फक्तं इतकंच विचारलं, "तुम्हाला पॅक करुन हवी आहे का ? पाय भरायला हवा आहे का ?" काकांनी माझ्याशी बोलणं टाकलं, पण मला त्याची पर्वा नव्हती.

अर्थात अनेकदा कुत्र्यांपेक्षा त्यांचे मालक जास्तं चावरे असतात (अस्मादीक अपवाद!) हा माझाही अनुभव आहे. कुत्रा पाळा, त्याचे हवे ते लाड करा, अगदी वरात काढून लग्नं पण लावा हवंतर (असंही त्यांचा हनिमून कुठे ना कुठे दिसतच असतो), पण त्याचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं हे मालकाचं कर्तव्य आहे.

भटकी कुत्री हा मात्रं सार्वजनिक भीतीचा आणि तिरस्काराचा विषय आहे. जो पर्यंत मनेका गांधी आणि कुत्र्यांच्या नावाने गळा काढणार्‍यांवर एकदा तरी भटक्या कुत्र्याचा अनुग्रह होत नाही, तोपर्यंत कुत्रा परवडला अशा जोशात हे चावणार हे निश्चीत !

स्पार्टाकस शी सहमत आहे
आता प्राणीमंत्री मेनका गांधी येतील व भटक्या कुत्र्यांसाठी नसबंदी मोहिमेला निधि उपलब्ध करुन देतील अशी आशा करु या!
अवांतर- मूळ धागा हा श्वानद्वेषाकडे भरकटणार याचे भाकीत मी अगोदरच (मनाशी) वर्तवले होते.

मुंबई मधली एक बातमी वाचली होती त्याची आठवण झाली. चेंबूर मधे एका माणसाने कसल्याशा गोळ्या पसरवून ठेवल्या रस्त्यावर जिथे भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव होता तिथे. एकदम चाळीस कुत्री मेली. पोलीसांनी "अज्ञात व्यक्ती" विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पण मला आयडीया आवडली Wink

गेल्या पावसाळ्यातली एका संध्याकाळची (४ : ४:३०) गोष्ट. रिमझिम पाऊस. छत्री उघडलेली होती. घरी परतत असताना दोन कन्यका लीझर वॉक घेत होत्या. अचानक कुठूनसं, लांबून गोड वाटेलसं कुत्र (पॉमेरियन वा तत्सम जातीचं) , मी त्याच्यासाठी "तुमको मेरे दिन ने पुकारा है बडे नाज से" असं म्हटल्यासारखं माझ्यादिशेने धावत सुटलं. प्रतिक्षिप्त क्रियेने माझी छत्री स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर उगारली गेली. तेव्हा त्या दोन कन्यकांपैकी एकीने त्या कुत्र्याला कोणतंही गाणंबिणं न म्हणता पण विंग्रजी गद्यात आपल्याकडे बोलवून घेतलं. मी त्या दोघींना क्रॉस होऊन पुढे आल्यावर माझ्या मागे "दॅट मॅड गाय वॉज गोइंग टु हिट हिम ऑर व्हॉट?" असं मौक्तिक कानी पडलं. तेव्हा अबाउट टर्न करून "तुझं कुत्र रस्त्यात फिरत असेल तर त्याच्यावर कंट्रोल ठेवणं हे तुझं काम आहे. रस्त्याने चालणार्‍या प्रत्येक माणसाला कुत्र्यांबद्दल प्रेम असलंच पाहिजे असा नियम नाही. मला कुत्र्यांची (मग ती केवढीही असोत) भीती वाटते आणि यात काही चुकीचं नाही" असं सुनावलं.
अर्थात कुत्रा छत्रीला बधला तरी मालकीण वादाने बधली नाही. शेवटी दोघांनी एकमेकांना आपापली वाट धरा असे सांगून निघालो.

हा माझ्या पाहण्यातला प्रसंग. एक ज्ये.ना. (साठीच्या आसपास) . त्यांची शेजारीण , तीही त्यांच्यापेक्षा ज्ये.ना. आपल्या अतिभव्य कुत्र्याला फिरायला घेऊन निघालेली. पट्टा बांधलेला होता. या ज्ये.ना.नी तिला सुचवले की हा कुत्रा तुम्हाला आवरणार नाही. बोलाफुलाला गाठ म्हणून कुत्रा उधळला आणि बाई फरफटत जाऊ लागल्या. या ज्ये.ना. तिला आधार द्यायचा प्रयत्न केला तर कुत्र्याला वाटले की तो तिच्यावर हल्ला करतोय. कुत्र्याने चक्क त्यांच्यावरच हल्ला करून चावा घेतला!

मेडिकल इन्शुरन्स सदृश (ज्ये.ना.साठी हॉस्पिटलयाझेशन झाल्यास उपयोगी अशा) आमच्या एका योजनेत त्या श्वानदंशावरच्या उपचारांची भरपाई मिळेल का हे विचारायला ते आले होते. म्हणजे शेजारणीने भरपाई केली नाही हे उघडच आहे.

त्या श्वानदंशावरच्या उपचारांची भरपाई मिळेल का>> हो! आमच्या मेडिकल इम्शुरन्समध्ये श्वानदंशावरच्या उपचारांची भरपाई मिळण्याची तरतूद आहे. हा एकमेव ओपीडी उपचार आहे ज्याची आम्हाला भरपाई मिळते.
म्हणजे श्वानदंश किती गंभीर आहे Sad

मूळ धागा हा श्वानद्वेषाकडे भरकटणार याचे भाकीत मी अगोदरच (मनाशी) वर्तवले होते.

>>>> असं काहीही झालेलं नाहीये. उगाच सारखं सारखं तेच तुणतुणं वाजवत बसू नका.

स्पार्टाकस, छान पोस्ट.

हे असेच वर्तन कुत्र्यांच्या मालकाकडून अपेक्षित आहे. मी पाच मुद्दे दिले आहेत ते जर मालकांनी पाळले तर इतरांना उपद्रव होणार नाही. कुत्र्याच्या मालकांना एक गोष्ट लक्षात येत नाही की त्यांच्या अशा उद्दाम वागण्यामुळे उलट परिणाम होऊन इतरांना कुत्र्याबद्दल अधिकच तिटकारा निर्माण होतो.

कुत्र्यांबद्दल काही तक्रार नाही. तो एक पाळीव प्राणी आहे आणि तो त्याच्या निसर्गनियमानुसार वागणार. पण तेच त्याला लाडावून ठेवले की तो उपद्रवकारक ठरतो.

सुमेधाव्ही, कृपया माझे पाच मुद्दे हेडरमध्ये टाकणार का?

Pages