ह्या श्वानप्रेमींचं काय करायचं ?

Submitted by मेधावि on 22 May, 2014 - 01:16

सकाळी फिरायला गेल्यावर रस्त्याच्या बाजूने विश्रांती/विरंगुळ्यासाठी जे बाक असतात त्यावर माणसांऐवजी श्वानप्रेमी त्यांच्या श्वानासकट बसतात. एका श्वानप्रेमीला श्वानास उठवायची विनंती केली असता बाक तुमच्या मालकीचे आहे का असे ऐकावे लागले. आपल्या मालकीचे बाक नसले तर श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळवावे ह्यासाठी काही नियम वगैरे असतात का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो मोठ्यांना सांगावा लागतो अर्थ
पण पोरांना लगेच कळतो रेफरन्स
फिरायला गेलो असताना एका चुणचुणीत पोराने नाव सांगितल्यावर लगेच विचारले की मग याला जेव्हा बाळ होईल तेव्हा त्याच नाव थॉर ठेवणार का लोकी
म्हणलं यांना एकदम भरपूर पिल्लं होतात
त्यामुळे एक थॉर, एक लोकी आणि एक हेला
असला तुडुंब खुश झाला आणि पिल्लं झाली की मला बोलवा काय असे सांगून गेला

मी सुदैवाने वायकिंग्स सिरिज पहिली असल्याने ओडीन, थॉर, रंगनारोक आणि valhala वगैरे रेफरन्स माहिती होते

पण पोरांना हे रेफरन्स अव्हेंजर्स मुळे माहिती

त्या पोराला म्हणावं की तो ओडिन पुढे ज्युनोला सून करून घेणार आहे. नंतर अफ्रोडाइटीच्या पिल्लाच्या बोरन्हाणाला ओडिनचं सहस्रचंद्रदर्शन पण लगे हात करून घेता येईल.

आमच्या सोसायटीत एक भटकं श्वान आलंय. त्याला कोणीच पाळलं नाहीये पण बरेच जण भूतदया दाखवून खायला घालतात म्हणून ते आता सोसायटीतच रहातं व केराच्या टोपल्या उधसणं, घाण करणं वगैरे गोष्टी करतं. त्याच्या गळ्यात पट्टा नाही व इंजेक्शनं दिली नसणारच. ते अद्याप तरी कोणाला चावलं नाहीये पण त्याला इथून बाहेर कसं काढावं? काॅर्पोरेशनमधे कळवायचं म्हणजे नक्की कोणाला कळवायचं असतं?

Pages