अवघड असते

Submitted by निशिकांत on 20 May, 2014 - 06:12

दार मनाचे बंद ठेवणे अवघड असते
कुणी आपुले नसता जगणे अवघड असते

रोज मुखवटे वेगवेगळे लावुन जगता
आरशासही सत्त्य उमगणे अवघड असते

लाख करू दे कैद पापण्यामधे तरीही
निरोप घेता ना ओघळणे अवघड असते

हवे नको ते आत्मचरित्री ठरवुन लिहिता
वास्तवदर्शी चित्र रंगणे अवघड असते

सॉक्रेटिसचे निर्मणुष्य बेटावर जगणे
वाचायाला मस्त, भोगणे अवघड असते

शब्द बेगडी भुरळ पाडती जिवास इतकी!
काय चालले मनात कळणे अवघड असते

डेरेदाखल जरी जाहल्या पुन्हा वेदना
हसत जगावे, सदैव रडणे अवघड असते

निवडणुकांचे घमासान चालू असताना
कोण मित्र, शत्रू ओळखणे अवघड असते

बोट मधाचे, जाहिरनामे भुरळ घालती
पिऊन मृगजळ तहान शमणे अवघड असते

गेल्यावरती सखी कळाले "निशिकांता"ला
मनास हळ्व्या किती रिझवणे अवघड असते

निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉक्रेटिसचे निर्मणुष्य बेटावर जगणे
वाचायाला मस्त, भोगणे अवघड असते<<< व्वा, मस्त खयाल! (टायपो झालेला दिसतोय, निर्मनुष्य)

शब्द बेगडी भुरळ पाडती जिवास इतकी!
काय चालले मनात कळणे अवघड असते<<< छान

डेरेदाखल जरी जाहल्या पुन्हा वेदना
हसत जगावे, सदैव रडणे अवघड असते<<< मस्त

शेर आवडले.

छानच