चांगले काहीतरी पेरू

Submitted by जयदीप. on 19 May, 2014 - 23:12

मी भ्रमाचा भोपळा आहे
मी समंजस बावळा आहे

त्या बटा तर रेशमी होत्या
कापला ज्यांनी गळा आहे

घेतला आहेस तू हा पण
अर्थ माझा वेगळा आहे

गुंतलो तेव्हा मला कळले
' मी 'च माझा सापळा आहे

चांगले काहीतरी पेरू
हा तुझा माझा मळा आहे

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगले काहीतरी पेरू
हा तुझा माझा मळा आहे>>>

मस्त, पहिल्या ओळीने अर्थाच्या अनेक शक्यता निर्माण केल्या आहेत परंतू दुसर्‍या ओळीने शेर मर्यादित झाला तरीही छानच!