सखे आता हे फार जाहले (विडंबन)

Submitted by A M I T on 12 May, 2014 - 08:18

आज चालणे उन्हात पडले, तुझ्यामुळे
डोळ्यांपुढे अंधार दाटले, तुझ्यामुळे !

घाम शर्टही भिजवत होते
तुझे इरादे बुलंद होते
मँगोला तीन-चार जाहले, तुझ्यामुळे !

"दत्तमंदीर" जनांस पुसले
प्रत्येकाचे तर्क निराळे
आत्याचे तुझ्या घर लांबले, तुझ्यामुळे !

कडेत माझ्या होती वीणा
बंडू उधळे दाही दिशांना
विंचवाचे बिर्‍हाड लाजले, तुझ्यामुळे !

घर दिसले नि आली स्फुर्ती
कुलूप होते, आत्या नव्हती
सखे आता हे फार जाहले, तुझ्यामुळे !

वर्जनल गीत : http://www.aathavanitli-gani.com/Song/Aaj_Chandane_Unhat_Hasale

* * *

http://kolaantudya.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<कडेत माझ्या होती वीणा
बंडू उधळे दाही दिशांना
विंचवाचे बिर्‍हाड लाजले, तुझ्या<<
आमट्या तुझी व्हर्च्युअल बायको आणि व्हर्च्युअल पोरं टोरं.... Rofl