छक्का

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 11 May, 2014 - 03:31

भिकेच्या पैशाने
विकत घेवून गुटखा
रस्त्याने साडीमध्ये
ताड ताड गेला छक्का
काळा उंच रुंद खांद्याचा
उभट पुरुषी चेहऱ्याचा
रबर बांधल्या कुरळ्या केसांचा
धनी उपहासी नजर स्मितांचा
जुनाट कुठली साडी टाकली
वेडी वाकडी होती नेसली
सैल विटकी तशीच चोळी
घालण्यासाठी होती घातली
तीच टाळी कमावलेली
दे रे राजा ओळ ठरली
राकट हात डोक्यावरती
ठेवत स्वारी होती चालली
किंचित किरटा स्वर फाटका
स्त्री लयीत शब्द दुमडला
किन्नर मी म्हणत स्वतःला
देवलोकी जावून भिडला

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता आवडली,
माझ्या अनुभवाशी बरीचशी सुसंगत.
एक कवी म्हणून सूचकता अपेक्षित होती.
टेक्स्टवरून समजतेच कुणाविषय कविता आहे.
शीर्षकात सांगायची गरज नसावी.

समर्पक शीर्षक शोधणे एकूणच अवघड काम असते; टाळी (उत्सुकता राखणारे किंचित अस्पष्ट), किन्नर (स्पष्ट, ठीकठाक, दिलेल्या शीर्षकासारखेच).

amazing very nice