आवडेल का तुला

Submitted by s423 on 9 May, 2014 - 06:05

आवडेल का तुला माझ्या स्वप्नांच्या दुनियेत यायला
अन तू माझाच आहेस असे माझ्याकडून म्हणून घ्यायला
आवडेल का तुला मी लीहलेली कविता वाचायला
अन नाही आवडली तरी सुंदर आहे असे म्हणायला
आवडेल का तुला माझ्याबरोबर उंच झोका घ्यायला
अन फिरत फिरत बर्फाचा गोळा खायला
आवडेल का तुला समुद्राच्या किनारी फिरायला
अन गाण ऐकता ऐकता दुरून येणाऱ्या जहाजाजवळ एकटक पाहायला
आवडेल का तुला वाळूमध्ये पाय सरकून मुद्दाम पडायला
अन मोठ्याने खळखळून हसायला
आवडेल का तुला हातात घेतलेला फुग्यांचा पुंजका हवेत दूरवर सोडायला
अन शांत बसून भेळपुरी खायला
आवडेल का तुला माझ्याबरोबर पिच्चर बघायला
अन रोमांटीक सीन बघून मोठ्याने सीटी वाजवायला
आवडेल का तुला पहिल्या पावसामध्ये भिजायला
अन धाब्यावर गरमागरम भाजी चहासोबत खायला
आवडेल का तुला चांदण्या रात्री समुद्रकिनारी फिरायला
अन पहाटेची बोचरी थंडी सूर्याच्या कोवळ्या किरणानबरोबर अंगावर घ्यायला
आवडेल का तुला माझ्यावर विश्वास ठेवायला
अन माझी साथ जीवनभर द्यायला
खरच आवडेल का तुला तू माझा अन मी तुझी व्हायला............ आवडेल का तुला ...........

Group content visibility: 
Public - accessible to all site users