ट्राफिक

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 5 May, 2014 - 12:06

गोंधळ गदारोळ धावाधाव
प्रत्येकाला पुढं जायचं होतं
लागलेल्या सिग्नलशी
प्रत्येकाचं वैर होतं
इंचाइंचाने सरकणारे टायर
क्षणाक्षणाला ओकणारा धूर
क्लच ब्रेक एक्सलेटर
अन इंजिनचे गुरगुर
दचकून वैतागून चुकून
वाजणारे कर्कश हॉर्न
आवाजात विरघळणारी
एखाद शिवी कचकन
रस्त्यास नव्हती उसंत
अन गतीला अंत
माणसाचा शब्द ना
कुठला चेहरा जिवंत

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users