मी कोणासाठी जगतो

Submitted by जयदीप. on 5 May, 2014 - 04:34

मी कोणासाठी जगतो
हा प्रश्न तुला का पडतो

तू येशी आणिक जाशी
मी शब्दांसाठी झुरतो

तू माग तुला जे सुचते
हा तारा तुटतच असतो

अस्तित्व असे का माझे
मी असतो पण मी नसतो

मी दगड निराळा आहे
मी अश्रूंमध्ये मुरतो

तू हात तुझा दे हाती
मी श्वासांवाचुन जगतो

शब्दात कसे मी सांगू
विव्हळतो वा मी कण्हतो

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी कोणासाठी जगतो
हा प्रश्न तुला का पडतो

तू येशी अन् तू जाशी
मी शब्दांसाठी झुरतो

तू माग तुला जे सुचते
हा तारा तुटतच असतो

मी दगड निराळा आहे
मी अश्रूंमध्ये मुरतो

छान शेर आहेत, शुभेच्छा!

टूटा सितारा तो मांगा था रबसे, तुझकोही जाने अदा - ह्या कभी हां कभी ना मधील गीताची आठवण झाली.

हल्ली आपण अनेकजण हिंदी शब्द एकदम मराठमोळ्या स्वरुपात वापरू लागलो आहोत.

मराठीत उल्का पडणे, तारा निखळणे वगैरे असावे. Happy

(सहज नोंदवले, विशेष काही नाही)

तारा खूप आवडला

धन्यवाद
शुभेच्छा

बाकीचे विचारपूसमध्ये लिहिले आहे ...

सर्वांचे मनापासून आभार ...
बेफिजी +१ तारा तुटण्याच्या बाबतीत

वैभवजी बदल केला आहे

विजयजी खूप दिवसांनी तुमचा प्रतिसाद मिळाला. खूप खूप आभार सर.

Happy

छान