हतबल

Submitted by संतोष वाटपाडे on 5 May, 2014 - 04:18

तुझ्या पतनांनतर सुरु होते खरी लढाई
माझ्या आत येणार्‍या श्वासांची
तुझ्या बाहेर पडणार्‍या श्वासांसोबत...

अगदीच अनोळखी असल्यासारखे
दोघेही भांडत राहतात निःशब्दपणे
डोक्यात असंख्य विचारांचे काहूर घेऊन...

तुला समाधान असते पतनानंतरही जिंकल्याचे
आणि मला समाधान असते
समर्पणातून मिळालेल्या पराजयाचे....

या युध्दातही तुझाच विजय करवून घेतलास
हा उन्माद ओसंडून वाहतो
तुझ्या चेहर्‍यावरच्या क्रुर घामासोबत

तेव्हा मी वेचत असते
माझ्या चिंध्या झालेल्या प्रावरणांना
आणि बोथट झालेल्या भावनांना....
उबगलेल्या निद्रिस्त शय्येवरुन

टिपावे वाटतात तेव्हा मला
तुझ्या निर्ढावलेल्या चेहर्‍यावरचे भाव
युध्दानंतर तुलाच दाखवण्यासाठी...
..."किती हतबल होतास तू!!"
--- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

युध्दानंतर तुलाच दाखवण्यासाठी...
..."किती हतबल होतास तू!!"<<< सुपर्ब!

कविता आवडली.