महाराष्ट्राची , मराठी भाषेची गळचेपी आणि मराठी राज्यकर्ते, बाबू लोक यांच्या नाकर्ते पणामुळे होणारे महाराष्ट्राचे नुकसान .

Submitted by अभि१ on 5 May, 2014 - 03:55

नुकताच १ मे महाराष्ट्र दिन होऊन गेला. इथल्या सरकारला किवा मुख्य करून बाबू लोकांना (जे खरे राज्य चालवतात ) काहीही पडली नाहीये . महाराष्ट्राची , मराठी भाषेची गळचेपी आणि मराठी राज्यकर्ते, लोक यांच्या नाकर्ते पणामुळे होणारे महाराष्ट्राचे नुकसान . मी काही उदा देत आहे . आपण पण इथे द्यावीत. बघूया किती स्कोर होतो तो .

१. सह्याद्री चानेल वर पंतप्रधान ऐवजी मुद्दाम वापरण्यात येणारा हिंदी शब्द - प्रधानमंत्री !!

२. "साजरा " शब्दाची वाटणारी लाज. त्याऐवजी वापरण्यात येणारा हिंदी शब्द - संपन्न . लग्न पत्रिकेत हमखास आढळणारा . साजरा शब्द काय खातो कि काय तुम्हाला. नवीन शब्द स्वीकारायला अजिबात ना नाही. पण अरे संपन्न हा शब्द आधीपासून मराठीत आपण वापरतो, वेगळ्या अर्थाने. मग हि हिंदी वाल्या लोकांची चाटुगिरी का करतो आपण ? ते बदलतात का आपल्याकरता ? मग आपणच का ? हे फक्त एक उदा . असे अजून किती तरी शब्द आहेत.

३. वेस्टर्न रेल्वेवर हमखास होणारी मराठीची गळचेपी. स्टेशनावर पाट्या - इंग्लिश, हिंदी, गुजराती मध्ये. मराठीला लाथाच बहुतेक वेळा. अक्खी रेल्वे हि मराठीची हवी तशी तोडमोड करतच असते.

४. महाराष्ट्रात आलेल्या उद्योगांना इथले IAS अशिकारी ( द. भा. ) विविध मार्गाने त्रस्त करतात आणि मग south GOVT मधिल त्यांचे बंधुजन त्यांना पायघड्य घालून तिकडे नेतात
.
५. ‘गुजरात मॉडेल’मुळे ‘जेएनपीटी’ धक्क्याला

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/jnpt-gujarat-m...?

रोजगारावर कुऱ्हाड
या व्यवसायात मुंबई, रायगड, उरण भागातील सुमारे १० लाख रोजगार अवलंबून आहेत. वाशी, अंधेरी, सहार, फोर्ट, बेलापूर, मशीद बंदर आदी ठिकाणी व्यावसायिकांची कार्यालये आहेत.
गुजरात परवडते
जेएनपीटीमधून मनस्ताप, पैशांची नासाडी करण्यापेक्षा गुजरातमध्ये उत्तम सुविधा आणि कमी खर्चात वाहतूक होते, असे मत 'अश्वमेध लॉजिस्टिक्स'चे विजय ठाकरे, वैभव उघाडे यांनी व्यक्त केले.

६. शिवकालीन गड ३५ लाखांना विकला!
पण याच्यात मुख्यमंत्री किवा इतर लोकांना रस नाही. पण १००० कोटीचा समुद्रात पुतळा बांधायला धाव . तिकडे खायला मिळेल ना

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-west-maharas...

गडकिल्ल्यांबाबत उदासीनतेचा एक ढळढळीत पुरावा पुढे आला असून, कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील यशवंतगडाची विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते समीर शिरवडकर यांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उजेडात आणली आहे.

राजापूर तालुक्यात नाटे या जैतापूर खाडीकिनारी वसलेल्या गावात सोळाव्या शतकात विजापूरकरांनी उभारलेला ऐतिहासिक यशवंतगड आहे. सातबारा उताऱ्यावरील नोंदीनुसार या गडाची मालकी विश्वनाथ रघुनाथ पत्की यांच्याकडे असून, त्यांनी ९९ वर्षांच्या कराराने आंबोळगड येथील अरविंद तुकाराम पारकर यांना त्याची विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. १८ ऑक्टोबर २०१२ रोजी ३५ लाख रुपयांना गडाची विक्री झाल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून दिसून येते. देश स्वतंत्र झाल्यानंतर सर्वच किल्ले राष्ट्रीय मालमत्ता बनले असताना हा किल्ला पत्की यांच्या मालकीचा कसा, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

समीर शिरवडकर यांनी २३ ऑगस्ट २०१३ ला नाटे येथील मंडल अधिकाऱ्यांकडून माहितीच्या अधिकारात माहिती मागवली. त्यात या जलदुर्गाची ९९ वर्षांच्या भाडेकराराने विक्री झाल्याचे उघडकीस आले. राजापूर तहसीलदार कार्यालय, उपविभागीय अधिकारी आणि पुरातत्त्व विभाग यांच्याकडून माहितीच्या अधिकाराखाली मागवलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळून येत असल्यामुळे किल्ल्याच्या विक्री व्यवहाराचे गौडबंगाल वाढले असल्याचे शिरवडकर यांनी सांगितले.

शिवछत्रपतींचा इतिहास आणि गड-किल्ल्यांचा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चर्चिला गेला. सरकारने गड-किल्ल्यांच्या विकासासाठी वेळोवेळी घोषणा केल्या. मात्र सरकारी यंत्रणेकडे गड-किल्ल्यांबाबत गांभीर्याचा अभाव असल्याचे या घटनेवरून दिसून येते.

७. 'महाराष्ट्र सदना'चा मराठी विद्यार्थ्यांवरच अन्याय

स्पर्धापरीक्षेत मराठीचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा दावा करणाऱ्या राज्य सरकारच्या अनास्थेमुळे यूपीएससीच्या मुलाखतीसाठी दिल्लीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना मनस्ताप सोसावा लागत आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन हे आजवर अशा विद्यार्थ्यांसाठी आधार ठरत होते. सात दिवस कमी दरात तेथे या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होत असे. आता कोटय़वधी रुपये खर्चून बांधलेल्या नवीन महाराष्ट्र सदनाच्या अधिकाऱ्यांनी केवळ तीनच दिवस निवासाचा नियम पुढे केल्याने यूपीएससीच्या मुलाखतीसाठी आलेल्या मराठी उमेदवारांना निवासासाठी ऐन वेळी स्वस्त हॉटेल्स धुंडाळावी लागत आहेत. कोपर्निकस मार्ग व कस्तुरबा गांधी रस्त्यावर महाराष्ट्र सरकारची दोन 'भव्य' सदने असतानाही मराठी विद्यार्थ्यांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी वेळ देण्याऐवजी निवासासाठी जागेचा शोध घेण्यात वेळ घालवावा लागत आहे.

http://www.loksatta.com/desh-videsh-news/maharashtra-sadan-left-marathi-...

८. ठाण्यातील उद्योग परराज्यांत?

प्रोडक्शन आणि सर्व्हिस इंडस्ट्री एकमेकांना पूरक आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र झोनची अट योग्य नाही. नव्या औद्योगिक धोरणावेळी ही अट काढण्याची मागणी आम्ही केली होती. सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, नियम बदलला नाही. त्यामुळे याचा विपरित परिणाम उद्योगांवर होत आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/Thane-Ind...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

परिक्षेसाठी सात दिवस का रहावे लागते? परिक्षा किती दिवस असते?

महाराष्ट्रातील किल्ला एका मराठी माणसाने एका मराठी माणसालाच विकला. तर आता यात इतरांकडून गळचेपीचा प्रश्न आलाच कुठे? अनेक राजवाडे संस्थानिकांची पोरेबाळे ओरबडून खात आहेत. आमच्या गावचा वाडा पाडूनही तिथे आता मॉल बांधणार आहेत. १९४७ साली संस्थानिकांच्या टोळक्याने सरदार पटेलांना नमते घ्यायला लावून सगळे राजवाडे, त्यातील जनतेची अमाप संपत्ती शिवाय करोडोची पेन्शन खाल्लेली आहे. सदर किल्ला विक्री देखील त्यातलाच प्रकार असावा . संस्थानिकांच्या या बळजबरीला नंतर इंदिरा गांधींनी आव्हान दिले आणि मुर्दाड , लबाड संस्थानिकांची पेन्शन १९७१ साली बंद केली.

पण संस्थानिकांकडील किल्ले, संपत्ती याबाबत कुणी काहीही विरोध आजवर व्यक्त केलेला नाही.

संस्थानिकांची बटीक असलेल्या लोकांनीच नंतर भगवे पक्ष काढले, आणि आता हेच लोक सरदार पटेलांचा विश्वातील मोठा पुतळा उभा करणार आहेत. Proud

त्यामुळे किल्ला विकला, तर काँग्रेसच्या नावाने शंख करु नका. Proud १९४७ साली काँग्रेसच्या पटेलांना कुणी विरोध केला त्यान्ना दोष द्या.

या साईट वरच admin ने १ मे चा शुभेच्छा देणारा धागा उघडला होता. त्याला किती कमी लोकांनी प्रतिसाद दिला त्यावरून लोकांच्या आपल्या राज्याविषयी असणाऱ्या भावना कळून येतात !!
बाकी लक्ष्मी ताई , सचिन पगारे आपले कोण ? आणि मी मांडलेल्या बाकी मुद्यावर आपले काही म्हणणे नाही ?

आणि हे ३ दिवसच फक्त राहू देण्याचे निर्णय घेतो कोण ? अमराठी अधिकारी. त्यांना तिथे ठेवतो कोण ? चाटु कोन्ग्रेसी राजकीय नेते. त्या अधिकारी लोकांची असले निर्णय घेण्याची हिम्मत का होते ? कोणीही येउन आपल्याला लाथा घालतो .

http://www.loksatta.com/sampadkiya-news/upsc-students-gets-seven-days-st...
दुर्दैवाने, इतक्या वर्षांनंतरही महाराष्ट्र सदनाच्या विशेषत: अमराठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्लीस्थित मराठी जनांविषयी आस्था वाटत नाही आणि हे सदन भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांना नाकारले जाते.

संस्थानिक आणि फक्त भाजप यांचाच संबंध आहे असे नाही. कॉंग्रेसकडून पण कित्येक संस्थानिक आमदार-खासदार झाले आहेत. बडोद्याचे गायकवाड, ग्वाल्हेरचे सिंधिया, जयपूर, अमेठी, कोल्हापूर,सातारा ही काही उदाहरणे. यातील संस्थानिक कधी कॉंग्रेस कधी भाजप मधून निवणुका जिंकले किंवा हरले आहेत. आपल्या बेताल वक्तव्यांनी वाद ओढवून घेणारे दिग्विजयसिंग पण एका संस्थानिक घराण्यातूनच आले आहेत.तेव्हा संस्थानिकांचा एकाच पक्षाशी संबंध आहे हे पटले नाही.बाकी चालू द्या.

तेव्हा संस्थानिकांचा एकाच पक्षाशी संबंध आहे हे पटले नाही.बाकी चालू द्या.

ती स्वातंत्रोत्तर काळातील अवस्था आहे. त्यापूर्वी बहुतांश संस्थानिक काँग्रेसचे विरोधक होते. ४७ साली भाजपा नव्हता, पण सॅफ्रॉन गट आस्तित्वात होता.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/national-anthe...

बालभारतीने प्रकाशित केलेल्या ​तिसरी आणि चौथीच्या पुस्तकातील राष्ट्रगीतात 'सिंधु' आणि 'आशिस' असे शब्द वापरण्यात आले आहेत. त्यावरून गेल्याच वर्षी मुंबई हायकोर्टानेही बालभारती आणि राज्य सरकार यांची कानउघाडणी केली होती. परंतु, तरीही नवीन पुस्तकात त्याच चुका कायम ठेवण्याचा धडा बालभारतीने गिरवला आहे.
------------------------------------------------------------

मराठी भाषेची कितीही आणि कशीही मारली गेली तरी मराठी लोकांना तसा काही फार फरक पडत नाहीये हे मान्य करावेच लागेल. हिंदी वाले लोक मराठी चे मुद्दाम विद्रुपीकरण करायचा कसा प्रयत्न करत असतात त्याचे हे उदाहरण. आशिष या शुद्ध मराठी शब्द ऐवजी आशीस वापरायची बळजबरी.

मराठी भाषेची कितीही आणि कशीही मारली गेली तरी मराठी लोकांना तसा काही फार फरक पडत नाहीये हे मान्य करावेच लागेल. +१००.

अनेक दिवसांनंतर माबोवर डोकावत आहे,

अभि, सर्व मुद्द्यांना मनःपुर्वक पाठिंबा,
लगो, माधवराव शिंदे आणि आता ज्योतिरादित्य शिंदे, बडोद्याचे गायकवाड (ज्यांच्या संपत्ती वाटपाबद्दल मध्यंतरी आपसात संगनमताने वाटप झाले) यांचे राजवाडे, संपत्ती सुखेनैव का चालू ठेवण्यात आली ?
उगाच भगव्याच्या नावाने ओरडू नका सारखे. मागेही हा विषय झाला आहे अन्य धाग्यांवर,
आणि मुळात या धाग्याचा विषयच वेगळा आहे, त्यामुळे कृपया विषय भरकटवू नये ही विनंती. Happy

राष्ट्रगीत बंगाली भाषेत आहे हे बरोबर,
पण मुळात बंगाली भाषेत देखील "आशिष" असाच शब्द आहे, "आशिस" नाही.

http://en.wikipedia.org/wiki/Jana_Gana_Mana

बंगाली भाषिक किंवा जाणकारांकडून वाचून घ्यावे ही विनंती. Happy

मूळ शब्द आशिष असाच असेल आणि तो जर आशिस असा छापला असेल तर ती 'बालभारती' च्या लोकांची प्रिंटिंग मधील चूक ठरेल. पण मराठी शब्दाऐवजी मुद्दाम हिंदी शब्द बळजबरीने घातला म्हणून आरडा ओरड योग्य नाही, इतकेच मला सांगायचे आहे.

शिवाय , बालभारतीचे पुस्तक तयार करणे, ते तपासणे ही सगळी कामे त्या राज्यातील्च म्हणजे म्हाराष्ट्रातील लोकच करतात, त्यासाठी परप्रांतीयांनी शब्द घुसडला म्हणून कशी काय आरडाओरड होऊ शकते हे समजले नाही. क्षणभर धरुन चालू की शिक्षण मंत्री किंवा त्याचा पी ए महाराष्ट्रीय नाहीत, तरीही प्रूफ तपासण्यासाठी जे मंडळ असते ते मराठी समजणार्‍या लोकांचेच असते. बालभारतीच्या पुस्तकात संबंधित मंडळाची लिस्ट असते, ती पहावी. का, महाराष्ट्रीय लोकांनी आशिष हा शब्द बरोबरच लिहिलेला होता आणि नंतर त्या पी ए ने , थांबा थांबा, हा शब्द मुद्दाम चुकीचा छापा, असे म्हणून त्याने तो बदलला , असे धागाकर्त्याला वाटते की काय , कुणास ठाऊक ! Happy

शक झाले, हुण झाले, सिकंदर झाला, बाबर झाला इंग्रज झाले, आता हे परप्रांतीय पी ए आले ! .... दर शे दोनशे वर्शांनी ' मराठी / म्हाराष्ट्र यांची गळचेपी केली, म्हणून कुणाला ना कुणाला जबाबदार धरुन कोकलण्याची 'मनसे' परंपरा कधी संपणार आहे, कुणास ठाऊक.

आता त्या संस्थानिकांबद्दल . त्याच्यासाठी स्वतंत्र धागा आहेच. पण ' हे ' दातार' आडनावाचे सदगृहस्थ आहेत. जहागिरदारांनी जहागिरी दिली म्हणजे जणू देशावर उपकारच केले, त्यांना पेन्शन देणे गैर काय होते, असे हे म्हणतात ! गंमतच ! Proud http://www.thehindu.com/todays-paper/tp-opinion/who-betrayed-sardar-pate...

>>मराठी भाषेची कितीही आणि कशीही मारली गेली तरी मराठी लोकांना तसा काही फार फरक पडत नाहीये हे मान्य करावेच लागेल

हे वाक्य आणि यातील तो विशिष्ट शब्दप्रयोग खटकला.
व्यक्तिगत गप्पांतून वगैरे ठीक आहे पण सार्वजनिक ठिकाणी, तेही लिखाणातून असा शब्दप्रयोग येणे अतिशय अयोग्य वाटते. (वैयक्तिक मत)

>>मुख्य करून बाबू लोकांना (जे खरे राज्य चालवतात ) काहीही पडली नाहीये .
पडली नाहिये?????
हेही "उन्हे कुछ पडी नही है" ह्या हिंदीचं सरळसरळ भाषांतर वाटतंय, जे चुकीचे आहे.
लेख वाचणार्‍यांपैकी किती जण जागरूकतेनं वाचतात? हे पाहण्यासाठी मुद्दाम हा शब्दप्रयोग केला असल्यास, फारच छान Happy
>>संपन्न हा हिंदी शब्द??
संस्कृत शब्द आहे तो आणि तसाच्या तसा मराठीत वापरल्याने 'हिंदी शब्द वापरला' असे नक्कीच होत नाही.
संपन्न- ह्याचा दुसरा अर्थ जरी 'अमुक अमुक ने परिपूर्ण (उदा. सर्वगुणसंपन्न)' असा होत असला, तरी कार्यक्रम संपन्न झाला ह्यात काही चूक नाही.
संपन्न हा शब्द वापरल्याने साजरा ह्या शब्दाची लाज वाटते असा निष्कर्ष कसा काय निघू शकतो?

चुकीची मराठी वापरली जाते आणि त्याबद्दल आपण मराठी माणसेच अनेकदा उदासीन असतो हा मुद्दा पटला.
पण पुढे काय? ह्यातून काही मार्ग आहे का? आपण (व्यक्तिगत पातळीवर) काही करू शकतो का?
संघटनात्मक पातळीवर याबद्दल काम करणारी एखादी संस्था आहे का?
(मराठी हितवर्धिनी सभा नावाची एक सभा असल्याचे ऐकले आहे, पण तपशीलवार माहिती नाही)

>बघूया किती स्कोर होतो तो
किती संख्या होते ते
> सह्याद्री चानेल वर
सह्याद्री वाहिनीवर
>वेस्टर्न रेल्वेवर हमखास होणारी मराठीची गळचेपी
पश्चिम रेल्वेवर
>‘गुजरात मॉडेल’मुळे
गुजरात नमुन्यामुळे, गुजरात पद्धतीमुळे
>त्यांच्यासाठी स्वतंत्र झोनची अट योग्य नाही
स्वतंत्र विभागाची

आधी आपण रोजच्या वापरात मराठी बोलू या. तुम्ही/आम्ही/आपण सगळे मराठी वापरत नसल्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान होतंय. बाबू लोकांमुळे नाही.

चैतन्य, सहमत, हे असे शब्दप्रयोग योग्य नाहीत सार्वजनिक लिखाणात.
आशय योग्य असला तरी त्याचे सादरीकरण सुधारले जावे ही विनंती.

>>संपन्न हा हिंदी शब्द??
संस्कृत शब्द आहे तो आणि तसाच्या तसा मराठीत वापरल्याने 'हिंदी शब्द वापरला' असे नक्कीच होत नाही. >>
-----------------------------------------------------------------
संपन्न हा शब्द मराठी मध्ये पूर्वीपासून आहे. पण त्याचा अर्थ वेगळा होतो. आणि हिंदी वाले संपन्न वेगळ्या अर्थाने वापरतात ( संपन्न = साजरा करणे , हिंदी मध्ये ) . मराठी मध्ये या अर्थाकरता वेगळा शब्द आहे ( साजरा ) , तो वापरायचे सोडून आपण साजरा च्या जागी संपन्न वापरणे, आपण त्यांचे जोडे उचलण्यासारखे वाटते.

आता महान हा शब्द मराठी मध्ये पण आहे आणि हिंदी मध्ये पण. पण मराठी मध्ये महान चा अर्थ खूप मोठा , एकमेवाद्वितीय तत्सम आहे. आणि हिंदी मध्ये तसा अर्थ नाही. तिथे कोणीही आन्डू पांडू पण त्या वेळे पुरता महान असू शकतो. एक मराठी साहित्यिक UP मध्ये एका साहित्य संमेलनाला गेले होते. त्यांची तिथे कितीतरी इतर साहितीय्क लोका बरोबर ओळख करून denyat आली. त्यांना आश्चर्य वाटले जेव्हा पर्येकाची ओळख "महान" गीतकार, कथाकार अशी करून दिली तेव्हा. ते म्हणाले कि ५०/१०० "महान" साहितीय्क लोकांना मी २ तासात भेटलो !! अर्थात हिंदी मध्ये महान चा अर्थ मराठी मधल्या महान पेक्षा वेगळा आहे हे त्यांना नंतर कळले !!

@ चैतन्य - असंसदीय शब्द प्रयोग च मनाला भिडतात. मी तसले शब्द वापरल्या नंतर च इथे लोकांचे प्रतिसाद आले. नाही का ?

@ माने गुरुजी
रोजच्या जीवनात आपण जे इंग्लिश शब्द वापरतो ते फेकून देऊन तिथे जड जम्बाल मराठी शब्द वापरावे असे माझे अजिबात म्हाणे नाही. पण या हिंदी वाल्याच्या दादागिरी विषयी नकीच राग आहे

@ लक्ष्मी - सरकार जरी महाराष्ट्राचे असले तरी सगळे IAS ऑफिसर , बरेचसे PA , निर्णय घेण्याची क्षमता असलेले लोक हे हिंदी इथे कशी वाढेल आणि मराठी कशी मरेल याची काळजी घेणारे आहेत. मध्ये एक बाई WTC कफ परेड ला प्रदर्शनाला गेल्या होत्या . महाराष्ट्र राज्याचा पण तिथे दालन होते. पण जे काही ४ लोक राज्य सरकारचे प्रतिनिधी तिथे होते ते सगळे UP / बिहार वाले . एकालाही मराठी येत नव्हते.
आणि आपल्या सारखा कट्टर काँग्रेसी आय डी ( अर्थात Duplicate आहे हे सगळेच जाणतात ) जेव्हा हिंदी वाले अजिबात मराठी वर आक्रमण करत नाहीये हे सांगायचा प्रयत्न करतात तेव्हाच त्यांना वरतून काय order आहेत हे समजून येते.

अभिआण्ना, आय ए एस ही न्याशनल लेवलची परिक्षा असते. त्यात सगळ्या राज्यातुन उमेदवार येतात. तुमच्या राज्यात जर यु पी वाला येत असेल तर मराठी आय ए एस ही कुथेतरी अरुणाचल क र्नाटकातअसतो.

तुमची भाषा तुम्ही लिहा वाचा छापा, त्याला कुणाचाही विरोध नाही.
माअझा आय डी खोटा? आणि तुमच्या आय डीने सीतामैय्यासारखी अग्नी परिक्षा देउन खरेपणा सिद्ध केला आहे की काय !

माझा आय डी कोणताही असो, माझे मित्र आणि शत्रु देखील मला ओळखतात. ! Happy

आणि आय डी खरा असो वा खोटा, माझ्या कितीतरी धाग्यान्नी श्म्न्भरी गाठली आहे, लोक आजही ते वाचतात आणि मला धन्यवाद देतात. तुमच्या या अमेरिकन धाग्यावर कुत्रंही फिरकत नाही. Proud

@ अभि,
'संपन्न' बद्दल आपल्यात मतांतर आहे. ते स्वीकारून पुढे बोलू.
असंसदीय भाषेबद्दल मी वैयक्तिक मत दिले होते. तिचा वापर करावा की करू नये हा सर्वस्वी तुमचा निर्णय.
बाकी असंसदीय भाषेमुळे प्रतिसाद आले - ही कारणमीमांसा पटत नाही.

>>पण पुढे काय? ह्यातून काही मार्ग आहे का? आपण (व्यक्तिगत पातळीवर) काही करू शकतो का?
>>संघटनात्मक पातळीवर याबद्दल काम करणारी एखादी संस्था आहे का?
ह्याबद्दल काही माहिती आहे का?

मराठी हितवर्धिनी सभेच्या एका उपक्रमाबद्दल माहिती मिळाली.
वृत्तपत्रांमध्ये/ वृत्तवाहिन्यांमध्ये अगर प्रसारमाध्यमांमध्ये वापरल्या जाणार्‍या मराठीबद्दल काही आक्षेप असेल.
उदा. बातमीत वापरलेला एखादा शब्द मराठी नसेल किंवा चुकीचा वापरला असेल तर त्याबद्दल-
marathi.hitvardhini.sabha@gmail.com इथे कळवा.

चुकीच्या मराठीचा मुद्दा त्या त्या प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न सभा करणार असल्याचे समजले आहे.

आजच पेपर मध्ये वाचले कि ममता दीदी ने दुरान्तो गाड्या सुरु केल्या. कलकत्ता ला त्यातील एक जातेच. पण गाडीचे नाव दुरान्तो हा एक बंगाली शब्द आहे !! किती हा भाषेचा अभिमान नाहीतर आपल्या मराठी नेत्याचे वागणे म्हणजे - beggars are not choosers - प्रकारातील असते.

तुम्ही/आम्ही/आपण सगळे मराठी वापरत नसल्यामुळे
बाबू लोक, सरकार, संस्थानिक किंवा इतर कुणि यांना नावे ठेवण्यापेक्षा, दोष देण्यापेक्षा, बहुतेक सर्वच स्वतः सुद्धा मराठी बोलताना हिंदी, इंग्रजीच शब्द वापरत असतो हे लक्षात घ्या. आणि ते जास्त खटकते.
असे हिंदी इंग्रजी शब्द वापरण्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे.

याला कारणे अनेक आहेत. ती कारणे पूर्वी मराठी समजल्या जाणार्‍या लोकांनीच लिहीलेली आहेत.
त्यातली काही अशी -
- व्यक्तिस्वातंत्र्य आहे.
- मराठीत पूर्वी पण इतर भाषेतील शब्द आले आहेत, जसे टेबल. व बरेचसे शब्द फारसी, उर्दू इ. भाषांतून.
- भाषा म्हणजे फक्त विचार व्यक्त करण्याचे साधन, विचार कळले की झाले.
- आम्ही जी भाषा ऐकतो तशी बोलतो म्हणजे सर्वांना समजेल,

बहुसंख्य मराठी म्हणवणार्‍या लोकांना जर असे हिंदी इंग्रजी चे शब्द जास्त असलेली मराठी भाषा योग्य वाटत असेल, तर तीच मराठी भाषा!

>>बहुसंख्य मराठी म्हणवणार्‍या लोकांना जर असे हिंदी इंग्रजी चे शब्द जास्त असलेली मराठी भाषा योग्य वाटत असेल, तर तीच मराठी भाषा!

नाही नाही नाही !!! हे पुर्ण बरोबर नाही Sad

http://www.loksatta.com/maharashtra-news/maharashtra-water-to-gujarat-54...

महाराष्ट्राचे पाणी गुजरातला..

Published: Wednesday, May 21, 2014
वापरच न झाल्याने राज्यावर नामुष्की
तापी नदीवर कोटय़वधी रुपये खर्च करुन मध्यम प्रकल्पांमध्ये अडवलेले पाणी कुठलाही वापर होत नसल्याने ऐन उन्हाळ्यात गुजरातला सोडून देण्याची नामुष्की जलसंपदा विभागावर आली आहे. विशेष म्हणजे उपसा जलसिंचन विहिरींवरील कर्ज माफ करूनही सरकारकडून त्या कार्यान्वित करण्यासाठी कार्यवाहीच होत नसल्यामुळे की काय शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याला तिलांजली देण्याची वेळ महाराष्ट्रावर आली आहे.

http://www.loksatta.com/desh-videsh-news/shiv-sena-mp-protest-for-mahara...

Friday, July 18, 2014

दिल्लीतील 'महाराष्ट्र सदना'त मराठी खासदारांना मिळणारी दुय्यम वागणूक आणि तेथील अनंत अडचणींविरोधात शिवसेना खासदारांनी गुरुवारी थेट निवासी आयुक्त विपीन मलिक यांच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. मराठी खासदारांना सामान्य दर्जाची खोली, तर उत्तर प्रदेशमधील खासदार सत्यपाल सिंह यांना मंत्र्याचा दर्जा असलेला कक्ष देऊन 'अमराठी बाणा' जपणारे मलिक सेना खासदारांच्या भीतीमुळे दिवसभर स्वत:च्या कार्यालयाकडे फिरकलेदेखील नाहीत. संतप्त शिवसेना खासदारांनी मलिक यांच्या दालनात धडक मारून भिंतींवर शिवसेनेचा 'संदेश' लिहिला.
दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन म्हणजे अनंत अडचणींचे माहेरघर आहे. अमराठी पद्धतीचे, तेदेखील अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण, मराठी खासदारांना दुय्य्म वागणूक, अस्वच्छ स्वच्छतागृह असे चित्र आहे.

विपिन मलिक स्वत:हून मराठी खासदार तर सोडा, सदनात येणाऱ्या कुणाही मराठी माणसाची साधी विचारपूसही करीत नाहीत. परंतु बागपतचे खासदार व माजी पोलीस अधिकारी सत्यपाल सिंह यांना स्वत:हून दूरध्वनी करून महाराष्ट्र सदनात येण्याची विनंती त्यांनी केली होती. या विनंतीमुळे ३१ मेपासून सत्यपाल सिंह महाराष्ट्रातील मंत्र्यांसाठी आरक्षित असलेल्या कक्षात तळ ठोकून आहेत. सत्यपाल सिंह यांच्यासाठी पायघडय़ा अंथरणाऱ्या मलिक यांनी मराठी खासदारांना मात्र छोटय़ा खोल्या दिल्या आहेत.

आणि तिकडे तमिळ लोक संस्कृत ला पण मानायला तयार नाहीत . जी भाषा कोणी बोलत / वापरत नाही . किवा ती तमिळ लोकावर कोणी लादण्याचा धोका पण नाही. वा !!

http://www.loksatta.com/desh-videsh-news/stop-sanskrit-week-in-schools-b...

'संस्कृत कार्यक्रमा'ला तामिळनाडूत विरोध
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) 'संस्कृत सप्ताह' साजरा करण्याच्या परिपत्रकास तामिळनाडूमध्ये विरोध करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सदस्य असलेल्या एमडीएमके आणि पीएमके या पक्षांनीच या परिपत्रकाला विरोध केला असून, केंद्र सरकारने हे परिपत्रक रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
७ ते १३ ऑगस्ट या आठवडय़ात सीबीएसईच्या शाळांमध्ये 'संस्कृत सप्ताह' साजरा करण्याचे सीबीएसईने ठरविले आहे. संस्कृत भाषेच्या शिक्षणाला उत्तेजन देण्यासाठी आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांमध्ये ही भाषा शिकण्यासाठी जागृती करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र एमडीएमके व पीएमकेने यास तीव्र विरोध केला आहे. 'भारताच्या बहुभाषिक तत्त्वावर सीबीएसई हल्ला करत आहे.

दिल्लीत उत्तर भारतीय खानसामाच मिळणार ना ?

खासदर मंडळी जनत्ची कामे करायला द्ल्लीला जातात की मजा मारयला जातात ?

खॉली ताब्यात मिळाल्यावर एखादा नोकरही मिळाला असेलच. त्याच्याकडुन स्वच्छ करुन. घ्यायची. बोम्बलायच्म कशाला ?

संस्कृतला विरोध योग्यच आहे

वरती 'आशिस' या शब्दाविषयी चर्चा वाचली.
आशिस् आणि आशी हे दोन्ही शब्द संस्कृतमध्ये आहेत आणि दोहोंचा अर्थ ब्लेसिंग, प्रेयर,(प्रार्थना) असा आहे.. यातल्या 'स्'चा त्याच्यापुढे असलेल्या व्यंजनानुसार र्, श्, ष्, होतो.
वरील दोन्हीचा विकल्पाने अर्थ 'सापाचा दात' असाही होतो.
आशीर्वाद हा शब्द मराठीमध्ये चुकीचा नाही.

Pages