गैरसमजांचे मळभ हटवून दाखव !

Submitted by सुप्रिया जाधव. on 3 May, 2014 - 11:49

पावसा धो-धो कधी बरसून दाखव !
गैरसमजांचे मळभ हटवून दाखव !

तू मला दूर्लक्षिणे तर नेहमीचे
तू स्वतःलाही ज़रा विसरुन दाखव !

ग्राह्य धरुया चल तुझे सारे बहाणे
काळजाला तू तुझ्या फसवून दाखव !

कोंडल्यावर भावना-उद्रेक होतो
मान्य कर अथवा तिला दडपून दाखव !

फाटके नाते पुन्हा जोडू नको पण...
आतड्यांचा पीळ हा उकलून दाखव !

ज्या गतीने काळ हा उलटून जातो
त्या गतीने जाणिवा मिटवून दाखव !

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्या गतीने काळ हा उलटून जातो
त्या गतीने जाणिवा मिटवून दाखव <<< सुरेख!

चांगली गझल झालेली आहे. बोलके शेर आहेत आणि सुलभ शब्दरचना आहे.

<<फाटके नाते पुन्हा जोडू नको पण...
आतड्यांचा पीळ हा उकलून दाखव !

ज्या गतीने काळ हा उलटून जातो
त्या गतीने जाणिवा मिटवून दाखव !>>

खूप आवडले. सुंदर रचना.

Kalch eka GTG madhye tuza Vishay nighala hota tayade ki sadhya jyanchya gazala ashvasak vatavyat ashanpaiki ek tu ahes Happy

chhaan sher Happy

ज्या गतीने काळ हा उलटून जातो
त्या गतीने जाणिवा मिटवून दाखव

छान.

जमीनीने मार खाल्ला, असे वाटले. एक प्रकारची आक्रमकता जाणवते.
असे करून दाखव तसे करून
दाखव हे गझलेच्या प्रकृतीला पोषक नसावे बहुधा.
आजकाल निगेटीव्ह प्रतिसाद अधिक दिले जात असल्याने अलीकडे मी ते देणे थांबवले होते.
समजून घ्यालच.

<<<जमीनीने मार खाल्ला, असे वाटले. एक प्रकारची आक्रमकता जाणवते.
असे करून दाखव तसे करून
दाखव हे गझलेच्या प्रकृतीला पोषक नसावे बहुधा.>>>>>

समीरजी आपल्या परखड मतांचे नि सविस्तर अभिप्रायांचे माझ्या धाग्यावर नेहमीच स्वागत. Happy

दाखव रदीफ जेव्हा योजली गेली तेव्हा हा विचार माझ्याही मनात प्रकर्षाने येवून गेला परंतू प्रत्येक शेरातिल आशयाचा विचार करता त्यामागील आर्जव, विनवणी आणि पराकोटीची हतबलता दाखव या शब्दप्रयोजनाने जास्त प्रभावी ठरतेय हे ही जाणवले.

माझ्या मते गझल वाचताना रसिकाच्या मनस्थितीवर व दृष्टीकोनावर बरेच काही अवलंबून असावे. Happy

तरीही आपल्या मौल्यवान सुचनेचा जरुर विचार करतेच आहे.

( माझे वाचन तोकडे असल्याने माझे मत सोदाहरण पटवून देवू शकत नाहीय पण खात्री आहे की हिंदी- उर्दू गझलेतही असे दाखले आवश्य सापडू शकतील.)

नम्र,

-सुप्रिया.

दाखव हे गझलेच्या प्रकृतीला पोषक नसावे...

या मतावर दाखला देण्यासाठी तसे म्हणण्यात आले आहे वैवकु:)

ग्राह्य धरुया चल तुझे सारे बहाणे
काळजाला तू तुझ्या फसवून दाखव !

<< अहाहा ! क्या बात !

सबंध गझलच अफाट आवडली !

सापडली एकदाची Happy

दो रूख की है तस्वीर घुमाकर तो देखिए
खुद की कहानी खुदको सुनाकर तो देखिए

है अम्न आपके लिए मिट्टी का खिलौना
तोडा है कई बार बनाकर तो देखिए

नदियाँ बहा के खुन की इतिहास रच दिया
आसू की एक बूंद गिराकर तो देखिए

पाले हुए ये सारे भरम टूट जायेंगे
खुद आईने से आख लडाकर तो देखिए

इन रास्तों पे भिड है मंजिल नही पता
खुद अपनी एक राह बनाकर तो देखिए

धरती ये चूम लेगी आसमान एक दिन
इस स्वप्न को आखो मे बसाकर तो देखिए

-किशन तिवारी.

वैवकू त्यांचा मुद्दा त्यांच्या दृष्टीने बरोबर असेलही पण तो माझ्या या गझलेच्या बाबतीत मला पटत नाहीय त्याला मी तरी काय करणार हो ?

तुमच्या गझलेच उदाहरण परफेक्ट ! सादरीकरणात उच्चारांवरून गझल चांगली पोहोचेल या तुमच्या मताशी पूर्णतः सहमत

खाली अजूनही काही गझलेची उदाहरणे देत आहे
१.
कुछ नमक से भरी थैलिया खोलिए
फिर मेरी गाव की पट्टीया खोलिए

मेरे पर तो कतर ही दिये आपने
अब तो पैरों की ये रस्सिया खोलिए

पहले आहट को पहचानिए तो सही
जल्दबाजी में मत खिडकिया खोलिए

-ओमप्रकाश (यती)

२.
निगाहों मे सपन सजा कर तो देखो
इरादे को मकसद बना कर तो देखो

किनारे पे रहकर किसे क्या मिला है
जरा बीच सागर मे जकर तो देखो

मुहब्बत के जज्बे मे ताकत है कितनी
दिलों मे ये जज्बा जगाकर तो देखो

-मुस्थसन (अज्म)

३.
ठोकर खा पछताकर देख
आख जरा झलकाकर देख

धर्म धरा रह जाएगा
पैसे चार कमाकर देख

फिर न हसेगा मुझ पर तू
मन का चैन लुटाकर देख

खुद भी तू जल जाएगा
नफरत को दहकाकर देख

मुझमें क्या है? क्या हू मै
मुझको गले लगाकर देख

-मनोज अबोध.

४.
फहमद फराज यांच्यातर

रंजिश ही सही .....
कठीन है राहगुजर थोडी दूर साथ चलो...

या बहुश्रूत गझलांमधे ही प्रत्येक शेरात आर्त मगणीच केली गेलीय ती सार्थ ठरण्यासाठी दुखाने के लिए आ,
जाने के लिए आ...
थोडी दूर साथ चलो... अशी विनंती वजा मागणीच केली गेली आहे ना ?

अशी अनेक उदाहरणे सापडू शकतील वैवकु.

असो.

-सुप्रिया.

खरे लिहिणे अवघड असते. पूर्ण खरा शेर रचणेही अवघड असते. विशेषतः गझलतंत्राच्या अपेक्षांमुळे अनेकदा तडजोडी होतात. आपण जे लिहिले आहे ते 'शक्य तितक्या' प्रामाणिकपणे लिहिले आहे का इतकाच निकष स्वतःपुरता लावून पाहावा असे मला वाटते.

समजा शेर पूर्ण अप्रामाणिक व कारागिरीने पुरेपूर भरलेला असला तर तो गझलेत न घेणे हे जितके शक्य असते तितकेच हेही शक्य असते की आपल्यापुरता तो शेर प्रामाणिक नसला तरीही जर सुंदर शेर झालेला असला तर तो इतर कोणालातरी आवडू शकेल. आपण प्रकाशित करत असलेल्या गझला ह्या 'इतरांनी वाचाव्यात व त्यांना आवडाव्यात' ह्याचसाठी प्रकाशित करत असतो इतके मान्य व्हावे. अन्यथा आपण गझल करून स्वतःजवळच ठेवली असती. जर 'इतरांना आवडणे' हासुद्धा एक निकष लागू होतच असेल तर शेर (जर पूर्णपणे प्रामाणिक नसलाच तर) निदान सुंदर तरी आहे की नाही हे तरी पाहावे. (गझलेत कारागिरीलाही प्राधान्य द्यावे).

त्यामुळे, वरील गझलेतील शेर हे 'स्वतःला जे लिहायचे होते तेच लिहिले आहे की नाही' ह्या निकषावर कवीने स्वतः तपासून पाहिल्यानंतर इतर मतमतांतरे वाचून अस्थिर होण्याची आवश्यकता नाही.

<<<तुम्हीपण ह्या वेळी अगदी "नयी है वह" वागताय असं नाही का वाटतय स्मित >>>

मुद्दा सोडून बोलताय अस एकदा जरी वाटल तुम्हाला तरी पुरेस राहिल वैवकु Sad

असोच !!

<<<त्यामुळे, वरील गझलेतील शेर हे 'स्वतःला जे लिहायचे होते तेच लिहिले आहे की नाही' ह्या निकषावर कवीने स्वतः तपासून पाहिल्यानंतर इतर मतमतांतरे वाचून अस्थिर होण्याची आवश्यकता नाही. >>>>

पटलच !!

मनःपुर्वक धन्यवाद बेफिजी

-सुप्रिया.

तुम्ही हिंदी गझला देणे हे मुद्दा सोडून बोलण्यासारखे आणि नवखेपणाचे निदर्शक आहे असे तुम्हाला वाटले तर ते जास्त फायद्याचे ठरावे
आणि मुळात मुद्दा एक दोन वाक्यात निपटवण्यासारखा असताना त्याला तुम्ही विनाकारण जास्त महत्त्व दिले हेही मान्य व्हावे
मी मघासपासून तुमचीच बाजू मांडत होतो तुम्ही माझ्यावरच रागावताय . रागावायचे असेल त्रागा करायचा असेल तर समीरजींचा करावा
त्यांचा मोठेपणा लक्षात घेवून माझ्यासारख्या लहान व नवख्या म्हणजेच तूलनेने सोप्या टारगेटवर राग काढताय तुम्ही बाईसाहेब !!!!!!!!!!!!!!!!!!!!!

>>
जमीनीने मार खाल्ला, असे वाटले. एक प्रकारची आक्रमकता जाणवते.
असे करून दाखव तसे करून दाखव हे गझलेच्या प्रकृतीला पोषक नसावे बहुधा.
<<

समीर, हे नाही पटलं. म्हणजे तुमची वैयक्तिक आवडनावड समजू शकते, पण गझलमधे अमुक एक पावित्रा असू नयेच अशी कुठे नियमावली आहे का खरंच?
अ‍ॅकेडेमिक इन्टरेस्ट म्हणून विचारते आहे.

शेवटचे दोन शेर आवडले मला.

>>>>समीर, हे नाही पटलं. म्हणजे तुमची वैयक्तिक आवडनावड समजू शकते, पण गझलमधे अमुक एक पावित्रा असू नयेच अशी कुठे नियमावली आहे का खरंच?
अ‍ॅकेडेमिक इन्टरेस्ट म्हणून विचारते आहे.<<<<

धन्स स्वातीजी अगदी हेच म्हणायचय मलाही.

-सुप्रिया.

समीर, हे नाही पटलं. म्हणजे तुमची वैयक्तिक आवडनावड समजू शकते, पण गझलमधे अमुक एक पावित्रा असू नयेच अशी कुठे नियमावली आहे का खरंच?
अ‍ॅकेडेमिक इन्टरेस्ट म्हणून विचारते आहे.

स्वाती:

माझे मत समजून घेण्यात गल्लत तरी होतेय किंवा मला ते नीट पोहोचवता येत नाही, असे असावे.
मुद्दा किरकोळ आहे; गझलेत अनेकदा जमिनीमुळे पंचाइत होऊ शकते.
वरील गझलेत तशी झाली ही शंका मी उपस्थित केली होती.
वरील रचना मला एकसूरी, काहीतरी करून दाखव ह्या हेक्यातील वाटली.
हा हेका एकाद-दुस-या शेरात कदाचित छान वाटलाही असता.
गझलभर मला खटकले, आणि मी बोललो इतकेच.
ह्यासाठीच एक सोइस्कर बहुधा मी घेतला होता.

गझलेतील अनेक नियम खुद्द बाजूला सारले असल्याने त्यात भर घालण्याचा ह्या जन्मी तरी कोणताही
इरादा नाही (गंमतीत घेशील).

सुप्रियाजी: फार प्रपंच करावा लागतो, ह्याचसाठी अलीकडे लिहिणे थांबवले होते.
असो, यापुढे काळजी घेईन.

एक गालिबचा शेर ऐकवतो:

गा़लिब-ए-खस्ता के बिगैर कौनसे काम बंद है
रोइए जार जार क्या, कीजिए हाय हाय क्यों

धन्यवाद.

मला कल्पना होतीच की समीरजी त्या "बहुधा"च्या सोइस्कर्पणाचा मुद्दा चर्चेत आणतीलच म्हणून
पण तरीही आपली काही गल्लत झाली आहे हे त्यांना अजूनही मान्य नाहीचय असे स्पष्ट दिसत आहे

सुप्रियाताईंनी मनमोकळेपणाने इतकी चांगली चर्चा केली सुयोग्य व चपखल मुद्दे मांडले त्या पैकी एकाचाही उल्लेख (मलातर वाटते वाचनच ) टाळून अगदी शिताफीने वरचा प्रतिसाद देण्यात आला आहे.
थोडक्यात , समोरच्याने मान्यच करावे की दाखव ही रदीफ गझलेला कशी पोषक नाही ते

असो गालिबाचा शेर आवडला
गालिब मेला म्हणून जग थांबत नाही त्याची गझल गेली म्हणून जग रडते तद्वत कुणाच्या चुकीच्या आणि माफीचा धनी असलेल्या प्रतिसादाने चर्चा घडते आहे कुणाच्यामुळे कुणासाठी किंवा कुणावर तरी चर्चा घडत नाही आहे कुणीही गोड गैर्समज करून घेवू नये

सपशेल माफी मागायलाच हवी !!

काही लोक स्वतःला गझलेचा कानपूरी बादशः समजून मराठी गझलेत स्व्तःच्या आवडीचे कायदे लागू करत सुटले आहेत .
ज्याना आदर्श गझलकार मानावे तेच इतक्या चिल्लर चिल्लर चुका करत असतील तर नवख्यांनी कुणाकडून शिकायचे ?

फक्त दाखव ही रदीफ वेगवेगळ्या भाव बंधनातून वाचली / वाचता आली जे मुळात अपेक्षितच आहे .. तर स्वतःचाच मुद्दा खोडून काढता येण्या सारखा आहे पण लोकाना स्वतःचे मत खोडायचेच नाही आहे त्याला कुणी काय करणार ?

समीरजींच्या दोनही प्रतिसादांचा रोखठोक निषेध !!!

नुसते चांगले गझलकार बनून फायदा नाही आधी चांगला वाचक देखील बनायला हवे हे मला ह्या वरून शिकता आले ह्या साठी मात्र धन्यवाद !!!

क्षमस्वच
मुळात चूक माझीही आहेच
आपल्याकडे एक प्रामाणिक मुद्दा आहे आणि तो आपण मांडला तर समोरचा नक्की आपले मत विचारात तरी घेइलच ही एक चुकीची अपेक्षा तीही चुकीच्या माणसांकडून केली की अपेक्षाभंग होतोच होतो तसा माझा झाला इन फॅक्ट मीच तो करून घेतला
आणि त्या अपेक्षाभंगातून वरचा प्रतिसाद देवून बसलो

असो पुनश्च क्षमस्व
पुनश्च धन्यवाद

कुठलाही गैरसमज करून घेवू नये ही विनंती
मी चिडून अद्वातद्वा बोलत नाही आहे फक्त माझी तीव्र नाराजी व्यक्त करत आहे आणि शेवटी मला जमेल त्याच पद्धतीनेच मी ती करू शकलो आहे इतकेच काय ते
आणि माझ्या प्रतिसादाचे वाईट वाटून घेवून स्वतःचा दिवसही खराब करून घेवू नये अशी आग्रही प्रार्थना

Pages