हलकेच शिरशिरी मग ओठांवरुन जाते

Submitted by dr.sunil_ahirrao on 3 May, 2014 - 10:20

प्रत्येक वाट येथे काट्यावरुन जाते
प्रत्येक फूल येथे प्रेतावरुन जाते !

प्रेमात नेहमी या तू जिँकतोस मृत्यू
माणूस जात साली धर्मावरुन जाते

सांभाळ या सुखांना तू जोजवीत गीते
माझेच दुःख माझ्या कानावरुन जाते !

येशील का कधी तू, ते सांग आज राणी
सारी तुझी प्रतीक्षा जन्मावरुन जाते

जुल्फे तुझी मुलायम करतात गूज गाली
हलकेच शिरशिरी मग ओठावरुन जाते

हा योग छान आहे हातात हात आहे
पण पोट हाय माझ्या भाग्यावरुन जाते

संधी अशी हमेशा घाईत फार येते
घोड्यावरुन येते, थोड्यावरुन जाते

आताच त्या सुखाने माझा लिलाव केला
सलगी अशी सुखाची अंगावरुन जाते

मी कामगार आहे, मजला सुटी कशाला
माझी सुटी तशीही घामावरुन जाते

भलती मुजोर आहे म्हणतात लोकशाही
पैशावरुन येते, पैशावरुन जाते

निश्चीत टेबलाच्या खालून काम होते
सारीच काळजी बघ पैक्यावरुन जाते

स्वस्तात फार आता विकलास तू महात्म्या
साली इमानदारी पोटावरुन जाते

करतात ते समीक्षा आता भल्याभल्यांची
पण बालगीत त्यांच्या डोक्यावरुन जाते !

डॉ.सुनील अहिरराव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संधी अशी हमेशा घाईत फार येते
घोड्यावरुन येते, थोड्यावरुन जाते ...मस्त !

( फक्त हमेशा तेवढ खटकतय)

गै न,

-सुप्रिया.

शेवटचा शेर ज्जाम आवडला.
सुट्टी असा शब्द आहे.... (इथे सुटी घेतल्या आहेत का?) मजेत घ्याल. Happy

छान

दुसर्‍या, दहाव्या व अकराव्या शेरातील अलामत तपासावीत.

करतात ते समीक्षा आता भल्याभल्यांची
पण बालगीत त्यांच्या डोक्यावरुन जाते !<<< हा शेर छान आहे.

काही शेर नीट लक्षात आले नाहीत.

अरविंद चौधरी खुप खूप धन्यवाद

@बेफिकीरजी @वैवकु,

मनापासून आभार.उत्साहाच्या भरात चुका माझ्या लक्षात आल्या नाहीत. सुचेल त्याप्रमाणे बदल करेन.