“वाटसअपकट्टा”

Submitted by विनायक. दि.पत्की. on 30 April, 2014 - 03:18

हा असे आमुचा वाटसअपचा प्रिय कट्टा,
येथे चालतात आमुच्या सर्व बालीश थट्टा.
सादरी करणाचा जेव्हा सुरु होतो पट्टा,
उत्स्फूर्त मतदान ही होते एकगठ्ठा .

सुप्रभात म्हणत सुरु होते संतवाणी
माहिती मनोरंजनाच्या सापडतात खाणी
सादरी करणाची होताच निरखून पहाणी,
सुधारतात आमुचे विचार व रहाणी.

अधून मधून डोकावतात कधीतरी कोडी
सोडवण्याची धडपड,उत्तर जाणण्याची गोडी
अनुत्तराने वाढते कपाळाच्या आठ्यांची जाडी
मिळताच उत्तर एकदाचे सुरळीत होते गाडी

कधी होते दर्शन रटाळ चल चित्रफितीचे
आभार मानावे वाटतात गोड ध्वनी फितीचे
निसर्गसौंदर्य,हास्य फवारे,प्रदर्शन कलेचे
पसंतीच्या वर्षावाने भरते पारडे तुलेचे

सक्षमता दर्शनाचे आहे हे व्यासपीठ
काय करावे काय नको कळू लागले निट
भेटणे झाले सोपे टळली पायपीट
वाटसअप ची गोडी आहेच अवीट

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाट्सअप ची करामत

धुळीने माखलेला लॅपटॉप समोर आला,
अन बायकोचा पट्टा सुरु झाला .
वाटसअप चे झाले अनेक वार,
लॅपटॉप मात्र धुळीने झाला ठार.

बा.. तुमचे वाटसअप जसे सुरु झाले,
जगणे माझे मात्र अवघड झाले.

मी...सखे,असे रागावुन काय होणार ?
वाटसअप चे फायदे कधी जाणणार ?

बा...समजाउन द्यायला आहे का वेळ ?
नियोजनाचा जमतोय का ताळमेळ ?

मी...वाचन होउ लागले आहे जलद ,
टंकलेखन हि होउ लागले अलगद.

बा...चष्म्याचा नंबर जरा तपासुन बघा,
ऑफिस मधुन घरी लवकर निघा.

मी...जुन्या ओळखीची असते हमी,
आणी येणारे कॉल होतात कमी.

बा....घरात सर्वत्र लक्ष असावे,
तुम्ही कशात कमी नसावे.

मी...घर बसल्या सारे जग पहाणार,
एवढ्या स्वस्तात ज्ञान कोण देणार ?

बा.. घरातल्या पुस्तकांचे काय करणार ?
आहे का कोणी त्याला रद्दीत घेणार ?

मी...नियोजन तुझे निर्णय माझा,
आज पर्यन्त झाला का गाजावाजा ?

बा...नियोजन माझे, निर्णय हि माझे,
मला सहन होत नाही हे ओझे .

मी..नियोजनानेच निर्णय हि घ्यावे
सहवासानेच स्वंयपुर्ण हि व्हावे .

बा...तुम्हाला आमचे समजणार नाही
तुम्ही मोडताल पण वाकणार नाहीत.

मी...तु वाटसअप वर माझ्याशी संपर्क कर,
मात्र येणारे बिल मात्र तु भर .

बा....तुमचे बोलणे मलाआवडते फार,
ग्रुप मधे घेउन हलका करावा भार .

मी...तुला ग्रुप मधे नाही घेता येणार,
पण आपल्या दोघांचाच ग्रुप असणार

बा....तुम्ही तेथे जर मी असणार ,
तर तुमचे सर्वच मला मान्य असणार

-:वाटसअ‍ॅप मैत्री :-

का बरे पडला आज आपला कट्टा ओस ?
आहे का याला काही कारण ठोस ?
जरी आपण असू दूर अनेक कोस .
आपल्यालाच शोभतो हा आपला घोस .

असले काही दिवस जरी सुटीचे ,
आणी त्यात नियोजन अटीतटीचे
वाटस अ‍ॅप म्हणू नका कटकटीचे
नियोजन करावे ‘नेट’ मध्ये पटीचे

आता हा छंद जीवाला लावी पिसे
येथे वाट पाहणाऱ्याचे होऊ नये हसे
आता मनी वसे ते स्वप्नी दिसे
येथे हजेरीला दाम हि नसे

स्वत:च्या प्रगतीची संधी येथे आहे
घर बसल्या स्वस्त धंदा कोठे आहे ?
कट्टा नव्हे व्यसन ,हि जीवन शैली आहे .
नित्य संपर्कानेच मैत्रीचे तेज वाढत आहे .