खोड

Submitted by bnlele on 28 April, 2014 - 07:47

खोड

द्वयार्थि शब्द,भाषेचा दागिना असतो,
कधि गूढ विचारांचा संकेतही असतो.
दवबिंदूंवर सोनेरी कवडसा जसा,
इंद्रधनुष्य लपवून मिस्किल जसा.
शब्दफोड ही माझी खोड-
बघुया म्हटल जमते का जोड.

प्रत्येकात खोड असतेच असते,
असली गरजे पोटी तरि ती सोय असते.
कारण जरि अज्ञात अशी ती सवय असते.
उगीच गोंजारावा नाकाचा शेंडा,
कुणाच्या बोलण्यात खुपसून नाक.
दामटाव आपलच घोड, रेटून सतत पुढे.
लहान-मोठ्यांना डिवचाव,समाधान शोधाव,
चालत्या गाड्याला उगाच खीळ,
कुणाच्या आतड्यांना बसावा पीळ !
झाडाला सुद्धा खोड असते,
पण जगण्याची ती जिद्द असते,
मोहोर, फांद्या-फुलांचा आधार, अन्‌
पक्षांच्या घरट्यांची सोय असते.
निसर्गाच ऋण सव्याज फेडत,
अबोल सतत झिजत असते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिहिताना शेवटची दोन कडवि आधि सुचली पण त्याना सांधणार्रा दुवा मात्र नंतर आणि खूप प्रयत्ना नंतर सापडला.
"युरेका" सारखा !
पण तोस्तवऱ हाल झालेच !