असा चालतो की तसा चालतो

Submitted by सुशांत खुरसाले on 27 April, 2014 - 22:21

असा चालतो की तसा चालतो
कळेना कुणा मी कसा चालतो

मला फक्त छापील डिग्री हवी
मला कोणताही ठसा चालतो

पळावे तुम्हां वाटले तर पळा
मला चालुद्या मी जसा चालतो

नको एवढी सावली जीवना
मला उष्णसा कवडसा चालतो

कुणीही न आहे कुणाचे इथे
जगाचा तरी वारसा चालतो

कधी फक्त ओठांवरी ओठ दे
तुला मी कुठे फारसा चालतो ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users