मी तुझ्या शाळेत आहे जीवना

Submitted by जयदीप. on 22 April, 2014 - 05:23

पाहिले असतेस तेव्हा क्लेष माझे
वेचले असतेस तू अवशेष माझे

मी तुझ्या शाळेत आहे जीवना....अन्
चेहरे हसरे जणू गणवेष माझे

वाकडे काही न मी केले जगाचे
का बरे केले जगाने द्वेष माझे

हरवले गर्दीत माझ्या सारख्यांच्या
वेगळे होते तसे अन्वेष माझे

राहिलो नाही तिथे मी एवढासा
चालले होते जिथे विनिवेष माझे

लावला असतास तू जयदीप तेव्हा
लाभले असते मला उन्मेष माझे

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users