वीजेचं मीटर तपासून घेणे

Submitted by शर्मिला फडके on 21 April, 2014 - 01:35

गेले दोन-तीन महिने आमचं वीजेचं बील अनयुज्वली हाय येते आहे. म्हणजे अगदी तिप्पट वगैरे. वापर तेव्हढाच आहे. रिलायन्स कॉल सेंटरला कम्प्लेन्ट करुनही काही फरक नाही. काय प्रोसिजर आहे ही कम्प्लेन्ट मार्गी लावण्याची?

काय कारण असू शकतं असं जास्त बील येण्याचं? इतरांच्या वीजेच्या मीटरमधे कोणी मुद्दाम काही गडबड करु शकतं का? तसं कोणी आमच्या मीटरशी खेळ केले असतील तर ते कसे समजणार?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शर्मिला,
विजेचा मिटर जिथे असेल तिथे मिटर रिडींग रोज घेणे. रोज रिडींगमधला सुरुवातीचा व अंतिम बदल टिपून ठेवणे. जर मिटर वेगात फिरत असेल तर घरातले एक एक इन्स्ट्रुमेंट बंद व चालू करत निरिक्षण करणे. सगळी विजेची इन्स्ट्रुमेंटस बंद असतील व तरी मिटर वेगात फिरत असेल तर मग इलेक्ट्रीशीअन ला बोलावून घेणे व शोध घेणे/खातरजमा करणे. एकदा का प्रॉब्लेम समजला की मग एमेसीबी च्या इंजिनिअरशी संपर्क करणे.

सुरुवातीचा व अंतिम बदल? म्हणजे आज दुपारी चार वाजता जर मी तिथले आकडे नोंदवून घेतले तर उद्या दुपारी पुन्हा त्याच वेळी बघू का?

घरातले सगळे दिवे व उपकरणे बंद ठेउन एक १०० वॅटचा दिवा चालु ठेवावा. मीटर वर १/१० युनीट १ तासाला खर्च झालेले दिसले तर मिटर बरोबर आहे असे समजावे. अन्य उपकरण ज्याचे वॅटेज माहित आहे आणि जे कायम ऑन रहाते वापरुन हे शोधता येते.

१०००वॅट म्हणजेच १ किलोवॅट चे उपकरण १ तास चालु राहिल्यास १ युनीट वीज वापरली जाते हा फॉर्म्युला लक्षात ठेऊन वीजमीटर तपासायला कोणा तंत्रज्ञाची आवश्यकता नाही.

१०० वॅटचा बल्ब आजकाल कुणी वापरत नाही. पण बाजारातुन आणता येणे फारसे खर्चीक आणि कटकटीचे नाही.

एकदा मिटर बरोबर आहे हे समजल्यानंतर फ्रीज चेक करावा. फ्रीज चा काँप्रेसर हवे ते तपमान ( दरवाजा न उघडता ) आल्यावर बंद व्हायला पाहिजे. काही वेळा फ्रीजचा थरमोस्टॅट बिघडलेला असतो. अश्या वेळी फ्रिजचा काँप्रेसर ( ऑन्/ऑफ) होत नाही व कायम चालु रहातो.

फ्रीज चे व्हायब्रेशन चेक करुन कॉप्रेसर ऑन्/ऑफ होतो आहे किंवा नाही हे समजते.

हीच बाब एअर कंडिशनर जर वापरत असाल तर तपासावी.

माझ्या अनुभवाप्रमाणे वीज मीटरमध्ये या पध्दतीचा बिघाड होत नाही. दोष झाल्यास फ्रीज किंवा एअर कंडिशनर या मध्ये किंवा तत्सम उपकरणात असु शकतो.

आमच्या इकडे महावितरण चे जुने इलेक्ट्रॉनिक मीटर्स बदलून नवी इंफ्रारेड वाले इलेक्ट्रॉनिक मीटर्स लावली होती तेव्हा खुप लोकांना हाच अनुभव आलता, नेहमी पेक्षा दुप्पट तिप्पट बिले आलती, कोणी म्हणतय की हे मीटर्स मॅन्युअली कमी जास्त कॅलीब्रेट करता येतात, अरविंद केजरीवाल देखील ह्या विषयी नेहमी बोलत असतात

100 वॅट चा बल्ब सारखा 10 तास चालव्यास 1 युनिट पडते , हा उपाय पण चांगला आहे घरच्या घरी चेक करायला, दुकानातून बल्ब घेताना वॅट मापक यंत्रामधुन खात्री करून घ्या