घटस्फोटाच्या रात्री ..

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 19 April, 2014 - 10:37

नक्कीच ती सुखात असेल
त्याला उगाच वाटत होते
कडवट ओठ सिगारेट धूर
दीर्घ हवेत सोडत होते
आता हक्क त्याचा तिच्या
कशावरही उरला नव्हता
येणे जाणे जगणे तिचे
काही फरक पडणार नव्हता
एक कागद एक सही
सारे किती पटकन झाले
वर्षानुवर्ष गरळ साठले
क्षणात शाईमधून झरले
ओ हो सुटका झाली शेवटी
त्याची तिची आणखी कुणाची
छती दाटल्या धुम्र अभ्राही
आज नव्हती घाई निघायची
तरीही पोकळ, पोकळ पोकळ
एक रितेपण दाटले होते
ओझे आले का ते गेले
त्याला अजून कळत नव्हते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुरेख! सध्या नुकतच एका अत्यंत जवळच्या फ्रेंड कपलच या सगळ्यातुन जाण पाहीलय..त्यामुळे अधिकच भिडली ही कविता.

विप्र, कवितेतील नायकाची संदिग्धता मनाला भावतेय. नायकाचा अनुभव कवितेत जमून आलाय.

वेल, परस्परसंमतीने घटस्फोट (amicable divorce) असेल तर असे होत नसावे.

आ.न.,
-गा.पै.