मी हवेतच राहतो हल्ली म्हणे

Submitted by जयदीप. on 18 April, 2014 - 02:15

खूप केले आजवर 'चिंतन-मनन'
आठवांचे मी अता करतो दहन

मी हवेतच राहतो हल्ली म्हणे
काढले आहे मनावरचे वजन

समजलो मी जेवढा, जितका तुला
अर्थ आयुष्या मला आला गहन

माणसाच्या सारखे वागू नको..
मी कसे करणार मग 'देवा' नमन?

संपल्यावर साथ हे कळले मला
तू मला अन मी तुला केले सहन

--जयदीप

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी हवेतच राहतो हल्ली म्हणे
काढले आहे मनावरचे वजन

समजलो मी जेवढा, जितका तुला
अर्थ आयुष्या मला आला गहन

संपल्यावर साथ हे कळले मला
तू मला अन मी तुला केले सहन<<< वा वा

छान झलीये सगळी मला एक दोन शेर विशेषत्त्वाने आवफले असले तरी बाकीचेही उत्तम शेरच आहेत

मला व्यक्तिशः मतल्यातील दुसर्‍या ओळीत " आठवांचे दहन ठेवणे " समजले नाही करण दहन ह्या क्रीयेला ठेवणे हे क्रियापद मी कधी बघीतले नाही त्यामुळे मला असे वाटत असेलही ..असो!

अरविंदजी... बरोबर म्हणालात... मला अजूनही चिंतन मनन (गझलेचं) जमत नाही. प्रयत्न करतो आहे. Happy

बेफिजी, रश्मीजी, वैभवजी... धन्यवाद Happy

सर.... 'दहन' (करण्याचे काम मी अमुक अमुक दिवशी) ठेवतो असं मला म्हणायचं आहे...

ठेवतो च्या जागी 'होउदे', 'चालले', 'योजतो' इ शब्द आधी योजले होते...पण 'ठेवतो' जरा वेगळा वाटला..

कळून येत नसेल तर बदलतो

Happy