इस्टर ट्रीट्स - चिक 'N' नेस्ट

Submitted by लाजो on 16 April, 2014 - 09:32
लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

इस्टर ट्रीट्स - चिक 'N' नेस्ट

ester03.JPG

साहित्यः

कुकिंग चॉकलेट / चॉकलेट मेल्ट्स (मी ३९५ ग्रॅमचे मिल्क चॉकलेट मेल्ट्सचे एक पाकीट वापरले)
अर्धा ते पाऊण कप क्रिम
राईस बबल्स / कोको पॉप्स
मिनी चॉकलेट एग्ज,
चॉकलेट फ्लेक्स,
रिकामे आईस्क्रिम कोन्स

सजावटीसाठी फरी चिकन्स (आर्ट & क्राफ्ट शॉपमधे मिळतात)

ester01.JPG

क्रमवार पाककृती: 

ester02.JPG

१. चॉकलेट आणि क्रिम एका मावेसेफ बोल मधे घालुन मेल्ट करुन घ्या - दर ३० सेकंदांनी बाहेर काढुन ढवळून परत ३० सेकंद गरम करा... असे २-४ वेळा करावे लागेल (बोल साईझ आणि मावे ची पॉवर यावर अवलंबून)

२.१/३ मेल्टेड चॉकलेट एका दुसर्‍या बोलमधे काढुन त्यात कोको पॉप्स / राईस बबल्स घाला आणि नीट ढवळून घ्या.

३. रिकाम्या कोन्स मधे आत २-४ मिनी एग्ज घालुन त्यावर हे मिश्रण भरा.

४. आता उरलेल्या मेल्टेड चॉकलेटचे परत २ भाग करुन एका भागात कोको पॉप्स/ बबल्स घालुन कोन्स मधे भरा. परत असेच उरलेल्या मेल्टेड चॉकलेटचे करा. (टीप १ बघा)

५. सगळे कोन्स भरून झाले की त्यावर चॉकलेट फ्लेक्स, मिनी चॉकलेट एग्ज आणि चिकन्स मेल्टेड चॉकलेट ने चिकटवा.

ester06.JPG

मी \ कोन्स + चॉकलेट इस्टर एग्ज असे छोट्या सेलोफिन बॅग्जमधे भरुन रिबीन लावुन बास्केट मधे ठेऊन शाळेत पाठवले Happy मुलांना आणि टिचर्स ना खुप आवडले Happy

ester10.JPGester08.JPGester09.JPG

वाढणी/प्रमाण: 
खाल तेव्हढे :)
अधिक टिपा: 

१. सगळ्या मेल्टेड चॉकलेट मधे एकाच वेळेस बबल्स्/कोको पॉप्स घातले तर चॉकलेट आळायला लागले की सगळे मिश्रण घट्ट होऊन जाईल आणि कोन्स मधे भरायला त्रास होइल. तीन भागात केल्यामुळे जर मेल्टेड चॉकलेट घट्ट झाले तर ते मेल्ट करुन मग त्यात बबल्स/कोको पॉप्स घालायचे.

ester04.JPG

या आधीच्या इस्टर ट्रीट्स...

चॉकलेट नेस्ट अ‍ॅंड इस्टर एग्ज केक

इस्टर ट्रीट्स - 'मिनी चॉकलेट नेस्ट्स'

इस्टर चॉकलेट एग्ज बास्केट

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम मस्त...
मी तुमच्या बर्‍याच रेसीपीज करून पाहील्या आहेत. खुप मस्त असतात
_/\_
अशी आई पाहिलि कि मला स्वतः कडे बघायला कस तरि वाटत . : ( मि किति आळशी) :
++१

धन्यवाद लोक्स Happy

वेलकम करणार्‍या सगळ्यांना स्पेशल थॅंक्यु Happy

सध्या जरा कामात वगैरे खूप व्यस्त आहे त्यामुळे इथे जास्त येऊ शकत नाहिये...पण भेटुच मधुन मधुन Happy

Pages