पाव / डिनर रोल सोप्पे फोटो सहित

Submitted by मि सुनिता on 16 April, 2014 - 09:27

https://lh4.googleusercontent.com/-p-ohcpNkI7A/U007rw-EmyI/AAAAAAAAE4o/W...

साहित्य:
३ कप मैदा
२ टिस्पून ड्राय यिस्ट
दिड टिस्पून साखर
१ टिस्पून मिठ
१/४ कप तेल
१ कप कोमट पाणी
अन्डे-१

*एका लहान वाडग्यात १ कप कोमट पाणी घ्यावे. पाणी खुप गरम नसावे. या पाण्यात दिड टिस्पून साखर घालावी. थोडे ढवळून ड्राय यिस्ट घालून मिक्स करावे. त्यात ३ कप पिठ,अन्डे, तेल ,मिठ घालून एकदम मऊसर मळून घ्या.

https://lh3.googleusercontent.com/-g2tOPj1DRgE/U007tYOla-I/AAAAAAAAE4w/W...

भांड्याला आणि गोळयाला तेल लावून तो गोळा झाकून ठेवा. वरून झाकण ठेवून एक-दीड तास उबेला ठेवावे.
एक-दीड तासांनी पिठाचा गोळा दुप्पट आकाराचा होईल.

*बेकिंग ट्रेला थोडा तेलाचा हात लावावा.एकसमान गोळे करावे. पावाचे गोळे अजून फुलून येण्यासाठी १/२ तास झाकून ठेवावे.

१/२ तासाने ओव्हन सी १८०[फेरंहित३५०] वर प्रिहीट करावे. ओव्हन प्रिहीट झाल्यावर पाव २० ते २२ मिनीटांसाठी बेक करावे. ओव्हन बंद करावा, ट्रे ३ ते ४ मिनीटांनी बाहेर काढावा.
.
[पाण्याचे तापमान ५० अंश किंवा थोडे कमी असावे. १कप माप हे २५० मिली पाणी राहील एवढा मोठा कप आहे. तुमच्या घरी इतर कोण तेही बॉटल असेल जिच्यात एवढे पाणी मावत असेल तर तिच्या ने तुम्हाला प्रमाण कळेल.हवे असेल तर तुम्हाला आवडत असलेले हेर्ब्स घालू शकता. ]
फोटो दिसत आहेत का ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ज्या पद्धतीने सांगितले आहे त्याच पद्धतीने बनवले तर अतिशय मौ ..पाव भाजी, मिसळ पाव, भुर्जी पाव सोबत चालतील असे पाव तयार होतील ..एकदा ट्राइ करून बघा ..सोप्पी पद्धत आहे..जर गोड पाव हवे असतील तर साखर वाढवा..

मस्त दिसताहेत पाव Happy

*बेकिंग ट्रेला थोडा तेलाचा हात लावावा.एकसमान गोळे करावे. पावाचे गोळे अजून फुलून येण्यासाठी १/२ तास झाकून ठेवावे.>> यानंतर गोळे पुन्हा मळून घ्यायचे का? की थेट भाजायला ठेवायचे?

या तीन कप मैद्याच्या प्रमाणात किती पाव होतात?

मंजूडी |
यानंतर गोळे पुन्हा मळून घ्यायचे का? की थेट भाजायला ठेवायचे?
>> थेट भाजायला ठेवायचे..सॉरी लेट रिप्लाइ दिला ..सुट्ट्या असल्याने घरी नवते Happy

या तीन कप मैद्याच्या प्रमाणात किती पाव होतात?>> मी दिलेले प्रमाण हाफ वापरले.. तर नौ पाव झाले ..वर बनवलेले पाव हे तेच प्रमाण अर्धे वापरुन बनवले आहे..

खुपच मस्त दिस्ताहेत. पावांवर ओवनमध्ये ठेवताना दुध किंवा अंड्याचा वॉश लावला होता का?>>>
हो अग लावला होता एग वॉश पण त्याने चवीत फार फरक पडत नाही..पण कलर छान येतो..

हो अग लावला होता एग वॉश पण त्याने चवीत फार फरक पडत नाही..पण कलर छान येतो..

अगं मुद्दाम विचारले कारण एग वॉश लावला नाही तर पावावर काळपट चकचकित रंग जो येतो तो येत नाही. नुस्ताच थोडासा काळा पडतो वरुन आणि त्यामुळे बाजारातल्या पावाची गंमत येत नाही त्यात. चवीत अर्थात फरक पडत नाही. एग वॉशच्या जागी शाकाहारी मंडळी दुधही वापरु शकतात पण एवढे चकचकीत होत नाही पाव दुधामुळे.

मंजुडी, पाव आकार देऊन झाकुन ठेऊन फुगल्यानंतरच ओटिजीच्या आत ठेवलेले चांगले, असे पाव आत ठेवल्यावर अजुन थोडे फुगतात. म्हणजे पाव बाहेर दोनदा फुगवावा लागतो. एकदा पिठ मळल्यावर तास-दिडतासभर ठेऊन फुगवाय्चे, मग ते फुगलेले पिठ परत मळायचे आणि हवे ते आकार दिल्यावर परत अर्धा तास बाहेर ठेऊन फुगवायचे. हे दुस्-या वेळेस बाहेर ठेवुन फुगवले नाही तर भाजताना फारसे फुगत नाही. मी एकदोनदा पार फसलेय पाव करताना त्यामुळे आता माहित झालेय त्याचे तंत्र. Happy

केक आत ठेवल्यावर लगेच फुगतो, तर पाव बाहेर ठेवून फुगवावा लागतो.

पावांवर ओवनमध्ये ठेवताना >> मी वाचलं पावांवर ओवन ठेवताना आणि विचार करतेय पावांवर ओवन हा काय प्रकार आहे. Wink

वाक्यरचना सदोष आहे. ओवनमध्ये ठेवताना हा समुह सुरवातीला यायला हवा.. Happy पण मी जसा विचार करते तसेच इथे टायपत जाते त्यामुळे शब्दसमुह मागेपुढे होतात.

सायो --- एग वॉश म्हणाजे काय लावायचं? अंड्यातलं पांढरं? >>>
नाही एग वॉश म्हणजे 1 अन्डे घे.. मग ते फेट..मग त्यात 2 टेबल्स्पून दूध घाल..आणि परत फेट.. मग हलकेच एखाद्या ब्रश ने किंवा हाताने पावा च्या गोळयांवर लाव..झाले..आता पाव ओवेन मधे बेक करायला ठेव.

प्राची---- पाव एकदम छान दिसत आहेत.. एखादा पाव कापून फोटो काढला आसशील तर तोही टाक..मी घाईत विसरलेच फोटो काढायचा..

मी दोन वेळेस प्रयत्न केला हे पाव करण्याचा.
सुरुवातीला साखरमिश्रित कोमट पाण्यात यिस्ट घातल्यावर फेस वगैरे काही आले नाही. नंतर मैदा घालून मळून ठेवल्यानंतर पिठ असे दुप्पट वगैरे फुलून आले नाही. मग कदाचित यिस्ट जुने असेल म्हणून नवीन यिस्ट आणून दुसरा प्रयत्न केला. त्यातही पिठ फुलून आले नाही. थोडीशी जाळी पडली होती व पिठ सैल वाटले हाताला. गोळे करताच येत नव्हते एवढे पिठ सैल झाले होते. कोणी स्टेप बाय स्टेप कंसिस्टन्सी वगैरे निट दिसेल असे फोटोस टाकू शकेल का?

काय मस्त दिसत आहेत पाव.

आपण जे बेकरीतुन पाव आणतो त्यात पण अंडे असते का? कारण आम्ही ज्या दिवशी मांसाहार करत नाही तेव्हा कधी कधी पाव खातो. आणि जरी पावाच्या मिश्रणात अंडे नसले तरी वरुन लावत असतील असा आता मला संशय येतोय कारण ते पावही वरील फोटोतल्या पावासारखेच चमकतात.

Pages