चेरी ब्लॉसम

Submitted by मानुषी on 15 April, 2014 - 19:25

गेले काही दिवस इथे डीसीत वसंत ऋतूच्या आगमनाची दवंडी पिटणारा चेरी ब्लॉसम महोत्सव चालू आहे. चेरी ब्लॉसमचा हा बहर पोटोमॅक नदीच्या टायडल बेसिन च्या भोवताली फुललेला आहे.
आम्ही काल बहर बघायला गेलो होतो. खरं म्हणजे आम्ही बरेच उशिरा गेलो. तोपर्यंत बराचसा मोहोर गळून गेला होता.
पण काल आठवड्याचा पहिला दिवस …सोमवार…. असूनही या उत्सवाला जगभरातल्या कानाकोपृयातून लोक आलेले दिसत होते.
वेगवेगळ्या देशातल्या लोकांच्या नुसत्या झुंडी इकडून तिकडे फिरताना दिसत होत्या.
आणि एक डोम शेप छप्पर असलेली जी पांढरी इमारत दिसतीये ती थॉमस जेफरसन मेओमोरियलची आहे. या इमारतीच्या आसपास दिसणारा गुलाबी रंग (लांबूनच्या फोटोतला) सगळा चेरी ब्लॉसमचाच आहे.
तर जो काही बहर आम्हाला पहायला मिळाला त्याच्या या आठवणी.

नदीच्या पाण्यात गळून पड्लेल्या पाकळ्यांमुळे पाण्यावर दिसणारा गुलाबी थर.

हा शेवट्चा फोटो चेरी ब्लॉसम नाही. माझ्या रोजच्या चालण्याच्या रस्त्यावर अचानक फुललेला हा वसंत...( जिप्सी यांच्या सांगण्यावरून हा फोटो मुद्दाम इथे देत आहे.

हे काही फोटो असेच...... जवळ्जवळ ४/५ महिने रस्त्याच्या दुतर्फा आपले भुंडे हात आकाशाकडे रोखून उभे असलेले खराटे आता या सुंदर रूपात दिसतात.


शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर फोटो. मी आपले परवाचे गटग आटोपून शनिवारी अगदी साडेतीनचा गजर ठेवला. चारला उठलो. साडेचारला कॅब डीसीसाठी कॅब घेतली आणि पावणे सहाला टायडल बेसिनपाशी पोचलो. एक वेढा पहाटे घातला एक वेढा संध्याकाळी रात्रहोईपर्यंत घातला. शनिवारचा तो दिवस खास चेरी ब्लॉसमचा होता. रात्रीच्या पावसामुळे फुले अगदी ताजी होती. बरीच फुले त्याच पहाटे उमलली होती. पहाटे पहाटे तर एकदम शांत निरामय वातावरण होते तिथले. मी नंतर माझ्याकडचे छायाचित्र इथे अपलोड करेन. तुम्ही खरच उशिर केला तिथे जायला. तो बहर काहीतरी वेगळाच आहे.

अतिशय सुंदर फोटो. खुप आवडले.

ती इमारत कोणती आहे? शेवटाच्या फोटोत खुपच सुंदर दिसतेय.

आईग्गं, मानुषी, काय कातिल फोटो आहेत! Happy

पहिला फोटो तर खूपच आवडला. आणि बहरलेल्या झाडांच्याखालून जाणारी लोकं आहेत तेही फोटो बघून आता तिथे यावसं वाटतंय. हा जर ओसरलेला बहर असेल तर ऐन बहरातला बहर काय असेल!!!

इतका सुरेख अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवादच!

मानुषीताई, खुप सुंदर फोटो.

आयुष्यात एकदातरी चेरी ब्लॉसम, ट्युलिप गार्डन आणि जॅकरांदाचा बहर बघण्याची जबरदस्त इच्छा आहे. Happy

रच्याकने, निगवर टाकलेला फुलांचा क्लोजअप इथे टाक ना. मस्त आहे तो फोटो. Happy

अप्रतीम नजारा! खरच खूप समाधान वाटते असे फोटो पाहिल्यावरच. असेच सौन्दर्य सोहळे तुम्ही अनूभवत रहा आणी आम्हाला त्याचे दर्शन घडवत रहा.:स्मित:

नदीचे दर्शन देखील सुखावह आहे.

कसले मस्त फोटो आहेत...... मला हे डि.सि चे ब्लोस्सोम कधि बघायला मिळणार माहित कारण मागच्या वर्षि उशीरा होत हे, पण हे फोटो बघुन आगदि तिथे जाउन आल्या सारख वाटल....भारिच आहे

मानु. मस्त मस्त वाटलं.... कसले भारी आलेत फोटोज.. डोळे भरून पाहिले.. पण मन नाही भरत.. सुप्पर्ब!!!!