नेहमी आभाळ भरले की कुठे पाऊस येतो ? (तरही)

Submitted by इस्रो on 13 April, 2014 - 08:22

आपल्या मदतीस कोठे, आपला माणूस येतो ?
नेहमी आभाळ भरले, की कुठे पाऊस येतो ?

कोवळ्या सार्‍या कळ्या अन, छाटली त्यांनी फुले पण
गंध आता त्या कळ्यांचा, कातरी चाकूस येतो

ओरडाया लागती हे, कावळे पोटात तेव्हा
मायच्या मम भाकरीचा, वास जो खरपूस येतो

जीव लावा अन कितीही, मान द्या; आदर करा
राग केव्हाही अचानक,थोरल्या जावूस येतो

बांग देता कोंबड्याने, सूर्य आकाशात येतो ?
नाचला की मोर रानी, काय मग पाऊस येतो ?

तांबडा हिरवा असो की, रंग पिवळा वा बदामी
कोंदणाविण नूर 'नाहिद', कोणत्या पाचूस येतो ?

- नाहिद नालबंद [९९२१ १०४ ६३०]
[nahidnalband@gmail.com]

Group content visibility: 
Public - accessible to all site users