पारदर्शक एवढा झालास तू.....

Submitted by जयदीप. on 9 April, 2014 - 15:46

वागणे माझे मला नाही पटत
बोलणे माझे मला नाही कळत

पारदर्शक एवढा झालास तू.....
सावली आता तुझी नाही पडत

जन्मलो अन् वाढलो होतो तिथे
ओळखीचा चेहरा नाही दिसत

बोचली होती फुले तेव्हा जशी
एकही काटा मला नाही सलत

मी कधी फुलपाखरू, पक्षी कधी
भाग्यही म्हणते मला "गेला उडत! "

संपतो संपायचा असतो जिथे
शेवटी रस्ता कधी नाही वळत!

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पारदर्शक एवढा झालास तू.....
सावली आता तुझी नाही पडत

व्वा….

संपतो संपायचा असतो तिथे
शेवटी रस्ता कधी नाही वळत!

चांगला आहे….

छान गझल.

पारदर्शक एवढा झालास तू.....
सावली आता तुझी नाही पडत

बोचली होती फुले तेव्हा जशी
एकही काटा मला नाही सलत

मी कधी फुलपाखरू, पक्षी कधी
भाग्यही म्हणते मला "गेला उडत! "

>> कमाल!!
व्वाह!

बहुत खुब ...बेहतरीन ..गझल आवडली.

पारदर्शक एवढा झालास तू.....
सावली आता तुझी नाही पडत

क्या बात !