नको जाऊस त्यांच्या हसण्यावर

Submitted by जयदीप. on 8 April, 2014 - 02:24

नको जाऊस त्यांच्या हसण्यावर
नको जाऊस त्यांच्या असण्यावर

कसे देतोस त्यांना समजावुन
भरवसा देव ज्यांना नसण्यावर

पुन्हा देशील थापा तोंडावर
तुझे चालूच माझ्या फसण्यावर

पुन्हा देईन त्यांना माझेपण
मला दे तोड त्यांच्या डसण्यावर

उभे कोणीच नसते पाठीशी
नको जाऊस त्यांच्या बसण्यावर

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users