मासे ४७) राणी मासे

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 April, 2014 - 15:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आवश्यकते नुसार राणी मासे.

हळद पाव चमचा ( दोन माश्यांसाठी)
दिड चमचा मसाला
गरजे नुसार मिठ
आल-लसुण्,मिरची कोथिंबीर पेस्ट किंवा लसुण ठेचून
तळण्यासाठी तेल.
थोडा लिंबाचा रस

क्रमवार पाककृती: 

माशाची खवले काढून त्याचा डोक्याचा भाग, शेपूट, पर काढून टाका.
त्याचे दोन भाग करून तिन पाण्यांमधून स्वच्छ धुवून घ्या.
आता त्याला हळद, मसाला, मिठ, आल-लसूण, मिरची कोथिंबीर पेस्ट, लिंबाचा रस चोळा.
तवा चांगला तापला की त्यात तेल टाकून ह्या तुकड्या शॅलोफ्राय करा.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी १ तुकडी
अधिक टिपा: 

हे मासे दिसायला इतके सुंदर असतात त्यामुळे कदाचीत त्यांना राणी असे नाव पडले असेल. गुलाबी, चकचकीत रंगाचे मासे अगदी फिश टँक मध्ये ठेवण्यासारखे असतात.

रुपा प्रमाणे तशी चव मला खास वाटली नाही. हे माझे वैयक्तीक मत आहे. पण बरेच जण हे मासे आवडीने खातात.

हे मासे इतर नामवंत मास्यांपेक्षा स्वतःही असतात.
मला ८० रु. जोडी मिळाली.

वरती वाटण, लसुण, लिंबाचा रस ऑप्शनल आहे. कारण काही जण नुसते मिठ, मसला, हिंग, हळद लावून तळतात. पण ह्या माश्यांना वाटण, लिंबाचा रस लावला तर ते अधिक चविष्ट लागतात असे माझे मत.

माशांचे इतर प्रकार - http://www.maayboli.com/node/23836

माहितीचा स्रोत: 
कोळीण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, तुझ्या इतक्या छान छान रेसिपीज वाचून मी सुद्धा एखादे दिवशी मासे खायला लागेन अशी भीती वाटते मला! Happy

अरे वा ! बर्‍याच दिवसांनी आले की मासे Happy
जागू ताई, बर्‍याचश्या माशांची पा.कृ. सारखीच वाटते. एखाद्या लेखात मासे स्वच्छ करतानाचे फोटो टाक ना. कारण आता तुझे लेख वाचून वाचून मासे बनवता येतील पण ते साफ कसे करायचे हेच माहीत नाहिये.

जागु ! नेहमीप्रमाणेच मस्त रेसिपी .
मासा कमनीय दिसतोय , म्हणुनच त्याच / तिचं नाव राणी ठेवलयं का ? Proud
खात्यापित्या घरातला असावा तो इब्लिस >>> Lol

चला, जागूजीनी दखल घेतली म्हणजे 'राणी'च्या डोक्यावर खरंच मुकूट आला ! Wink
अट्टल मासेखाऊ असूनही मीं मात्र हा मासा अजून चाखलेला नाही. [अर्थात आतां ही कसर भरून काढीनच !].
सिंधुदुर्गात 'तांबोशी' म्हणतात तोच का हा मासा ? तसं असेल तर तिथं खूप कौतुक आहे ह्या माशाचं !

मला आवडतो हा मासा. चवीला ठिकठाक आहे, किंमतीच्या मानाने.

एखाद्या लेखात मासे स्वच्छ करतानाचे फोटो टाक ना. कारण आता तुझे लेख वाचून वाचून मासे बनवता येतील पण ते साफ कसे करायचे हेच माहीत नाहिये.

मासे न खाणारी मंडळी फोटो पाहुन पळून जातील आणि अहिंसक लोक लगेच निषेध नोंदवतील. बाकी आमच्यासारखे मात्र मजेत जिभल्या चाटतील Happy

मस्त .. पण मला नाहि आवड त..

मासे न खाणारी मंडळी फोटो पाहुन पळून जातील आणि अहिंसक लोक लगेच निषेध नोंदवतील. >>++११

सिंधुदुर्गात 'तांबोशी' म्हणतात तोच का हा मासा ? >>>> कदाचित नाही कारण आमच्याकडे लाल माशाला तांबोशी पण म्हणतात. जागुने अजुन त्याची रेसिपी नाही लिहली वाटतं.
तो लाल मासा उर्फ तांबोशी खाण्यापेक्षा जेव्हा कोळीन तो साफ करते ते बघयाला मला फार आवडते. ती माशाचे डोके कापते आणि हातात धरुन त्याला दोन्ही बाजुने अक्षरशः सोलुन काढते. त्याची साल खाण्यास वापरत नाहीत फक्त मांसच खातात.

गोष्टीगावाचे >>
तो सोलून काढतात तो 'मोरी' (shark) .. तांबोशी नसावी.. >>> नाही तो मासा लाल रंगाचा असतो. ह्म्म मोरी/मुशी पण तशीच सोलुन काढतात.

जागू माबोवरच्या क्रमश: कादंब-यांप्रमाणे तुम्ही माशाच्या रेसिपीसाठी वाट खूप बघायला लावलीत Proud डोण्ट माईंड हं, गम्मत केली

जागुले मुंबईत असताना पाँफ्रेट, मांदेली, राणी मच्छी , बोंबिल एक्दमैश फेव होते

खूप वर्षांनी आठवण आली

सिंधुदुर्गात 'तांबोशी' म्हणतात तोच का हा मासा >> तांबोशी निराळी.. यापेक्षाही लाल रंगाची असते आणि आकारही निराळा असतो. साधारणपणे खोल समुद्रात मिळते.

हो. तांबोशी वेगळी.. Red Snapper..
ती चवीला जास्त छान असते राणी माशापेक्षा..
गोव्याला त्याचे खूप वेगवेगळे प्रकार करतात..

तांबोशी वेगळी.. Red Snapper..
ती चवीला जास्त छान असते राणी माशापेक्षा..
गोव्याला त्याचे खूप वेगवेगळे प्रकार करतात..
Submitted by निरु on 12 April, 2018 - 10:22 >>>>>>>>>>>>>>> हा का ?
small-red-snapper.jpg

जागु ताई, या माशाला कसे शिजवायचे.