भरकटल्या प्रवासांची

Submitted by निशिकांत on 7 April, 2014 - 02:22

जिथे होती गुन्हेगारास भीती रामत्र्यांची
तिथे का रोखलेली वाट आहे लोकपालांची ?

कुणा निवडून द्यावे? जर उभी जत्रा लबाडांची
कधीपासून लुटते देश ही टोळी गिधाडांची

कितीशा पंचवार्षिक योजना आल्या तशा गेल्या
तरी चालूच भटकंती भुकेसाठी बिचार्‍यांची

जसा पाऊस आला आवकाळी काल गारांचा
तशी सरसावली पिळण्यास टोळी सावकारांची

पिकांनी टाकल्या माना खळे ना कापणी, मळणी
किसानांची सुगी सुरुवात झाली आत्महत्त्यांची

पुजे देवास जो तो मंदिरी जाऊन भक्तीने
समाजाने कदर केली न केंव्हा मूर्तिकारांची

विचारी देश क्रोधे नौदलाची यंत्रणा बघुनी
बुडाया लागली का? गलबते माझ्या किनार्‍यांची?

कुणाला सोडले, धरले कुणला चौकशीसाठी?
दरोगा वाट का बघतो वरिष्ठांच्या इशार्‍यांची

विरोधी अंधश्रध्देच्या, म्हणोनी मारले त्याला
अजूनी नोंद चालू फक्त वांझोट्या जवाबांची

किती "निशिकांत" होते मार्ग चुकले जीवनी तुझिया !
लिहाया घे कहाणी वाट भरकटल्या प्रवासांची

निशिकांत देशपांदे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुजे देवास जो तो मंदिरी जाऊन भक्तीने
समाजाने कदर केली न केंव्हा मूर्तिकारांची

खरे असावे हे. शेर छानच आहे.