तुम्ही कुठल्या game च्या व्यसनाधीन (Addicted )आहात ???

Submitted by रणथंबोर on 6 April, 2014 - 07:31

तर मंडळी....

सध्या आपल्या सगळ्यांकडे Smarthphone नामक अवयव असेलच ..त्यात तो Android वर पळणारा असणायची शक्यता जास्त आहे (Windows वाले अल्पसंख्याक पण असतीलच ).. तर मला हे जाणून घ्यायचे आहे कि आपण कोणत्या Game साठी वेडे झाले आहात...

आधी मी कबूल करतो...
१) तीन पत्ती
२) सब वे सर्फर
३) टेम्पल रण २ ...

आता बोला...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरुन काम करत असतांना मिटींग चालु अस्तांना गेम खेळत बसायला लागल्यामुळे गेम डिलीट करुन टाकलेत. नाहीतर कँडी क्रॅश च्या बर्‍याच लेवल्स झाल्या होत्या.

मोबाईलवर गेम खेळत नाही. आवडत नाही. पीसी हा गेम खेळण्यासाठीच असतो याची पूर्ण खात्री आहे.

बीज्वेल्ड व तत्सम गेम्स मोबाईल यायच्या आधीच पीसीवर खेळून जुने झाले होते. त्यामुळे त्याचं कधीच अप्रूप वाटलं नाही. लोकं क्रश सागाच्या लेव्हल खेळताना "काय भारीये" म्हणत अस्तात तेव्हा आम्ही "बच्चूगिरी" समजून सोडून देतो. फार्मव्ह्ले खेळत होते, पण नंतर कंटाळा आला.

पीसीवर एज ऑफ एम्पयर्स. बॅनिश्ड हे आवडते. मग टेक्स्ट ट्विस्ट , ट्रेड विण्ड्स, व्हर्च्यल व्हिलेजर्स, सिम सिटी हे आवडते. ग्रॅन्ड ऑटो थेफ्ट अत्यंत आवडता क्लासिक खेळ.
कॉल ऑफ ड्युटी, वॉरक्राफ्ट वगैरे भरपूर खेळलेत.

सध्या डोळ्यंच्या खोबण्या व्हायला लागल्यापासून गेमिंग बंद. Sad

कोणी थीफ गेम खेळलंय का? जबराट गेम..
आम्ही लहानपणी जीव मुठीत धरुन खेळायचो. अजुनही तंतरतेच.
कोणालाही डालो करायचे असेल तर लींक देते.

कँडी क्रॅशच्या ६०० लेवेल आहेत दक्षे, आयुष्यभर पुरेल एवढे काम आहे शिवाय ते मारुतीच्या शेपटासारखे आणखी लेव्हल्स अ‍ॅड करीतच असतात त्यामुळे त्याला अंत नाही

पर्सनली मोबाईलचा वापर मोबाईल ज्या कामासाठी घेतला आहे त्याच कामासाठी करावा असं माझं मत. फोन करणे/घेणे हे मुख्य आणि मेसेज, व्हॉट्स अ‍ॅप, इमेल ही इतर संपर्काची साधने आणि वेगवेगळ्या उपयोगी अ‍ॅप्स योग्य त्या कामासाठी वापरणे इतपतच फोनचा उपयोग, त्यामुळे फोनवर एकही गेम खेळत नाही.

त्या वेळेचा सदुपयोग चांगलं पुस्तक वाचण्यासाठी, मित्रांशी-मैत्रिणींशी आणि घरातल्यांशी गप्पा मारण्यासाठी किंवा भटकंतीसाठी करतो.

Pages