सावळा गिरीराजा....

Submitted by kishorbpanchal on 16 December, 2008 - 01:01

श्वेत रजत मुकुट
असे शिरी शोभला
गळा सुवर्ण-माळा
सावळा गिरीराजा सजला
सुवर्णपिवळा पायथा हा
असे तयाचे सिंहासन
मोहक मुर्ती राजाची
खुलवी रयतेचे मन
सुर्य निळ्या आकाशी
जणु रोशणाई करतो
मेघरुपी सेवक तेथे
गार वारा घालतो
गिरीराजाच्या दरबारी आज
होतसे साजरा सोहळा
नयनरम्य रंग तेथे
थाट तिथला आगळा

(व्याकरण व शुद्ध्-लेखणाबाबत क्षमस्व.)

गुलमोहर: