थांबले नाही कधी माझ्या-तुझ्यासाठी

Submitted by जयदीप. on 4 April, 2014 - 15:09

मारलेली हाक मी घोंघावते आहे
आत माझ्या पोकळी फोफावते आहे

मोजले नाही कधी मी वादळांना, पण
एक सरले की दुजे सरसावते आहे

विसरलेले परतले डोळ्यांपुढे अन् ती....
भाववेडी पापणी ओलावते आहे

थांबले नाही कधी माझ्या-तुझ्यासाठी
थांबलो आपण तरी जग धावते आहे

जे तुला सांगायचे आहे मला आता
ते तुझ्या डोळ्यांतुनी डोकावते आहे

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users