तिचाच श्रावण..

Submitted by मयुरेश साने on 3 April, 2014 - 09:00

कोण कुणाला बुडवत असतो ?
आपण अपुले गलबत असतो

आयुष्याला पळवत असतो
अर्थ उद्याचा खुणवत असतो

दिवसा ढवळ्या तुटते जे ते
स्वप्नामध्ये जुळवत असतो

जो तो आपापल्या परीने
ढोल व्यथेचा बडवत असतो

तो नाही मग कोण सांग ना ?
श्वासातुनी या जगवत असतो

काळरात्र तर संपत नाही
सूर्य बिचारा उगवत असतो

रेशीम गाठी असतिल ही पण
धागा धागा उसवत असतो

तिचाच श्रावण मनात हल्ली
गर्जत असतो बरसत असतो

.....मयुरेश साने

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवसा ढवळ्या तुटते जे ते
स्वप्नामध्ये जुळवत असतो

तो नाही मग कोण सांग ना ?
श्वासातुनी या जगवत असतो

काळरात्र तर संपत नाही
सूर्य बिचारा उगवत असतो

हे तीन शेर सर्वात छान.

-----------------------------------------------------
"रेशीम गाठी असतील ही पण" >>> कृपया मात्रा पहाल का ?

'तीचाच' >>> टायपो ?

जुळवत उगवत बरसत हे ३ जास्त आवडले

<<रेशीमगाठी असतिललही ..पण.. >> Happy

अवांतर :
साखरगाठी असतिलही.. पण ..
गुढीस निंबच सजवत असतो !

Happy

दिवसा ढवळ्या तुटते जे ते
स्वप्नामध्ये जुळवत असतो

जो तो आपापल्या परीने
ढोल व्यथेचा बडवत असतो

वा वा...

जो तो आपापल्या परीने
ढोल व्यथेचा बडवत असतो

काळरात्र तर संपत नाही
सूर्य बिचारा उगवत असतो<<<

शेर आवडले. सूर्य बिचारा - हा उल्लेख फार आवडला.

असतिलही आणि तिचाच हे टायपो बघावेत कृपया.

UlhasBhide
वैभव वसंतराव कु...
समीर चव्हाण
जयदीप
डॉ.कैलास गायकवाड
बेफ़िकीर
पुरंदरे शशांक

धन्यवाद....

कोण कुणाला बुडवत असतो ?
आपण अपुले गलबत असतो

दिवसा ढवळ्या तुटते जे ते
स्वप्नामध्ये जुळवत असतो

जो तो आपापल्या परीने
ढोल व्यथेचा बडवत असतो

काळरात्र तर संपत नाही
सूर्य बिचारा उगवत असतो

रेशीम गाठी असतिल ही पण
धागा धागा उसवत असतो

तिचाच श्रावण मनात हल्ली
गर्जत असतो बरसत असतो

वरील शेर खूप आवडले.
शुभेच्छा.