विटाळशी ??

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 1 April, 2014 - 14:28

आजवर दबले गेलेले बंड
आता नक्कीच पेटणार
यज्ञ म्हटले कि त्यात
काही समिधाही पडणार
काही जरी झाले तरी
आता मागे हटू नका

ते जुनाट मंत्र म्हणतील
भरपूर तूप ओततील
ऋत्विज धारण करतील
सारी सूत्रे पुन्हा एकदा
हाती घेवू पाहतील
त्या त्यांच्या हिकमतीला
पण फशी पडू नका

ते पुन्हा तुम्हाला सजवतील
वाजत गाजत नेतील
हसू नका हुरळू नका
यज्ञबळी होऊ नका
यज्ञकर्मी तुम्ही यज्ञवन्ही
हे कधीच विसरू नका

दाढ्या जळतील
जळू द्या
मंडप पडतील
पडू द्या
शिव्या मिळतील
मिळू द्या
सृजनत्वाला विटाळशी
पण म्हणवून घेऊ नका

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विप्र,

कविता पटली. यज्ञवन्ही ज्याला हवन पोहोचवतो त्याच्याकडे म्हणजे यज्ञाच्या मूळ हेतूकडे लक्ष असलं म्हणजे झालं. तसंही पाहता सर्व शरीर घाणीने माखलेलं आहे. तरीही प्रत्येकाला आपापलं आणि काही परक्यांची शरीरे आवडतात. ज्या कुणामुळे ही गलिच्छ शरीरे वांछनीय होतात त्याच्यावर लक्ष असलं की काही काळजी नाही! Happy

आ.न.,
-गा.पै.