आणि धर्मराज युधिष्ठिरानेही अधर्माचीच साथ दिली

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 27 March, 2014 - 01:27

२००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांमध्ये कॊंग्रेसने मिळविलेल्या यशाला पंतप्रधानांनी केलेले मतदारांचे ब्लॆकमेलिंग कारणीभूत?

अंतर्गत लाथाळ्यांनी त्रस्त झालेल्या कॊंग्रेस - राष्ट्रवादी कॊंग्रेसला आपण पुन्हा निवडून येऊ शकू का ही चिंता सतावत होती पण ऒक्टोबर २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये महाराष्ट्रात या आघाडीत गेल्या वीस वर्षात मिळाल्या नाहीत इतक्या भरघोस जागा मिळविल्या आणि पुढच्या पाच वर्षांकरिता एका अतिशय स्थिर सरकारची स्थापना झाली पण त्यांच्या यशामागचे रहस्य तसे दुर्लक्षितच राहिले.

नेहमीप्रमाणेच यावेळीही प्रचारात अनेक नेत्यांनी सवंगपणाची पातळी ओलांडली. जे नेते कायमच असे बोलतात त्यांची उदाहरणे मी पुन्हा देणार नाहीय पण ज्यांच्याकडून अधिक समंजसपणाची अपेक्षा होती त्या माननीय पंतप्रधान श्री. मनमोहन सिंगांनीही असे बेजबाबदार वक्तव्य करावे म्हणजे कळस झाला. सतरा पोलिसांचे बळी घेणार्‍या नक्षलवाद्यांवर लष्करी कारवाई करणार नाही. विकासाची गंगा त्यांच्या दारी न पोचल्याने परिस्थितीमुळेच ते नक्षलवादी झाले आहेत. असे वक्तव्य करून पंतप्रधानांना नेमके काय सूचित करायचे होते? ज्यांच्यावर अन्याय झालाय अशा सार्‍यांनीच शस्त्रे हाती घ्यावीत का, म्हणजे सरकार त्यांच्यावर कारवाई न करता चर्चेला तयार होईल? शिवाय नक्षलवाद्यांशी एकांड्या शिलेदाराप्रमाणे लढणार्‍या पोलिसांच्या मनोधैर्याचे काय? पुढे जाऊन पंतप्रधान असेही म्हणाले की जर राज्यात पुन्हा कॊंग्रेसचे सरकार आले तर केन्द्राकडून राज्याला भरघोस मदत दिली जाईल. (वाचा लोकसत्ता दि. १२ ऒक्टोबर २००९ च्या अंकातील मुखपृष्ठावरील बातमी) म्हणजे मतदारांनी दुसर्‍या पक्षाला मत देऊन सत्तेवर बसविले असते तर केन्द्र सरकार महाराष्ट्राची कोंडी करणार होते असाच अर्थ या विधानातून निघत नाही का? आचारसंहिता किंवा कायद्याचा मुद्दा बाजुला ठेवला तरी हे राज्यातील जनतेचे ब्लॆकमेलिंग करणारे विधान नैतिकतेच्या कसोटीवर तरी टिकणारे होते काय?

अर्थात १३ ऒक्टोंबर २००९ ला झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये पंतप्रधानांच्या या वक्तव्याने आपली जादु दाखवलीच आणि कॊंग्रेस आघाडी पुन्हा एकदा जोमाने राज्यात सत्तेवर आली.

http://beftiac.blogspot.in/2010/10/blog-post_26.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर राज्यात पुन्हा कॊंग्रेसचे सरकार आले तर केन्द्राकडून राज्याला भरघोस मदत दिली जाईल.
>>>>>>>>>
त्यांचे हे विधान मला तरी माहीत नव्हते, अर्थात माझे राजकारण सामान्य ज्ञान जेमतेमच, पण मुद्दा हा की तुम्ही म्हणता तसे ब्लॅकमेलिंग करायला हे त्यांचे विधान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले होते का? बाकी या विधानामुळे कोणी खरोखरच ब्लॅकमेल झाले का वगैरे हे नंतर आले..
तसेच हे आता आठवण्यामागचे प्रयोजन नाही समजले, यासारखे पुन्हा काही घडलेय का?

- - - मनमोहन सिंग यांना धर्मराज युधिष्टिर म्हटले आहे का?

<< पण मुद्दा हा की तुम्ही म्हणता तसे ब्लॅकमेलिंग करायला हे त्यांचे विधान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले होते का? >>

निवडणूकांच्या दोन दिवस आधी जाहीर सभेत हे विधान केले गेले जे की वृत्तपत्रांनी दुसर्‍या दिवशी (अर्थात निवडणूकीच्या आदल्या दिवशी) छापले.

<< तसेच हे आता आठवण्यामागचे प्रयोजन नाही समजले, यासारखे पुन्हा काही घडलेय का? >>

आता पुन्हा निवडणूका आहेत. तसेच याच वर्षी महाराष्ट्र विधानसभेच्याही निवडणूकाही आहेत. जर लोकसभेत कॉन्ग्रेस विजयी झाली तर राज्याच्या निवडणूकांच्या वेळी पुन्हा केन्द्राकडून राज्यात आमच्या पक्षाचेच सरकार निवडून द्या तर (च) राज्याला मदत देऊ असा प्रचार होऊ शकतो. असे काही घडलेच तर मतदारांनी सावध असावे. याकरिता हा पूर्वी लिहीलेला लेख आता पुनर्प्रकाशित केला आहे.

<< - - - मनमोहन सिंग यांना धर्मराज युधिष्टिर म्हटले आहे का? >>

होय त्यांच्या (च) स्वच्छ प्रतिमेचा वापर कॉंग्रेसकडून नेहमीच केला जात असतो.

चेतन, तुमच्या म्हणण्यात प्रचंड तथ्य आहे.
याव्यतिरिक्तही, झालेल्या मतदानाची मोजणी करताना भाग/विभागाच्या मतपेट्या पुर्वी एकत्र ओतुन मग मोजणी व्हायचि व एखा मोठ्या आकाराच्या भूभागावरील मतदारांचा कल कळून यायचा त्या ऐवजी इलेक्ट्रॉनिक मतपेट्याद्वारेच्या मोजणी वेळेस प्रत्येक मतपेटी स्वतंत्रपणे मोजली जात असल्याने दोनचारशे घरे/दोनेक हजार मतदारांचा कल समजुन घेणे राजकीय पक्षांना शक्य झाले आहे, जे अत्याधिक धोकादायक /ब्र्लॅकमेलिन्गला उपयुक्त ठरत आहे.

मनमोहनसिन्ग हा कॉन्ग्रेसची इतरही अनेक विधाने धक्कादायकच नसुन धोकादायकही आहेत. देशातील संसाधनांवर मुस्लिमांचा प्रथम हक्क हे देखिल यातलेच एक विधान. अशीच अनेक विधाने/घोषणा यशस्वीपणे करायचा कॉन्ग्रेसचा अर्धशतकाचा सराव आहे! Happy

यावर पगारेसाहेबांचे मत आजमावयाला आवडेल मला!

जर लोकसभेत कॉन्ग्रेस विजयी झाली तर राज्याच्या निवडणूकांच्या वेळी पुन्हा केन्द्राकडून राज्यात आमच्या पक्षाचेच सरकार निवडून द्या तर (च) राज्याला मदत देऊ असा प्रचार होऊ शकतो.
>>>>>>>>>>
पण यावेळी लोकसभेत भाजपाचे घोडे पुढे दिसतेय, म्हणजे हा पैतरा वापरायची संधी आता भाजपाला आहे. असाही या लेखाचा अर्थ घेऊ शकतो तर Wink

होय त्यांच्या (च) स्वच्छ प्रतिमेचा वापर कॉंग्रेसकडून नेहमीच केला जात असतो.
>>>>>>>>>>
पण हे म्हणजे युधिष्टराच्या स्वच्छ प्रतिमेचा वापर पांडवांनी केल्यासारखे झाले.. म्हणून ती उपमा वेगळी वाटली बस्स, असो हे अवांतरच आहे..

इथे एका रिपब्लिकन राज्यपालाने असेच डेमोक्रॅटिक मेयर असलेल्या शहराला मदत दिली नाही, व डेमोक्रॅट मेयर असलेल्या शहरांना निरनिराळ्या प्रकारे त्रास दिला.
पण एक वर्षाच्या आत पत्रकारांनी एव्हढा ओरडा केला की हा राज्यपाल जर आत्ताच पदच्युत झाला नाही, तरी पुनः कुठेहि निवडून येणार नाही!!

कायद्यान्वये त्याच्या वर खटला सुद्धा भरता येईल का, याचा अभ्यास चालू आहे.

पण वरकरणी पहाता, काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात जर त्यांनी राज्यांना जास्त मदत द्यायला पाहिजे असे म्हंटले असेल नि तरीहि फक्त काँग्रेस मुख्यमंत्री असलेल्या राज्यांनाच मदत केली, तर त्या पंतप्रधानाचीहि तीच वाट लोकशाही भारतात लावता येईल.

<हे राज्यातील जनतेचे ब्लॆकमेलिंग करणारे विधान नैतिकतेच्या कसोटीवर तरी टिकणारे होते काय?

अर्थात १३ ऒक्टोंबर २००९ ला झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये पंतप्रधानांच्या या वक्तव्याने आपली जादु दाखवलीच आणि कॊंग्रेस आघाडी पुन्हा एकदा जोमाने राज्यात सत्तेवर आली.>

तेवढ्या एका विधानानेच बाजी मारली गेली असेल तर मतदारांनी मनमोहन सिंग यांना हवा असलेलाच कौल दिला असे म्हणता येईल. अख्ख्या राज्यातली जनतेला या ब्लॅकमेलला घाबरली. बरोबर?

>>>>> अख्ख्या राज्यातली जनतेला या ब्लॅकमेलला घाबरली. बरोबर? <<<<
भरतराव, आख्खे राज्य काय घेऊन बसलात, आख्ख्या देशातिल जनताही कॉन्ग्रेसला "घाबरुनच" अस्ते.....! Wink

धन्यवाद limbutimbu

<<अशीच अनेक विधाने/घोषणा यशस्वीपणे करायचा कॉन्ग्रेसचा अर्धशतकाचा सराव आहे! >>

हेच मला सांगायचे होते.

अभिषेक,

<< पण हे म्हणजे युधिष्टराच्या स्वच्छ प्रतिमेचा वापर पांडवांनी केल्यासारखे झाले.. >>

त्यांनी केला होताच - नरो वा कुंजरो वा प्रकरणात.

झक्की,

<< फक्त काँग्रेस मुख्यमंत्री असलेल्या राज्यांनाच मदत केली, तर त्या पंतप्रधानाचीहि तीच वाट लोकशाही भारतात लावता येईल. >>

मतदारांनी या निवडणूकीत तेच करावे याकरिता तर हा लेख प्रकाशित केलाय.

भरत मयेकर,

<< अख्ख्या राज्यातली जनतेला या ब्लॅकमेलला घाबरली. >>

असं कसं होईल? तसं झालं असतं तर सर्वच्या सर्व २८८ जागा आघाडीलाच मिळाल्या असत्या. सर्व मतदारांवर कधीच कुठल्याच प्रचाराचा प्रभाव पडत नसतो तरीही चूकीच्या पद्धतीने प्रचार केला तर निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाते आणि त्यावर कारवाई देखील होते कारण ५ - १० टक्के मतदारांवर प्रभाव पडला तरीही सत्ता समीकरणांमध्ये मोठा बदल होतो.

२००९ला विरोधी मतांचे विभाजन हा मुख्य मुद्दा होता.बाकीही मुद्दे होते मात्र २००९च्या विधानसभेत मनसेमुळे सेना-भाजपचे गणित बर्याच अंशी कोलमडले. मनसेचे १३ आमदार निवडून आले मात्र साधारण ४० जागी सेना-भाजप युती पराभूत झाली. अन्यथा चित्र खूप वेगळे असले असते.तेव्हा युतीला काठावरचे बहुमत मिळाले असते किंवा १९९९ ला जसे युती आणि आघाडी बहुमतापासून किंचित दूर होते तशी अवस्था झाली असती.

<< २००९ला विरोधी मतांचे विभाजन हा मुख्य मुद्दा होता >>

<< २००९च्या विधानसभेत मनसेमुळे सेना-भाजपचे गणित बर्याच अंशी कोलमडले. मनसेचे १३ आमदार निवडून आले मात्र साधारण ४० जागी सेना-भाजप युती पराभूत झाली. अन्यथा चित्र खूप वेगळे असले असते.तेव्हा युतीला काठावरचे बहुमत मिळाले असते किंवा १९९९ ला जसे युती आणि आघाडी बहुमतापासून किंचित दूर होते तशी अवस्था झाली असती >>

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना भाजप यूतीची मते खाल्ली असे काहीजण मानतात तर अनेकांना त्यात तथ्य नाही असेही वाटते. समजा तथ्य आहे असे मानले तरीही रिपब्लिकन डावी लोकशाही समिती (रिडालोस) ने देखील कॉन्ग्रेस आघाडीची मते खाल्लीच की. त्यांचे उमेदवार तर २८ जागांवर विजयी झाले. तरीही कॉन्ग्रेस आघाडीस भक्कम बहुमत मिळाले.