निसर्गाच्या गप्पा (भाग १८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2014 - 07:34

निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील फोटो दिनेशदांकडून.

रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्‍या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्‍या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<<<<<

मानुषी कसले सही फोटो टाकले आहेस तू. एंजॉय!!!
>>>>>> मामी....आय पॅड का जबर्‍या कॅमेरा और आपकी पारखी नजर ......मान गये उस्ताद!
शांकली धन्यवाद!
माझ्या चालायच्या रस्त्यावरचा नवा मोहोर....

चला, निसर्गाच्या ऋतूपेक्षा जास्त वेगात आपले नवीन भाग येताहेत.. ती फुले बालिमधली.. आणखी जवळून पुढच्या भागात येतीलच..

आह्हा.. नवीन भाग , दिनेश,खूप सुरेख्,नाजुक फुलं , जागु चा सुंदर संदेश वाचून आनंदाने डोलत आहेसं वाटलं

Happy

दिनेशदा, वरचा फोटो एकदम मस्तच Happy

मागच्या भागातले सामीचे गाव खुपच आवडले.. जायचे का सगळ्यांनी ?>>>>>चलो हमला Happy Happy

दिनेशदा, मागच्या भागात तुम्ही कारवीविषयी लिहिले होते, मी जुलैच्या पहिल्या दुसर्‍या आठवड्यात मुंबईत नाही आहे. Sad

टोपली कारवी म्हटल्यावर मला लगेच कास पठार (किंवा चाळकेवाडी पवनचक्की परिसर) आणि आंबोली परीसर आठवला.

कासला गर्दी उसळते त्यामानाने चाळकेवाडी परिसरात गर्दी नगण्य. पण फुलं मात्र भरपूर. Happy

चलाच सगळ्यांनी...:-) दिनेशदा कोकणातली घाटी तुम्ही बघितली असेलच....घाटी चढून आणि उतरून जावे लागते. पण मस्त वेगळा अनुभव...पुढ्च्या निसर्ग गटग ला मी येणारच आहे तेव्हा अजून फोटो दाखवेन....
अर्धा तासाचा रस्ता (घाटी) वर गावात जायला.
ghati.jpg

नविन भाग धावायला लागला.

घाटी मला नाही माहित. मी तशीही सावंतवाडी सोडता कोकण बघितलेच नाही.. (तरीही मालवणी म्हणुन मिरवते Happy )

टोपली कारवी म्हटल्यावर मला लगेच कास पठार (किंवा चाळकेवाडी पवनचक्की परिसर) आणि आंबोली परीसर आठवला.

ह्या पावसाळ्यात चल आंबोलीला. येतो येतो म्हणत दोन पावसाळे गेले

व्वा! सर्वांचे फोटो मस्तच! Happy

दिनेशदा कोकणातली घाटी तुम्ही बघितली असेलच....घाटी चढून आणि उतरून जावे लागते. पण मस्त वेगळा अनुभव...पुढ्च्या निसर्ग गटग ला मी येणारच आहे तेव्हा अजून फोटो दाखवेन....>>>>>>>>>>>>.मी तयार आहे.
Happy

रिया... त्या चाफ्याच्या अंगठ्यांना टाचण्या टोचुन आंबाड्यात वन साईड खोचल्या तर
खुपच सुंदर दिसतात....

जागु... संदेश खुपच छान...

मनुषी.. कसली गोड आहेत ती गुलाबाची फुलं.....

सगळ्यांचे च फोटो मस्त.....

चाफ्याच्या फुलाची प्रत्येक पाकळी दुमडुन, मध्यभागी हरबर्‍याच्या डाळी येवढे छिद्र करायचे,
मग एक एक पाकळी खाली देठा कडे न्यायची, आणि प्रत्येक पाकळीच्या छिद्रातुन देठ काढायच...
झाली आंगठी तय्यार..... मग दोन बोटांच्या मधे हे देठ अडकवुन, जोरात हुंगुन, पोज देत मिरवायचे.....:) Happy :

Pages