काय होते काय नक्की घेतल्यावर ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 20 March, 2014 - 01:24

कल्पना येणार नाही चाळल्यावर
जीवनावर भाष्य करुया वाचल्यावर !

पावसाच्या चार शिंतोड्यांप्रमाणे
तोंडदेखल बोलतो तो भेटल्यावर

भासलेले चिवट पण तुटलेच नाते
तन्यतेचा नियम लागू ताणल्यावर !

मोडल्यावरती कशाला चौकशी ही...
त्रास होतो का कण्यातुन वाकल्यावर ?

तो स्वतःला गमवतो की प्राप्त होतो
काय होते काय नक्की घेतल्यावर ?

पाजले पाणी नि दाणा टाकला पण..
वारही त्यानेच केला गाठल्यावर !

एकदा येवून पाहू निर्णयाप्रत ?
जीव हा जाईल घेणे लांबल्यावर !

गझल होते पोरकी माझी स्वतःला
नेमका उल्लेख त्याचा टाळल्यावर

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझल आवडली सुप्रियाजी

भेटल्यावर ताणल्यावर हे खयाल तुमच्या आधीच्या गझलात आलेत बहुधा

धन्यवाद

धन्यवाद जयदीप ,

<<<भेटल्यावर ताणल्यावर हे खयाल तुमच्या आधीच्या गझलात आलेत बहुधा>>>

हे शेर तुम्ही फेबुवर वाचले असावेत आधी Happy

कल्पना येते कुठे रे चाळल्यावर
जीवनाला जाण थोडे वाचल्यावर !

मोडल्यावरती कशाला चौकशी ही
त्रास होतो का कण्यातुन वाकल्यावर ?

तो स्वतःला गमवतो की प्राप्त करतो
काय होते काय नक्की घेतल्यावर ? >>> वा! खूप छान

छान!
"कल्पना येणार नाही चाळल्यावर
जीवनावर भाष्य करुया वाचल्यावर !

पावसाच्या चार शिंतोड्यांप्रमाणे
तोंडदेखल बोलतो तो भेटल्यावर" क्या बात है !

गझल होते पोरकी माझी स्वतःला
नेमका उल्लेख त्याचा टाळल्यावर

हां शेर छान आहे
आवडला

सूंदर ,
गझलरंग मध्ये ऐकली होती आपल्याकडूनच...
तिथे जरा जास्त आवडली होती ...... कदाचित सादरीकरणामुळे

<<<तिथे जरा जास्त आवडली होती ...... कदाचित सादरीकरणामुळे>>>

कॉम्पलिमेंट म्हणून घेते मी हे किरण कुमार कारण माझ्या गझल सादरीकरणाबद्दल बरीच दुमत आहेत Sad

रच्याकने यातले फक्त ३ नच शेर घेतले होते :))

धन्यवाद !!

पावसाच्या चार शिंतोड्यांप्रमाणे
तोंडदेखल बोलतो तो भेटल्यावर

छान. शेर शोधायला लागणे ही चांगली गोष्ट नाही आहे, विशेषतः अनेक गझल लिहिल्यानंतर.
शुभेच्छा.