पावसाचे दलाल

Submitted by विनायक. दि.पत्की. on 19 March, 2014 - 04:41

पावसाचे दलाल
आम्हाला म्हणतात तीरपागडे,
आम्हाला पावसाचे वावडे.
आम्हाला अवकाळीच आवडे,
आम्हाला पावसाच्या येण्याचे रडे.
पावसाचे साधून अवर्षण,
करतो मागण्यांचे वर्षण.
सरकारशी हि साधून घर्षण,
वठवतो जनतेचे निरसन.
आम्ही नाटकी ,पावसाचे हौशी,
सर्वांसोबत होतो नवशी.
संधी चे आम्ही असू गवशी,
भ्रष्टाचाऱ्या तूच आम्हाला पावशी.
पाऊस असो लहान व मोठा,
शोधू आम्ही पावसाचा तोटा.
दामटू पुढेच दावा खोटा,
वठवायच्या असतात काळ्या नोटा.
चित हि आमुचे पट हि आमुचे,
छुपी झोळी,गळ्यात गमचे.
मलीद्या साठी काटेरी चमचे,
काहीही होवो हालच करू तुमचे.
दुष्काळात हि खिसे भरू,
डोळ्यातल्या पाण्यावर हि तरू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users