नट्टु

Submitted by sanketdeshpande on 15 March, 2014 - 13:40

------------------
नाटकाचे नाव नट्टु
-------------------
-------------------
पात्र परिचय
-------------------

नट्टु / नटराज वय २१ - २५ वर्ष. दिसायला रुबाबदार, आकर्षक पण साधा भोळा निरागस आणि
बराचसा बावळट. अभिनेता / नट होण्याची इच्छा. उमेदवारी व संघर्ष करतोय.

जय नट्टुचा मित्र, समवयस्क, दोघेही भाड्याच्या सदनिकेत एकत्र राहतात. खाजगी
अस्थापनेत नौकरी.

मानसी वय २१ - २५ वर्ष. आधुनिक, स्वतःच्या पायावर उभ राहण्यासाठी एकटी राहते.

-------
प्रसंग १
-------

(सदनिका, उजवीकडे दरवाजा, समोर खिडकी, डावीकडे आतल्या खोलीचा दरवाजा. जय प्रेक्षकांशी संवाद साधतो. सकाळची वेळ, साधारण १० -११)

जय नमस्कार! माझ नाव जय. माझा मित्र, नट आहे. नाटक करतो. खरतर नाटकं करतो. नाव
आहे नट्टु! नटेश्वर! (इतक्यात आतला दरवाजा उघडून, तय्यार होऊन नट्टु बाहेर येतो.
त्याच्याकडे पहात…) नट्टापट्टा!? (प्रश्नार्थक)

नट्टु हे! गुड मोर्निंग (स्वारी मूड मध्ये. स्वतःवर खुश आणि मग्न)

जय हे! गुड मोर्निंग

नट्टु नट्टापट्टा काय? (कपडे ठाक ठीक करत विचारतो. जय पण हेच विचारात असतो. विचारण्याचा
हावभाव जयचा पण नट्टु उवाच)

जय तेच, मी! विचारतोय? (नट्टु कडे हात दाखवत)

नट्टु ओह !! हे? अरे आपण नट आहोत, सदा तय्यार.

जय तुला कोण बघणारे?

नट्टु अरे नट आहे मी. मला नाही तर काय तुला बघतील?

जय बाहेर चाललायेस?

नट्टु नाही

जय मग हा नट्टापट्टा काय मला मोहात पाडायला? Happy

नट्टु ये SSS …. (दूर होत) …. मी स्ट्रेट आहे (जय स्वतःवर खजील होतो ).
अरे मी सदा तय्यार पाहिजे. कोण केंव्हा कुठून बघेल सांगता येत नाही. (कोण आपल्याकडे कुठून
बघू शकतो ते शोधत....) ह्या पीपहोल मधून कोणी बघेल!

जय बाहेरून? Happy

नट्टु ह्या खिडकीतून बघेल!

जय ती बंदच आहे

नट्टु (विषयांतर करत) हो यार! खिडकी समोर खिडकी, नाही? ती बंद, आपली सदा उघडी!! Happy
(सहज कविता झाली म्हणून उत्तेजित)

(जय आणि नट्टु RAP करतात)

खिडकी, समोर खिडकी
एक बंद, एक सदा उघडी
बंद खिडकीच्या मागे राहतंय कोण कोण
मला वाटतंय असावं कोणी तरी छान छान

येईल एक बुवा, जसाकाही बोका
नट्टु पेक्षा जाड नी जय पेक्षा वाकडा

खिडकी, समोर खिडकी…

नाहीतर म्हातारी, दात नसे दुपारी
जय पेक्षा गर्विष्ठ आणि नजर ठेवी करडी

खिडकी, समोर खिडकी…

नाहीतर काकूबाई जिच्या हाती लाटण
देईल दोन धपाटे आणि रोज उठून भांडण

खिडकी, समोर खिडकी…

कोण येईल? कुठून येईल? सांगता येत नाही
मराठवाडा खानदेश विदर्भ नाहीतर सातारा सांगली

खिडकी, समोर खिडकी …

विदर्भाची रांगडी मराठवाड्याची चांगली
कोकणची गोरी नाहीतर कोल्हापुरी मिरची

खिडकी, समोर खिडकी …

पुण्याची Modern मुंबईची हाय फाय
गोवाची म्हणेल .... टाटा बाय बाय

खिडकी, समोर खिडकी …

(दारावरची बेल वाजते. नट्टु दरवाजा उघडतो. एक सुंदर मुलगी दारात. दोघेही आनंदी होतात पण टरकतात.)

मानसी हाय!
नट्टु हाय
जय हाय
मानसी हाय (जयला)
नट्टु हाय
जय हाय
मानसी हाय? (प्रश्नार्थक मुद्रा) (मनातला गोंधळ झटकून टाकत)
मी मानसी. शेजारच्य अपार्ट्मेण्ट्मधे नवीन राहायला आलीये. म्हणल ओळख करून घ्यावी.

(जय आणि नट्टु नाव सांगतात. पुढे काय बोलावं असा विचार करत तिघेही शांत राहतात ५ सेकंद)

जय सोसायटीमध्ये तुमच स्वागत आहे!! (काहीतरी बोलायचं आठवल्यासारख करत... आत यायला
सांगतो)

मानसी Thanks तुम्ही काय करता?

जय मी नौकरी करतो

नट्टु मी नट आहे

मानसी (भुवया उंचावते. आश्चर्य अविश्वास कुतूहल असे वेगवेगळे भाव चेहेर्यावरून तरळून जातात. परत
एकदा मनातले विचार झटकते) नाही ... म्हणजे ... मोकळ्या वेळात काय करता?

नट्टु (आठवत, काय सांगाव याचा विचार करत शब्दांची जुळवाजुळव करत)
ते आम्ही आत्ता महाराष्ट्रातील वेगवेगळे प्रदेश, तिथल्या मुली,

जय (मधेच अडवत मोठ्याने) माणसे!! माणसे!

नट्टु (काहीतरी गडबड झाली म्हणून सावध होत)
त्यांचे स्वभाव ... माहिती, अनुभव, ज्ञान! ज्ञान! (उत्तेजित होतो)

जय (ज्यास्त फेकल्या जातंय म्हणून नट्टुला आवरत) चर्चा! चर्चा!

मानसी (हसत निघायला उठते) मी कूक आहे. आपण भेटत राहूच!

नट्टु (पुढे होऊन दरवाजा काढतो) हो तुमचा स्वयंपाक झालं कि सांगा!

जय (मधेच हसत) हा हा हा हो हो भेटूच! (नट्टुला डोळ्यांनी दटावतो)

नट्टु (दरवाजा बंद करतो. त्यात काय बिघडलं असा वाटून) भूक लागलीये यार

(जय दोघांचे कोट घेतो. दोघे जेवायला जातात)

-------
प्रसंग २
-------

(साकाची वेळ. जय नुकताच त्याच्या रूममधून बाहेर आलेला. इतक्यात दारावरची बेल वजते. जय दर काढतो.)
(दारात मानसी, हातात खायला काहीतरी आणलेलं.)

जय हाय! गुड मॉर्निंग!

मानसी गुड मोर्निंग! तुमच्यासाठी पोहे आणलेत नाश्त्याला.

जय ये ना.

(नट्टु आतल्या खोलीतून दरवाजा उघडून येतो. लक्ष स्वतःचे कपडे ठाक ठीक करण्यात)

नट्टु गुड! मोर्निंग!

जय गुड! मोर्निंग!

(वर पाहतो. मानसीला पाहून दचकतो. पट्ट्कन खुर्चीवर बसतो व पेपर वाचायच नाटक करतो. मानसी बुचकळ्यात पडते.)

जय काय वाचातोयेस? ()

नट्टु मानसी येण्याचा कारण छापलय का ते पाहतोय.

(मानसी दोघांना पोहे देते)

मानसी मी येते (अस म्हणून जाते) (नट्टु जय वर प्रश्नांची सरबत्ती लावतो)

नट्टु ती का आली होती?

जय नाश्त्याला पोहे द्यायला

नट्टु तिने पोहे का दिले?

जय तिला पोहे करता येतात आणि तिच्याकडे जाड पोहे ज्यास्त झाले होते म्हणून?

(नट्टु खरं वाटत, पण तरी जय वर रागावलेला, audition ला जायला निघतो)

जय अरे! तुझी स्क्रिप्..........

नट्टु पाठ आहे मला!

(२ ३ पावलं चालत संवाद आठवतो. मग त्याच्या लक्षात येत आपल्याला पाठ नाहीये. जय अजूनही हातात स्क्रिप्ट घेऊन उभा असतो.) (नट्टु स्क्रिप्ट घेतो. आधी हसतो मग परत रागाने बघून जायला निघतो)

-------
प्रसंग ३
-------

(Audition चालू आहे. बाहेर waiting रूममध्ये ५ ६ जण वाट पाहतायेत. काही उभे काही बसलेले. प्रत्येकाच्या हातात कागद.) (नट्टु दरवाज्यातून येतो. registration डेस्क वर नाव नोंदवण्यासाठी जातो.)

नट्टु हाय! मी रागीट माणसाच्या भूमिकेसाठी आलोय.

रिसेप्शनिस्ट नाव लिहा (नोंद वही कडे हात दाखवते )

नट्टु हो लिहोतो ना! मग सोडतो का? (रागात, मोठ्ठ्याने)
(हसून) सौरी आज सगळे इथे तुमच्याशी असेच बोलत असतील.

रिसेप्शनिस्ट तुम्ही पहिलेच. (रिसेप्शनिस्टच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलत नाहीत मक्ख)

(नट्टु स्वतःवर खुश होतो आणि एका खुर्चीवर जाऊन बसतो)
(बाजूची व्यक्ती अत्यंत बेरकी आणि धूर्त)

बाजूची व्यक्ती ओह! मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय तुम्ही अत्यंत महान कलाकार आहात
(नट्टु खुश होतो) तुम्ही एखाद्या नाटकात काम केल होत?

नट्टु मी चौथीत असताना शाळेत एका नाटकात काम केल होत

बाजूची व्यक्ती बरोब्बर! मी पाहिलं होत!

नट्टु मला नाही आठवत आता

बाजूची व्यक्ती मला आठवत ना! रेल्वे चा सीन होता.

नट्टु मी ड्राईवर होतो?

बाजूची व्यक्ती नाही

नट्टु मग TC?

बाजूची व्यक्ती नाही

नट्टु मग गार्ड?

बाजूची व्यक्ती नाही. तुम्ही शेवटचा डब्बा होतात. काय! काम झाल होत तुमच!

नट्टु Thanks! (नट्टु स्वतःवर खुश होतो)

बाजूची व्यक्ती अहो तुम्ही काय ह्या फालतू भूमिका करण्यात वेळ घालवताय? मी तर म्हणतो तुम्ही
प्रशांत दामले सोबत काम करायला पाहिजे.

नट्टु खरय तुमच मी फार वेळ वाया घालवला,..... कोणासोबत काम करायचं ते ठरवण्यात.
(प्रभावित होऊन जायला उठतो) ठीक आहे तर मग. तुम्ही नाही येणार?

बाजूची व्यक्ती मी बसतो हो जरा इथे. मझ्या घरी AC नाही ना.

(नट्टु बाहेर जातो. इतक्यात आतल्या दरवाजातून नट्टुच्या नावाचा पुकारा होतो) (नट्टु दार उघडून विचारतो)

नट्टु मला कोणी हाक मारली का?

बाजूची व्यक्ती नाही ओ, पण एक दिवस सगळे मारतील!

-------
प्रसंग ४
-------

(जय खोलीत फेऱ्या मारतोय आणि मानसीची वाट पाहतोय. बेल वाजते मानसी येते. प्रसंग romantic, भावनाप्रधान आहे)

जय हाय! गुड मोर्निंग!

मानसी गुड मोर्निंग!

जय मी तुझीच वाट पहात होतो

मानसी आज मी तुझ्या आवडीचा पदार्थ बनवणार आहे. बोल तुला काय आवडत?

जय उपमा

(दोघे उपमा करायला घेतात. जय डिशेस घेतो. मानसी इतर तय्यारी करते. नजरानजर. भावनाप्रधानता. दोघांमधील प्रेम शब्दांशिवाय व्यक्त होतं)(२ मिनिटांनी नट्टु बाहेर येतो)

नट्टु हे

जय हे! अरे हे काय मानसी इथे? तू कशी काय आलीस?!!

मानसी मी आज नाश्त्याला तुझा आवडीचा पदार्थ बनवणार आहे. उपमा.

नट्टु आपल्याकडे रवा ज्यास्त झालाय?

(तिघेही उपमा खायला बसतात)

मानसी आज कुठली audition?

नट्टु आहे एक छोटी भूमिका

मानसी कोणतीही भूमिका मोठी किंवा छोटी नसते, फक्त कलाकार मोठे किंवा छोटे असतात

नट्टु छोटे कलाकार? म्हणजे बाल कलाकार . . . . .
मानसी, आज मला एक romantic सीन करायचा आहे पण मला काहीच अनुभव नाही.
तू माझ्यासोबत एक romantic सीन करशील?

(मानसी डोळ्याने नट्टुल रागावते. नट्टु बाहेर पडतो)

मानसी आपण करूया romantic सीन? (दोघे आतल्या खोलीकडे जायला निघतात)

नट्टु (इतक्यात नट्टु दरवाजा उघडून म्हणतो, घाबरून जय मानसीला दूर ढकलतो)
मला शिरा आवडतो उपमा नाही

-------
प्रसंग ५
-------

(नट्टु audition ला येतो. बाजूची व्यक्ती audition देऊन आतून बाहेर येते.)

बाजूची व्यक्ती अरे! महान कलाकार!
तुला एक महत्वाच सांगायचंय. ह्या कास्टिंग डीरेक्टरचा कुत्रा मागच्या आठवड्यात मेला.
तू गेल्याबरोबर त्याबद्दल शोक व्यक्त नाही केला तर सिलेक्शन अवघड आहे.

नट्टु हे! हे! हे! तुझी सगळी नाटकं कळलियेत मला. तू मला मागच्या वेळेस फ़सवलस. का?
आत्ताच्या आत्ता सांग.

बाजूची व्यक्ती अरे तुला पाहून घाबरलो मी. तू इतका चांगला देखणा आणि अव्वल कलाकार.
तुला पाहून वाटलं आपलं काही खर नाही. मी एक छोटा कलाकार आहे .. . .

नट्टु कोणीही छोटा कलाकार नसतो. फक्त मोठे किंवा बाल कलाकार असतात

बाजूची व्यक्ती तुझं खरय माझ्या मुळे तुझ नुकसान झाल. मला त्याची भरपाई केली पाहिजे.
मी तुला खरी खुरी माहिती देतो. हि कास्टिंग डिरेक्टर थोडा बहिरा आहे. तेंव्हा …

(नट्टु आत जातो व मोठ मोठ्याने romantic संवाद म्हणतो. त्याला लगेच बाहेर काढतात. )

नट्टु आधीच ऐकू कमी येत वर कानावर हात ठेवतोय. पागलच आहे.

-------
प्रसंग ६
-------

(नट्टु, जय आणि मानसी तिघेही गडबडीत. नट्टुच्य हातात bag, आवरतोय. मानसी डब्बा भरतिये. जय स्क्रिप्ट्स पाहतोय)

जय अरे नट्टु किती ठिकाणी बदली कलाकार म्हणून नाव नोंदवल होतस?

नट्टु शंभर

जय काय?

नट्टु अरे कुठे काम मिळेल अस वाटलंच नाही यार

जय आता आली ना पंचाईत? एकदाच तीन नाटक. कोणकोणती आहेत?

नट्टु एक romantic आहे तुला तर माहिती मला romantic नाही जमत.
एक नाटकात मावळ्याच काम आहे. त्याच प्रारंभीच स्वागत पाठ होत नाही ये. आणि तिसरा … ते
तर आठवतच नाहीये.

जय अस कितीस अवघड असणारे? बघू. (दोघे मिळून वाचायला घेतात. जय वाचतो)

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती
शिवबाचे मावळे आम्ही, लढतो, मरतो स्वराज्यासाठी

सोप्पय!!

(नट्टु पुढच वाच … जय पुढच हळू हळू वाचतो )

हजारो शूर त्यांच्या तलवारी म्यानातून काढून रणांगणावर ज्यांच्यासाठी चमकवितात त्या शिवरायांचा सरदार आहे मी.

(अवघड आहे म्हणून जय पुढच वाचायचं टाळतो)
होईल होईल वाच परत एकदा ते स्वगत, तिथे पोहचे पर्यंत वाचत रहा.
अवघड आहे. (हळू आवस्वतह्स्वगत)

मानसी नट्टु डब्बा

नट्टु ओके चला येतो

जय मानसी बेस्ट लक!!

(नट्टु घाईत पोहन्चतो. लगेच कॉस्चुम चेंज करून विंगेत येतो. स्वगत आठवतो आणि पहिल्या ओळीनंतर त्याला काहीच आठवत नाही. प्रचंड घाबरतो.)

नट्टु देवा!! ह्यावेळेस मला वाचव. मी रोज तुझ्यासमोर दहादा नाक घासीन.

(नट्टु मंचावर येतो. प्रकाश झोत नट्टुवर)

नट्टु शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती
शिवबाचे मावळे आम्ही, लढतो, मरतो स्वराज्यासाठी

हजारो शूर त्यांच्या तलवारी म्यानातून काढून रणांगणावर ज्यांच्यासाठी चमकवितात त्या शिवरायांचा सरदार आहे मी. हिंदवी स्वराज्याचा मुकुट ज्यांच्या शिरी तेजाने झळाळून उठतो त्या शिवरायांचा सरदार आहे मी.
हजारो मावळे ज्यांच्यासाठी आपल्या उष्ण रक्ताचा अभिषेक अखंड सुरु ठेवतात त्या शिवरायांचा सरदार आहे मी.

(पडदा उघडतो. romantic गाणं लागत. रंगमंचावर झोका त्यावर एक तरुणी.)

तरुणी झोका झोका दे ना मला झोका

(नट्टु हादरतो. चुकीच्या नाटकात चुकीचे संवाद त्यने म्हणालेला असतो)

तरुणी देईन मी तुला मुका

नट्टु का आलाय तुला माझा पुळका?
तू माझी मनुका अन मी तुझा खारका!!

(विंगेतून प्रोम्प्टर प्रिये पहा प्रिये पहा )

नट्टु प्रिये पहा, प्रिये पहा, प्रिये पहा ...ए बघ ना!

(गोंधळ. पडदा पडतो.)

-------
प्रसंग ७
-------

(नट्टु हताश होऊन बसलेला. बाजूला मानसी आणि जय त्याला समजावतात )

नट्टु मिळालेल्या संधीच सोनं करण दूर, माती केली मी.

मानसी नट्टु अरे असा स्वतःवर रागावू नको आणि हताश पण होऊ नको

जय हे बघ स्टेज वर जे जे म्हणून वाईट अगदी वाइटातल वाइट होऊ शकत ते सगळ तुझ्या बाबद
घडून गेल आहे. आता ह्यापेक्षा अधिक वाईट काही घडू शकत नाही.

मानसी शिवाय प्रसंगावधान दाखवून तू वेळ निभावून नेलीस

जय त्यामुळे गंभीर नाटक विनोदी झाल ते वेगळ (हळू आवाजात)

नट्टु शिवाय मी ते अवघड स्वागत पूर्ण न चुकता म्हंटल. चुकीच्या नाटकात पण मला ते जमल

(तिघेही खुश होतात. इतक्यात फोने वाजतो फोन वर जय बोलतो)

जय हं हं काय? अछा!
नट्टु तुला उद्या audition ला बोलावलंय. वस्त्रहरण नाटकात एक विनोदी कलाकार पाहिजे म्हणे.

मानसी आणि तुझ्या आवडीचा शिरा!!

------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users