नवल

Submitted by जयदीप. on 15 March, 2014 - 07:55

झोपणारे जागले तर नवल
भुंकणारे चावले तर नवल

"संपली माझी शिते" सांगता
पांगणारे परतले तर नवल

तू जगाला जिंकले एवढे
मी स्वतःला जिंकले तर नवल

काम आहे ठेवले वाटुनी
हात माझे चालले तर नवल

ठेवले आहे मला वाढुनी
काय आहे समजले तर नवल

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनेक खयाल आवडले
पण रदीफ अगदीच कुठे वाचण्यात ऐकण्यात विचारात न आल्याने असल्याने ही प्रत्येक शेरात चपखल बसतेय का ह्यावर मी विचार करतो आहे
शिवाय नवल ह्या शब्दाचे नैसर्गिक वजन न + वल =लगा असे असल्याचे माझे मत असल्याने वाचताना अडखळायला झालेच
असो
अनेक खयाल आवडले

धन्यवाद

गालगागा गालगा () गागाल
१२()५

असं वाचलं तर मला लिहीताना योग्य वाटलं

तरी,

बदलाबद्दल विचार करतो

धन्यवाद

Happy

>>>गालगागा गालगा .... गागाल <<<
मी असे म्हणत आहे की नवल = लगा आणि त्यामुळे मतला पुन्हा नीट वाचून पाहाच ....दोन्ही ओळी मला अश्या साउंड होताय्त की >>>गालगागा गालगा ..गालगा <<<
माझा मुद्दा मात्रासंख्या हा नसून शब्दाचे नैसर्गिक वजन हा आहे