गझले चिकार झाली...

Submitted by किरण कुमार on 13 March, 2014 - 09:34

शिस्तीत चालणारी पोरे टूकार झाली
कवितेच्या चालीमध्ये गझले चिकार झाली...

भयभीत श्वान जेथे समजती शेर आता
घर राखण्यातही सारी काम चूकार झाली...

कोरड्याच अर्थपंक्ति जे फेकित चाललेले
कोणा कसे कळेना नुसती कतार झाली.........

मज लिहावे वाटले गझल जेव्हा जेव्हा
सूंदरशी कविताही का पान उतार झाली..............

मी नाव कोरतो मग उगाच अंतिम शेरी
एवढी माझी प्रतिमा कुठे पसार झाली........

जो तो मला म्हणाला रस्ता कठिण आहे
कि माझीच ती संधी नियमा नुसार झाली......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किरणकुमार Happy

मी आधी शेरी हा त्या पेयाचा उल्लेख समजलो. आणि चिकार हा काहीतरी खत्रा उर्दू शब्द असावा व शीर्षक गजल-ए-चिकार झाली असे काहीतरी असावे असे वाटले. मुघल-ए-आजम चे मोगले आजम होते तसे Happy

मुघल-ए-आजम चे मोगले आजम होते तसे - फोरएण्ड .. Happy

अमित , अजून गझल उमजायची बाकी आहे मग बघू एकवचन अनेकवचन वगैरे वगैरे.....

पण ब-याचदा गझलेत एखादा शेर उगाच ओढून ताणून बसविलेला असतो ( गझलेच्या ठराविक रिकाम्या जागा भराव्या असा कदाचित हेतू असेल) .

धन्स.. Happy