बाळाची शर्यत

Submitted by विदेश on 13 March, 2014 - 08:17

'

एक दोन एक दोन
बाळाची पावलं
मोजणार कोण . .

तीन चार तीन चार
बाळाच्या पैंजणाचा
नादच फार . .

पाच सहा पाच सहा
बाळाची दुडुदुडु
ऐट किती पहा . .

सात आठ सात आठ
बाळाने धरली
ताईची पाठ . .

नऊ दहा नऊ दहा
बाळाने शर्यत
जिंकली पहा . .
.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप गोड आहे आणि नुकतच हे सगळं माझी लेक आणि भाचा ह्यांच्या बाबतीत अनुभवलं पण आहे त्यामुळे वाचताना पुन्हा त्या दोघांची आठवण आली Happy