आम्ही फुले

Submitted by आशिका on 13 March, 2014 - 05:55

तरु-वेलीन्च्या अन्ग-प्रत्यन्गी बागडणारी आम्ही फुले
रन्ग- रन्गिली, देखणी, सुगन्धी तर्हेतर्हेची आम्ही फुले

गर्व न आम्हा रुपा-गन्धाचा, सौन्दर्याचा वा मकरन्दाचा
घेतला आम्ही एकच वसा जगता आनन्द देण्याचा

नच ठावे की पडू ईशचरणी वा सरणी
व्रुथा का चिन्ता? असता व्रुत्ती परोपकारी

एक दिसाचे जीवन अवघे लावण्या ते सत्कारणी
मुक्त उधळीतो रन्ग, परिमल अन मकरन्दाच्या खाणी

मातीतून आलो, मातीत जायाचे जाण याची पूर्ण मनी
निर्माल्यातुनही खत बनुनी सेवितो मानवा अन्तिम क्षणी

हे मानवा, आम्हापासुनी गुण एखादा स्वीकारी
'जीवनपुष्प' रे तुझे राजा, बहरेल 'वसन्त ऋतूपरी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान! Happy

आशिका, छान लिहिलीय!

गोविंदाग्रज यांच्या कवितेतलं एक कडवं आठवलं,
" काही गोड फुले सदा विहरती सर्वांगनांच्या शिरी,
काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृदमंदिरी,
काही जाउनी बैसती प्रभूपदी पापापदा वारि ते,
एखादे फुटके नशीब म्हणुनी प्रेतास शृंगारिते।"