तुझे युद्ध हे छान समृद्ध झाले

Submitted by dr.sunil_ahirrao on 11 March, 2014 - 10:27

फुटे दुःख भवती, गळे रुद्ध झाले
तुझे युद्ध हे छान समृद्ध झाले

रणीँ हासुनी बोलले जे महात्मे
जरा टोकता मी किती कृद्ध झाले

किती सर्वव्यापी तुझा न्याय होता
मुले जायबंदी, लुळे वृद्ध झाले

चिता जाळण्याची नको आज चिँता
पहा लोक सारे इथे गृद्ध झाले

किती हाय करुणे तुझा बोलबाला
कसाई जुने ते अता बुद्ध झाले

तुझा यद्न्य हा छानसंपन्न झाला
बलीदान माझे पहा शुद्ध झाले

तुझ्यावीण नाही इथे बुद्ध हसला
तुझ्यावीण केव्हा इथे युद्ध झाले

डॉ.सुनील अहिरराव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विश्लेषण व्यक्तीसापेक्ष असते.<<<< हो!! विश्लेषण व्यक्तीसापेक्ष असते ..(असू शकते ) !! पण चांगली गझल ही चांगली गझलच असणे हे व्यक्तीसापेक्ष नसते कुणी माना न माना चांगली गझल एक चांगली गझल असतेच असते कुणाच्या म्हणण्या-न- म्हणण्याने तिचे चांगलेपण बदलत नाही !!!

असो
बाय दी वे मी तुमच्या ह्या गझलेला नावे ठेवलेलीच नाहीयेत मुळी ...[माझा वरील प्रतिसाद नीट वाचावा प्लीज ]..फक्त ओळखू यायचे ते (= जुळवाजुळव !!!)ओळखू येते असे म्हटले गझलेत उणीवा आहेत हा अर्थ आपण काढला आहात ...त्यालाही मी "चोर की दाढी मे तिनका" असं कुठं म्हणतोय Happy

तात्पर्य : गैरसमज करून घेवू नयेत !..निदान माझ्या बाबतीत तरी !!!

अवांतर : एक बीजमंत्र लक्षात असूद्या ,,आंतरजालावर वावरताना फार उपयोगी पडतो .."हाय काय न् नाय काय " हाच तो बीजेमंत्र होय !!