लक्तरे

Submitted by जयदीप. on 10 March, 2014 - 23:47

हासरे असतात त्यांचे चेहरे
संपली आहेत त्यांची उत्तरे

दे तुला वाटेल ती शिक्षा मला
एकदा ऎकून घे माझे 'खरे'

तू दिले ते घेतले बिनशर्त मी
राहिली होती कुठे गत्यंतरे

सारखी येतात ही प्रत्यंतरे
वाढली आहेत आता अंतरे

वाटले गोळा मला केले तसे
केवढी माझ्या मनाची लक्तरे

संपली शब्दातली माझी कथा
राहिली माैनातली भाषांतरे...

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

असतात ऐवजी आहेत हाच शब्द पहिल्या ओळीत घेता येणार नव्हता का पहिल्या ओळीत (नै म्हणजे काळ राखला गेला असता वगैरे ..)

बाय दी वे मोस्ट ऑफ शायर मतला-ए-सानी मतल्यानंतर घेतात ..तसे काही अपरिहार्य नव्हेच ..जस्ट माहीती असेल कि नै म्हणून सांगीतले बस
असो
गझल आवडली

पहिला शेर ज्जाम आवडला...

गत्यंतरे हे अनेकवचन कितपत वापरलं जातं, माहित नाही. गत्यंतर नाही हे एकवचनच पुरेसं आहे अगतिकता दाखवायला Wink

धन्यवाद! Happy