मी...

Submitted by मयुरेश साने on 6 March, 2014 - 01:44

कुठे कुणाला कळतो मी
प्रत्येकाला छळतो मी

काहीही चालत नाही
तरी असा का पळतो मी

ठेच लागते जिथे तिथे
जिथे तिथे भळभळतो मी

कोण कुणाचे आहे हो
उगाच पण तळमळतो मी

पत्त्यांचा बंगला जणू
क्षणात हा कोसळतो मी

वठतो पण संपत नाही
पुन्हा नव्याने फळतो मी

...मयुरेश साने

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त....

लहान तोंडी मोठा घास घेतो मयुरेष जी....
सुधा चा अर्थ वेगळा होतो... सुद्धा असाच शब्द बरोबरआहे...

'तरी असा का पळतो मी' ... हे मला तुमचा शेर वाचतांना सुचले

*

तळमळ खूप आवडला.

क्षणात हा च्या जागी हा भरीचा वाटला (वै.म..)

मला लय पकडता येत नाही आहे...

काही कमी जास्त बोललो असल्यास क्षमस्व.

पुलेशु.

काहीही चालत नाही
तरी असा का पळतो मी<<< व्वा

वठतो पण संपत नाही
पुन्हा नव्याने फळतो मी<<< सुरेख

ठेच लागते जिथे तिथे - ही ओळही छान!

चांगली गझल!

पळतो चा शेर अधिक आवडला
धन्स व शुभेच्छा

सुधा <<<<< हल्ली असंच बोलतात लिहितात .सुधा = सुद्धा
हल्ली काहीजण 'सुद्धा' असं लिहून 'सुधा' वचतात द वर जोर देत नाहीत
"मध्ये" असं लिहितात आणि मधे असंच वाचतात किंवा म-ध्ये असं वाचतात ध चा जोर य वर देतात
असो
आपल्याला काय हाय काय अन् नाय काय