एकदा समजून घे

Submitted by जयदीप. on 5 March, 2014 - 22:42

सारखे तापू नको
तू अता रापू नको

मान मी देईन... पण
तू गळा कापू नको

तू मला माणूस कर...
भामटा बापू नको!

एकदा समजून घे
नेहमी झापू नको

जे हवे मागून घे
तू असे ढापू नको

वेस ना आहे मला
तू मला मापू नको

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users