सुरू होतील आता वादळे माझ्या विचारांची (तरही)

Submitted by सुप्रिया जाधव. on 1 March, 2014 - 12:53

पुरेशी येत नाही कल्पना त्याच्या विचारांची
सुरू होतील आता वादळे माझ्या विचारांची

बरे केलेस माझे कापले तू पंख आयुष्या
भरारी मारली होती खुल्या-ताज्या विचारांची

मजेने झोपला आहे नका जागे करू त्याला
जगाला वाट्ते धास्ती ख-या त्याच्या विचारांची

सरळ रस्ता पुढे होता जरी....उजवीकडे वळले
घरादारास वाटे मी तरी डाव्या विचारांची !

जगामध्ये तिच्या भोळ्या मनाच्या चिंधड्या झाल्या
हवेमध्ये विखुरली लक्तरे साध्या विचारांची

नकाराने छुप्या त्याच्या पुरी विच्छिन्ऩ झालेली
मनाने बांधली मोळी खुळ्या-सा-या विचारांची

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरळ रस्ता पुढे होता जरी....उजवीकडे वळले
घरादारास वाटे मी तरी डाव्या विचारांची ! << व्वा ! >>

मतला पण सुरेख...

आवडली

वा मस्त !

एकंदर सगळेच शेर छानच . अधिक आवडलेल्या शेराबाबत अरविंदजी +१

तरही सहभागासाठी मनःपूर्वक आभार तै Happy यंदाची ओळ माझी आहे Happy

मजेने झोपला आहे नका जागे करू त्याला
जगाला वाट्ते धास्ती ख-या त्याच्या विचारांची

सरळ रस्ता पुढे होता जरी....उजवीकडे वळले
घरादारास वाटे मी तरी डाव्या विचारांची !

मस्त..!