बदलला पत्ता तुझा

Submitted by जयदीप. on 28 February, 2014 - 02:29

हरवले नाही मला
जिंकले नाही मला

वाटले माझ्या सुखा
ठेवले नाही मला

चांगला होतो तसा
समजले नाही मला

खर्च मी झालो पुन्हा
उमगले नाही मला

बदलला पत्ता तुझा
कळवले नाही मला

ठरवले दोषी मला
ऎकले नाही मला

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users